सृजनांची चळवळ...

       अहिंसा, सत्य, अस्तेय अशी मुल्ये आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता अशी पुस्तकी तत्वे यांचा प्रत्यक्ष
समाजजीवणाशी सबंध विसंगत वाटु लागतो तेंव्हा परिस्थितीच्या अंधारातुन सर्वशक्तीनीशी प्रकाशाकडे
जाण्याचा प्रवाह तयार करावा लागतो. हाच मनुष्याचा स्वभावधर्म आहे. प्रजासत्ताक गणराज्य हि अशीच
सर्वसमावेशक आदर्श संकल्पना आहे.  शिवाय ती लवचिकही आहे. हा यज्ञ असाच अखंडपणे सतर्क राहुन
तेवत ठेवणे आपले कर्तव्य आहे. पत्रकारिता हे निमित्त मात्र माध्यम असले तरी यासाठी प्रभावीपणे वापरत
आहोत. आज पत्रकारिता आणि संघटणा हि सत्तास्थाने बनली आहेत मात्र आम्ही शाळेची पायरी चढताना
राजकारण करणार नाही! आजी माजी विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपिठ मिळावे या उद्देशाने  साने गुरूजींच्या
विचार विश्‍वात पुन्हा शाळेकडे परत येण्याचा आमचा माणस आहे कारण परिवर्तणाचा मार्ग शाळेतुनच जातो!        दरवर्षी आदर्श विद्यार्थी पुरस्कार देवुन कांही गुणी विद्यार्थी कमावण्याचा आमचा मानस आहे
            उगाच पाय न ओढता प्रोत्साहण देणारे आमच्या गावचे लोक असल्याने कुणाचाही विरोध न होता प्रोत्साहनासाठी संघटणेच्या फलकांच्या अनावरनासोबतच प्रजासत्ताकच्या अंकाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रजासत्ताकचे खेडयातही दमदार स्वागत, आता महाराष्ट्रात तहेलका अशा आशयांच्या बातम्यांसह अन्ना
हजारेंच्या उपोसनासाठी पोषक आणि पाठिंबादर्शक विचार प्रजासत्ताक मांडत राहिला. आर. एन. आय.
साठी प्रयत्न करणे हे कांहि पार्टटाइम काम नसल्याने मी नवशक्ती वृत्तपत्राचे काम सोडले. भारतीय आयुविमा
कंपनीच्या अभीकर्ता असल्याने तशी रोजी रोटिची चिंता नव्हतीच. (मार्केटिंगवाले कितीही मार्केट खराब
असले तरी आशावादी असतात!) ८२ वर्षीय सुनिता कर्निक मॅडम यांचे कांही विचार टिम प्रजासत्ताकच्या
युवा लोकांना पटत नसत. सर्वांच्या कामातुन वेळ काढण्यालाही मर्यादा येवु लागल्या होत्या. त्यातच आथिक
चंचन प्रत्येकालाच भासत होती त्यामुळे श्रम आणि अर्थ अशी दोन्हींची एकाचवेळी अपेक्षा करणे अयोग्य
ठरू लागले.
             हिटलरच्या विचारांनी प्रभावित झालेल्या सुहासला प्रजासत्ताकमधील विचारांची बंडाळि न रूचल्याने
त्यांने काढता पाय घेतला. मार्केटिंग कौशल्यामुळे सुहास मला गोबेल्सच्या रूपात बघत होता हे मला आता
कळले. सर्व धुरा माझ्यावर असल्याने बाजारात नाव खराब होणे योग्य नव्हते. मी कर्णिक मॅडमांशी हात
मिळवाणी केली मात्र सुत न जुळल्याने तो मार्ग बंद झाला. मग मोर्चा वळविला तो सय्यद कादिर या
आमच्या दुस-या परम मित्रांकडे. हे सरकारी नोकरी सोडुन जनसेवा संघ चालवतात व वृत्तपत्रांचे एजंट
आहेत. त्यांचा आश्रय घेवुन स्व:ताला सिद्ध करावे हा विचार होता मात्र प्रजासत्ताक टिमच्या गोटात जणु
संभाजी महाराज दिलेर खानला सामिल झाल्यासारखे वाटले. त्यामुळे मला महाराष्ट्र राज्य युवा जनसेवा संघ अध्यक्ष म्हणुन आखलेल्या सर्व कार्यक्रमावर पाणि सोडुन खाली हात माघारी फिरावे लागले केवळ मित्र राखण्यासाठी! आतापर्यंत माझे वैयक्तीक ५०,००० रू. खर्च होवुन गेले होते. शेवटचा अंक (१२ वा) काढुन मी माझ्या
विचारांचा सृजनोत्सव संपविला.....
क्रमशः 

Comments

  1. I could be crazy, although I'm not that crazy. I didn't locate anything useful touching on Dietary Supplements but also put several life into what you. When you guess relating to Dietary Supplements, what pops to mind? Using a Dietary Supplements that supports a credentials for a Keto Diets. You have to give me either a yes or a no. This is the least expensive option.

    https://www.nutraket.com/excel-keto-gummies/

    https://www.nutraket.com/lets-keto-gummies/
    https://www.nutraket.com/rejuvenate-cbd-gummies/
    https://www.offerplox.com/weight-loss/lets-keto-gummies/
    https://www.offerplox.com/weight-loss/keto-extreme-fat-burner/
    https://www.claimhealthy.com/red-boost-reviews/
    https://www.claimhealthy.com/cannutopia-male-enhancement-gummies/
    https://usanewsindependent.com/2023/01/animale-male-enhancement-animal-cbd-gummies-for-men-reviews-2023/

    ReplyDelete

Post a Comment

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income