श्रमसंस्कार

       माझी दिवसातुन दोन ठिकाणी शाळा भरायची एक शेतात आणि दुसरी गावच्या शाळेत. कितीही
थंडी असली तरी सकाळी ६ वाजता मला व विक्रमला उठुण शेण्या बनविण्यासाठी डोकिवर बुट्टी घेऊन शेण
पकडायला जावे लागे. विक्रमदाचा माझ्यासाठी विक्रम झाला होता कारण नववीपर्यंत परिक्षेत मीच त्याला माझी त्तरपत्रिका दाखवुन खेचत आणला होता. ५ वी पासुन माझ्याच वर्गात तो होता. खेळात तालुकास्तरारावर विविध स्पर्धेत प्राविण्य मिळविलेला तो अभ्यासात मार खायचा.दोघांनाही पसंत नसलेले हे काम आईच्या धाकाखातर आणि पर्याय नसल्याने करावे
लागे. एकाने बुट्टी डोक्यावर घेतली तर दुस-याने शेताच्या  वाटेवरील म्हैस आणि बैलाचे शेण उचलुन
बुट्टीत टाकायचे असा नित्यनियम! याच वाटेवर पुर्वी लोक शौचालयास बसत आता गाव हागंदरीमुक्त
आहे. पुर्वी अगदी पहाटे जनावारांना चरायला व पाण्याला सोडत आज ती वेळही बदललीय. शेण गोळा
करण्यालाही त्यावेळी आम्हाला स्पर्धक होते. आमच्या परडयात गोळा केलेल्या शेणाचे शेणी लावण्याचे काम
आई आठवडयाच्या शेवटी करत असे त्यावेळी पाणि आणायचे व कोंडा मिसळायचे कामही माझ्याकडेच
होते.
             शेणाची खेप आली कि (हे नियोजित काम झाल्यावर) चहा मिळायचा नंतर शेतातुन लाकडे आणायची वेळ आणि मग शाळेसाठी मुभा . शेती नसल्याने जळनाची लाकडे भरतीपुरती आम्हालाच जंगलातुन तोडुन आणावी लागत. फॉरेस्टर आला कि झुडपाआड दडुन बसने मग आलेच. जंगलातील झाडे बेनुन(फांद्या तोडून) लाकडे बनवनारी मेहनती आई मला राणी लक्ष्मीबाई, हिरकणी सारखीच वाटायची. आज गावातील सर्व शेती पाण्याखाली आली असुन ऊस, भुईमुग सारखी नगदी पिके शेतकरी घेतात पण् माझे बालपण पारंपारिक शेतीच्या कचाटयात चांगलेच पिंजले होते. प्रथम हेंडे फोडायचे मग वावरातील कचरा वेचायचा त्यानंतर सड काढायचे पुढे कोपरे कुदळिने उकरायचे हया पारंपरिक पद्धतीनंतर पेरणी झाली कि बालकोळपण, चिकली कोळपन अशा पाच फे-या, भांगलनी असा सपाटा असायचा! कामचुकारपना केला किंवा कुरकुर केली तर उलातणे, फुकणी यांचा बेदम मार पडायचा. शाळेतला मारही असाच वेताच्या काठिचा, पाटिल गुरूजींची पट्टीतर प्रसिद्धच आहे हि पट्टी पोरांनी
अक्षरश: जाळली तेव्हा कुठे सर्वांची सुटका झाली. पट्टी जाळण्याआधी त्यांच्या एम.ए.टी मोटर सायकलची
हवा काढणे, खुर्चीवर काऊसकोयली ठेवणे असे प्रकारही घडले होते.
               जस जसा मोठा होत गेलो तसे वाटेवरील शेण गोळा करणे बंद झाले आणि सरळ गोठयातील शेण
न्ह्यायची  लोकांकडुन परवानगी मिळायला लागली (हे एकाअर्थाने माझे प्रमोशन!) मित्रांसोबत करवंदे, काजु, आंबे
यांच्या चौर्यक्रर्मासाठीच्या धाडिमध्ये लाकडांचाही समावेश व्हायला लागला. परिसरातील जोमकाईची व
भुदरगडची जत्रा गावची मंडळी कधीच सोडत नाहीत. मुले जोमकाईच्या थात्रेसाठी डोंगराळ वाटेणे चालत
जात. मला आठवतय केवळ १० रूपये घेवुन मी गेलो होते. देवदर्शनानंतर नारळ व चिरमो-याच्या
प्रसादालाच ते खर्ची पडले. जत्रेत निरनिराळया पिप्या, अननसचे ज्युसचे  गाडे (या वेळेपासुनच अननस मला
प्रिय आहेत) खेळणी पाहुन ते घेण्याचा मोह अनावर झाला होता मात्र खिशात पैसे नसल्याने रडवेला चेहरा
करून गावची वाट मी धरली होती.
          सातवीची वार्षिक परिक्षा देताना परिक्षा फि भरली नाही म्हणुन गुरूजींनी अर्ध्या पेपरवर मला आईला
बोलवुन आणण्यास पाठविले होते तेव्हा भर पावसाात भिजत मी माळावर पळत गेलो पण् आजच्यासारखे  तत्पर प्रतिसाद त्यावेळचे पालक  देत नव्हते. कारण तसे शक्यही नव्हते मग परिक्षा संपायच्या अर्धातास आधी
मी एकटाच परतलो होतो. तरीही वर्गातील  तिस-या क्रमांकाचा माझा क्रम मी सोडला नाही. माझ्या प्राथमिक
विद्यामंदिर झुलपेवाडीने  मला इच्छेनुसार अजुन एक धडा दिला तो असा कि, 'इच्छा कितीही असल्या तरी
कुवत नसेल तर तिची वाच्यता हास्यास्पद होते!' झाले असे, शाळेची सहल कुठेतरी जाणार होती. सहलीचा
खर्च म्हणजे वाढिव वायफळ असल्याने गरीबांनी पाठ फिरवली होती. शिक्षक हि गावातील श्रीमंत मंडळी
असे मला तरी वाटायचे. एकदा प्रार्थना संपल्यावर शिक्षकांनी विचारल, ' आता सहलीसाठी अजुन कोण
येणार?' सर्वत्र शांतता! बर, कुणाकुणाची इच्छा आहे? मला वाटले शाळा स्वखर्चाने न्हेणार कि काय? मी
हात वर केला. या प्रकरणामुळे दुस-यादिवशी आईने शाळेत येवुन शिक्षकांसमोर 'माझे वडिल दारूडे आहेत,
घरखर्च, शाळाखर्च वगैरेचा हिशेब मांडावा लागला. 
            लहानपणी मी एकदा आजारी पडलो असता आई सोबत पिंपळगावला दवाखाण्याला गेलो होतो.( गावात दवाखानाच न्हवता.)  दुपारी गावी परतताना चालत जाण्यासाठीची कारणमिमांसा आईने सांगितली, ' दोघांचे तिकिट आठ रूपये होणार त्यापेक्षा चालत जावु आणि वाचलेल्या आठ रूपयांत बरेच सामान विकत घेता येईल!' निवेदनांना खाली हात किंवा निराश करून परतुन लावण्याची ताकत आजही माझ्यात नाही. मी कबुल केले खरे पण अर्ध्या रस्त्यावर जाताच उन्हातुन मला पुढे चालने होईना, मग आईने मला काखेत बसवुन चालने चालु
ठेवले. मी इतका पण लहान नव्हतो पण पर्याय नव्हता! मला आजही अशी मोठी माणसे अपंग, मतिमंद
कुणावर तरी विसंबुन राहिलेली दिसली की हा प्रसंग आठवतो.थोडयावेळाने जाधवाचा केरबामामा बैलगाडी
घेवुन गावी जाताना वाटेत भेटला. भरलेल्या बैलगाडीत कसेबसे मला त्यांनी बसवुन घेतले व आई चालत
येवु लागली. पुढे ९वी मध्ये केरबामामांच्याच घराण्यातील विश्‍वास मामा यांनी त्यांचा मुलगा अतुलची पुस्तके
फुकट दिल्याचेही मला आठवते. त्याकाळी मागच्या इयत्तेची मुले पुस्तके अर्ध्या किमतीत किंवा जास्त
फाटली असतील तर पाव किमतीत घेवुन काम चालवित असत. केरबामामांच्या घरी आजही मला हक्काचे
स्थान आहे. माझ्या आईनेच  जोडलेली ही माणसे. 
क्रमश:... 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income