*3 वर्षांच्या चिमुकलीसाठी माणुसकी धावली !

 आजही आरोहीच्या मागे लोकांनी उभं राहण्याची गरज*
रत्नागिरी तालुक्यातील कु.आरोही सचिन घुमे या 3 वर्षाच्या चिमुकलीचे नुकतेच वाडिया हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन झाले. तिला डोक्यात रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या. तातडीने ऑपरेशन होणे गरजेचे होते. खासगी रुग्णालयात सुमारे 15 लाखांचा खर्च सांगण्यात आला होता. मात्र या मुलीसाठी विविध मान्यवर वेळीच धावून आले आणि तिचे ऑपरेशन अगदी मोफत झाले. माणुसकी या चिमुकली साठी धावून आली. त्यावेळी तिच्यावर तातडीने उपचार होण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत, विधान सभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ  साहेब यांनी  तातडीने उपचार मिळण्यासाठी मोठे सहकार्य केले. गाव विकास समितीचे सुकांत पाडाळकर यांनीही आरोही च्या कुटूंबियांना योग्य वेळी मार्गदर्शन केले. गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांनी मित्र व भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश चव्हाण यांना या मुलीला मदत व्हावी यासाठी शब्द टाकला होता. निलेश चव्हाण यांनी त्यांचे मित्र व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांना सदर मुलीच्या उपचारासाठी वाडिया रुग्णालयात तातडीची मदत हवी असल्याचे कळवले. त्यानंतर उदयजी सामंत यांनी तातडीने सहकार्य केले. मुलीवर ऑपरेशन वेळेत होणे गरजेचे असल्याने व कोणतीही रिस्क नको म्हणून दुसरीकडे ठाण्यातील पत्रकार अनिल शिंदे यांच्या माध्यमातूनही विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ साहेब यांना हा विषय अवगत करून देण्यात आला होता. त्यांनी या विषयात वैयक्तिक लक्ष घातले. गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी संघटनेच्या वतीने औषधासाठी योग्य ते सहकार्य केले. 
आज या मुलीच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी  सुहास खंडागळे व गाव विकास समितीचे उपाध्यक्ष राहुल यादव, जिल्हा संघटक मनोज घुग, सुनिल खंडागळे, जिल्हा उपाध्यक्ष मुझमील काझी, रत्नागिरी तालुका संघटक सुकांत पाडाळकर यांनी सदर मुलीच्या रत्नागिरी तालुक्यातील घरी भेट दिली. तब्बेतीची विचारपूस केली. या मुलीला आजही दर महिन्याला टाटा रुग्णालयात एकदा न्यावे लागते. गाव विकास समितीने सदर कुटूंबाला यापुढे काही मदत लागली तर केली जाईल हे सांगितले. टाटा रुग्णालय मध्ये पुढील उपचार व्यवस्थित व्हावे यासाठी गाव विकास समिती प्रयत्न करणार असल्याचे संघटनेने सांगितले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ साहेब, भाजपचे निलेश चव्हाण साहेब, गाव विकास समितीचे सुहास खंडागळे, पत्रकार अनिल शिंदे साहेब, सुकांत पाडाळकर यांचे तसेच मदत केलेल्या सर्व डॉक्टर आणि त्यांच्या स्टाफचे कुटूंबाने आभार मानले.
*- मुझमील काझी*

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income