*अखेर तारापूर प्रकल्पग्रस्तांचे तोंड उघडले :-*

गेल्या 30 ते 35 वर्षात हे ना ते कारण सांगून तारापूर प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करणा-या तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे भांडे उघडे झाले आहे. दोन गावांचे पुनर्वसन हे तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विस्तारासाठी नसून केंद्र सरकारच्या INRP प्रकल्पासाठी असल्यामुळे तारापूर अणुऊर्जा प्रकल्प हे पोफरण व अक्करपट्टी या दोन गावाच्या मुलभुत प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. येथील घरांच्या निकृष्ठ बांधकामामुळे शेकडो घरांची पडझड झाली असल्यामुळे व कमी आकाराचा भूखंड मोठ्या कुटुंबांना दिले असल्यामुळे कौटुंबिक वादामुळे व अनेक कुटुंबांना उदरनिर्वाहसाठी पर्याय नसल्यामुळे अनेक कुटुंबे 17 वर्षानंतरही नवीन गावात राहण्यासाठी आली नाहीत, तसेच नवी पोफरण गाव समुद्रापासून 8 किमी अंतरावर असल्यामुळे  मच्छिमार समाजाची किमान 450 कुटुंबे समुद्रापासून 8 किमी अंतरावर जावून करणार काय? असा प्रश्न मच्छिमार कुटुंबियांना बेळसावत आहे. गेल्या 35 वर्षात प्रकल्पाने फक्त 72 प्रकल्पग्रस्तांना कायम स्वरूपी नोकरी दिली आहे. याआधी प्रकल्पाने प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला कायम स्वरूपी  नोकरी देण्याचे आश्वसीत केले असल्यामुळे 1800 कुटुंबियांना नोकरी बाबतीत न्याय देण्यासाठी 900 वर्षे लागतील? हे लक्षात घेणे अपेक्षित आहे.   NPCIL ने द्वेषातून तारापूर प्रकल्पग्रस्तांचे ह्या प्रकारे हाल करणे कितपत योग्य आहे हे व्यथित प्रकल्पग्रस्तांनी आपल्या व्यथा आज दि. 17/06/2022 रोजी झालेल्या सभेत  मुंबई उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या माननीय ओक समितीच्या माध्यमातून याआधी नियुक्त केलेल्या महाराष्ट्र नॅशनल लाॅ युनिव्हर्सिटी मुंबईच्या (डिपार्टमेंट ऑफ जस्टीसच्या न्याय बंधुस्किम अंतर्गत स्थापन झालेल्या विद्यापिठाचे प्रोबोनो क्लब) शिष्टमंडळासमोर मांडल्या व सदर शिष्टमंडळाने कायदा, संविधान, मुलभुत अधिकार, कर्तव्य बाबत जनजागृती तसेच प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या समस्यांबाबत सर्व्हेही केला. पुनर्वसन होऊन 17 वर्षे होऊनही प्रकल्पाचे अधिकारी जाणिवपूर्वक प्रकल्पग्रस्तांच्या मुलभुत प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे येणा-या काळात तारापूर अणुऊर्जा प्रकल्प व INRP  विरोधात जनआंदोलन छेडण्याचे प्रकल्पग्रस्तांच्या वतीने समितीचे माजी अध्यक्ष श्री. विजय तामोरे यांनी जाहीर केले. त्यावेळी न्यायालयीन शिष्टमंडळाचे प्रमुख डाॅ. आनंद राऊत, डाॅ. गरीमा पाल व त्यांचे सहकारी तसेच प्रकल्पग्रस्तांच्या वतीने श्री. श्रीधर तामोरे अध्यक्ष तारापूर अणुऊर्जा प्रकल्प मच्छिमार प्रकल्पपिडीत कृती समिती, श्री. विरेंद्र पाटील, श्री. शेखर तामोरे, सौ.संगीता नाईक उपसरपंच पोफरण, श्री. वासुदेव नाईक, श्री. चंद्रकांत आरेकर, श्री. दिपक राऊत, श्री. लोचन चौधरी, श्री. सचिन ठाकुर, श्री. हर्केश तामोरे व अन्य प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income