संताजी घोरपडे यांचा खून व गद्दार माने ...

 
        मोगल इतिहासकार खाफिखान याने सरसेनापती        संताजी घोरपडे यांच्या पराक्रम आणि युद्धकौशल्य याचे हे वर्णन,सरसेनापती संताजी घोरपडे यांचा मोगल सरदारांना केवढा धाक आणि दरारा वाटत होता हेच या खालील वर्णनातून दिसून येते..
  " समृद्ध शहरांवर हल्ला करून करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनानींवर तुटून पडणे यात संताजीची ख्याती होती. ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी तीन परिणाम असत एक तर तो मारला जाई किंवा जखमी होऊन संताजीच्या कैदेत सापडे किंवा त्याचा पराजय होई आणि त्याचे सैन्य गारद होई. जो यातून वाचेल त्याला आपला पुनर्जन्म झाला असे त्याला वाटे." 
युद्ध करण्यासाठी जिकडे जिकडे म्हणून संताजी जाई तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशाहच्या प्रतिष्ठीत सरदारापैकी एकही तयार होत नसे. जगात धड़की भरून सोडणारी फौज घेऊन संताजी कोठेही पोहचला की वाघासारख्या काळीज असलेल्या सेनांनीची हृदये कंपायमान होत. 
    याशिवाय इतकेच काय पण बादशहाच्या छावणीत घुसून तंबूचे कळस कापून आणणारे, आपल्या वेगवान आणि अनोख्या युद्धनितीने मोगलांना सळो की पळू करून सोडणारे मराठा सेनापती संताजी घोरपडे यांनी छत्रपती शिवराय यांचेनंतर दुसरा सर्जिकल स्ट्राईक घडवून आणलेला होता.हे अचाट व अफाट धाडस व युद्धकल्पकता छत्रपती शिवराय यांचेनंतर संताजी घोरपडे यांचेकडे होती. संताजी घोरपडे यांचेकडून पराभूत होणा-या मोगली सरदारांची भलीमोठी यादी आहे.त्यात अनेक जन मारले गेले.अनेकांकडून जबरी खंडण्या वसूल केल्या संताजी म्हणजे प्रत्यक्षात खवळलेला नरव्याघ्रच..

वाजल्या कुठे जरी टापा ।
धुरळ्याच्या दिसती  छाया ॥
छावणीत गोंधळ व्हावा ।
संताजी आया आया ॥
    ही सरसेनापती संताजी घोरपडे यांची ख्याती..
  संताजी घोरपडे या मोठ्या थोर सरदार यांचा खून ही मराठा इतिहासातील सर्वात मोठी शोकांतिका असून या खुनास जबाबदार कोण ? याबाबतचे वास्तव काय हे इतिहासप्रेमींना माहीत व्हायला हवे यासाठी हा लेखन प्रपंच..
   मराठा साम्राज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे छत्रपती घराण्याशी एकनिष्ठ असे सेनानी संताजी घोरपडे यांचे वडिल म्हलोजी घोरपडे यांचे छत्रपती संभाजीराजे यांचे रक्षण करतानाचे बलिदान महत्वाचे आहे. संताजी घोरपडे व त्यांचे वडिल हे छत्रपती घराण्याशी एकनिष्ठ होते हे दिसून येते.असे असताना या पराक्रमी विर यांचा खून का व कशासाठी त्यामागील प्रमुख कारणे काय याबाबतची मिमांसा खालीलप्रमाणे 
१) सरसेनापती संताजी घोरपडे यांची जडणघडण व त्यांची शिस्त.
२) वतनासाठी हपापलेले गद्दार 
२) जुल्फीकारखानासासोबत झालेला तह
३) अमृतराव निंबाळकर प्रकरण.

   संताजी घोरपडे हे शिवछत्रपती यांचे कठोर शिस्तीत वाढलेले होते व छत्रपती राजाराम महाराज यांचे कारकिर्दीत गद्दारीला व स्वराज्यद्रोहाला पेव फुटलेले होते वतनदारीच्या तुकड्यासाठी लाचार झालेले औरग्यापुढे याबद्दल थोर इतिहासकार डाॅ.जयसिंगराव पवार लिहितात,"राजाराम महाराज व ताराबाई यांचे कालखंडात अशा प्रकारे अनेक मराठा सरदारांनी राजकिय प्रवास केला आहे.नागोजी हा काही अपवाद नाही.असे मराठे सरदार जेव्हा स्वराज्यात येत तेव्हा स्वराज्य म्हणजे देवता भुमी मानली जाई.महाराष्ट्र धर्माचे आवर्जून स्मरण केले जाई. पण त्यांना मोगली मन्सबीचे मृगजळ दिसले की कुठली देवता भुमी व कुठला महाराष्ट्र धर्म !केव्हा एकदा बादशहाच्या दरबाराच्या ऊंबरठ्यावर  सलाम करावास जाईन,असे त्यांना होवून जाई. 
    यांचे हे वर्तन शिवछत्रपती व संभाजी राजे यांचे शिस्तीत वाढलेल्या संताजी घोरपडे यांना पटत नसे हे सरदार आयाराम गयाराम व बे भरोश्याचे होते.यांची बेशिस्त संताजी घोरपडे यांना पटत नव्हती परिस्थितीच अशी निर्माण झाली होती की वतनासाठी शिवाय अल्पवयीन छत्रपती राजाराम महाराज यांचेकडे पर्याय उरला नव्हता.अगदी दाभोळचे इनाम मागणारे गणोजी शिर्के यांनी छत्रपती राजाराम महाराज यांची कशी कोंडी केली होती हे यावरून स्पष्ट होते.ही अशी वर्तने संताजी घोरपडे यांना पटत नव्हती.याशिवाय छत्रपती राजाराम महाराज व संताजी घोरपडे यांचे संबंधात आलेला बिघाड यास कारभारी व हे आयाराम गयाराम सरदारही कारणीभूत होते. छत्रपती राजाराम महाराज यांनी शरण आलेल्या जुल्फीकारखानाला दिलेले अभय हे ही बाब ही सरसेनापती असूनही आपले म्हणणे विचारात घेतले नाही असे सरसेनापती संताजी घोरपडे यांना वाटत असे.त्यानंतर म्हणजेच ८ मे १६९६ रोजीनंतर संताजी घोरपडे यांना सरसेनापती पदावरून हटविले गेले.त्यानंतर वितुष्ट आलेनंतर  काही दिवसातच छत्रपती राजाराम महाराज यांनी मोठी फौज घेवून संताजी घोरपडे यांचेवर धनाजी जाधव,अमृतराव निंबाळकर,हणमंतराव निंबाळकर यांना सोबत चढाई केली यात छत्रपती राजाराम महाराज यांना लढाईत एकटे सोडून सरसेनापती धनाजी जाधव हणमंतराव निंबाळकर यांनी पळ काढला व छत्रपती राजाराम महाराज अमृतराव निंबाळकर यांना कैदेत केले रागाचे भरात संताजी घोरपडे यांनी अमृतराव निंबाळकर या आयाराम गयाराम सरदारास हत्तीचे पायी दिले जो नागोजी माने याचा मेव्हणा होता.याच प्रसंगी दुसरे दिवशी स्वतः संताजी घोरपडे यांनी आपले हात रूमालात बांधून राजाराम महाराज यांचे समोर उभे राहून क्षमायाचना मागितली.मी तुमचा सेवक आहे तुम्ही धनाजीला माझ्या बरोबरीचा दर्जा देवू इच्छित होता म्हणून मला उद्धट वागणे भाग पडले आता आपण जी आज्ञा द्याल त्याप्रमाणे वागेन.त्यानंतर  सन्मानाने  राजाराम महाराज यांना सैन्यासोबत सोडले.त्यानंतर मोगलांकडून संताजी घोरपडे यांना राजाराम महाराज यांना ताब्यात द्यावे असा निरोपही होता  अनेक अमीषही दाखविले पण त्यास ते बळी पडले नाहीत.त्यानंतर कारभारी व सरदार यांचे राजकारणास ऊत आला व संताजी घोरपडे एकटे पडले.धनाजी जाधव व हणमंतराव निंबाळकर त्यांचेकडून ते पराभूत झाले.भावाचे वधाने संतापलेल्या हणमंतराव निंबाळकर याचा पुरेपुर वापर धनाजी जाधव यांनी करून घेतला व संताजी घोरपडे यांचा पराभव झाला याबाबत खाफिखान याने त्याबाबत सविस्तर नोंद केलेली आहे.या लढाईमध्ये संताजी घोरपडे याची अनेक माणसे मारली गेली त्यांची बरीच गाणी झाली. शेवटी असाहाय्य होवून सामान सुमान लुटले व संताजी घोरपडे हे सातारा भागात पळत पळत आश्रयाला निघाले. याच दरम्यान गाजीऊद्दीन खान हाही संताजी घोरपडे यांचे पाठलागावर होता.
   रणमार्तंड संताजी घोरपडे यांचा खून 
शेवटी माने व निंबाळकर यांचे नातेसंबंध संताजी घोरपडे खुन प्रकरणात विचारात घेणे आवश्यक आहे.राधाबाई माने हि अमृतराव निंबाळकर व हणमंतराव निंबाळकर यांची सख्खी बहीण होती. निंबाळकर घराणे माने घराणे या  घराण्यातील लोक हे स्वराज्यासाठी ईमानदार नव्हते.ते आयाराम गयाराम होते त्यापैकी अमृतराव निंबाळकर नागोजी माने असेच होते.
  संताजी घोरपडे हे सातारा भागात शंभुमहादेवाच्या डोंगरामध्ये वाई सातारा भागाचे पुर्व भागात आश्रयाला होते.याच डोंगररांगात कारखेल मध्ये गुहेपासून दोन मैल अंतरावर अंघोळ करणेसाठी ओढ्याकाठी कारखाळ्याच्या रानात संताजी निहत्ते होते त्यावेळी डाव साधून राधाबाई माने व त्यांचे मानसांनी संताजी घोरपडे यांचे मुंडके धडावेगळे केले.व ते औरंग्याकडे पाठविण्यात आले.ही मराठा इतिहासातील फार मोठी शोकांतिका होती.त्यानंतर नागोजी माने याची पार्श्वभूमी कशी होती हे वाचकांनी अवश्य वाचावे.संताजी घोरपडे यांचे मृत्यु नंतर नाग्या माने याने औरंग्याकडे केलेला वतनासाठी अर्ज केला होता.
     शेवटपर्यंत संताजी घोरपडे यांनी राजाराम महाराज यांच्यासोबत फितुरी केली नाही. अशा या थोर सरदाराचा अंत ही मराठा इतिहासातील मोठी शोकांतिका. 
                   श्री राजाराम चरणी तत्पर      
                       संताजी घोरपडे निरंतर 
संदर्भ- मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध लेखक डाॅ.जयसिंगराव पवार

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income