शेवटी काम भेटले !

          माझ्या अवती भोवती काय आहे किंवा काय चाललय हे न बघता माझ्या मनात काय सुरू आहे हे शोधा!
असे मी म्हणायचो ते एवढयाच साठी कि माझ्या प्रत्येक नव्या उपक्रमाला, कल्पनेला, प्रयत्नांना माझ्या अवती
भोवतीचे लोग टाईमपास म्हणुन बघत. मदत करण्यापेक्षा किंवा उभारी देण्यापेक्षा पाय कसा खेचता येईल
आणि माझे खच्चीकरण कसे होईल अश्याकडे या मंडळींचा ओढा असायचा. अर्थात याला काही अपवाद
होतेच! माझ्यापेक्षा जास्त शिकलेली, पैसा असणारी, ओळख असणारी मंडळी असतील ही पण् मी माझ्यात
कमीपणा न मानता मोठ मोठी स्वप्ने बघत असु. सकाळी ५:३० ला उठुन मी पेपर टाकायला जायचो.
प्रभाकर सलामवाडे उर्फ (भाऊ) हयांच्याकडे मी पेपर लाईन टाकायला कामाला होतो. हे हिडदुगी या
गडिंग्लज तालुक्यातील गावचे. लोअरपरेल रेल्वे वर्कशॉपची  पेपरलाईन मी टाकायचो. त्यांच्या घरचा पत्ता मी
विविध ठिकाणी   पत्रव्यवहारासाठी बरीच वर्षे दिला होता. त्यांचा भाऊ सुधाकर हा माझा चांगला मित्र आहे. १२ वी विज्ञानशाखेत नापस झाल्यामुळे त्याचे पुढील शिक्षण बंद झाले. तो ही वृत्तपत्रविक्रेत्याचे काम जोमाणे करत
होता. विभागात रूबाबात फिरायची सवय मला इथे लागली. भाऊ हे दि.न्यु. इंडिया इन्शुरंन्स कंपनीत
विकास अधिकारी असल्याने त्यांनी मला भारतीय आयुर्विमा कंपनीची एजन्सी घेण्यास सुचविले. 
       त्यावेळी पेपर लाइन टाकताना मला ३०० नंतर ५०० असा मेहणताना मिळायचा. नंतर मी आयकर विभागाचे पॅनकार्ड जे ६७ रूपयांना मिळायचे ते मी १०० ते १५० रूपयांत काढुन दयायचो त्यामुळे माझा बराच जनसंपर्क वाढला होता. विजय पाटील हे एल. आय.सी. चे विकास अधिकारी  मला डिलाईल रोडवर संध्याकाळी भेटले.मी पॅनकार्डसबंधी काम करतानाच त्यांनी एल. आय. सी. एजन्सीसाठी सांगितले. फक्त ते कोल्हापुरचे
आहेत या भरवशावर मी तयार झालो आणि एलआयसीची  परिक्षा पास झालो. या सर्व घटनेमागे अजुन एक प्रेरणा होती.कोल्हापुर जिल्हा सामाजिक विकास प्रतिष्ठानतर्फे विनय कोरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत
कोल्हापुरभवन व्हावे या मागणीसाठी शिवाजीपार्कवर मेळावा भरविला, त्यात लाखो  लोक जमा झाले होते.
त्या चळवळीत मी गटप्रमुख होतो. माझ्यासोबत २५ मित्र होते. रात्रशाळांमधील प्रवेश, नोकरी, ड्रायव्हींग
लायसन्स, पासपोर्ट, पॅनकार्ड, रेशनकार्ड अशी विविध कामे मी हिरहिरीने करायचो. आमच्यापैकी कुणाचाच
विमा नव्हता त्यामुळे तो काढण्यासाठी कुणाकडे जायचे या विषयावर चर्चा करताना मलाच एजन्सी घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले होते. पुढे नोकरी  गेल्याच्या काळात एल. आय. सीच्या कमीशनवरच मी गुजरान केली. कॉमर्सचा गंध नसलेला आणि आकडेमोडीचा कंटाळा करणारा मी, विकास अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकांचे भविष्य नियोजन करू लागलो. मार्केटिंगचे धडे मला इथे उत्तम मिळाले
शिवाय व्यवहारज्ञान, व्यक्तीमत्व विकास, राजकारण, समाजकारण अत्यंत आपुलकीने आणि तळमळिणे त्यांनी मला शिकवले. 
      मी  जेव्हा मनिर आर्टस मध्ये केबल ऑपरेटर म्हणुन काम करत होतो तेव्हा मी ऍकर होण्याचे स्वप्न पाहिले होते. हे असे नवा जॉब नवा कार्यक्रम असल्याने सर्वजण 'मग आता कुठे?' असा मिश्कील प्रश्‍न विचारूण माझी खिल्ली उडवत! आता, बैठकीतील अर्धी मंडळी मला धडपडया म्हणुन चांगली मानत होती. कांही जुन्या जाणकारांच्या गळयातील मी ताईत बनलो होतो. शिवाजी पाटील ही त्यातीलच एक. ते हायकोर्टात कामाला होते(आता ते वारलेत) रविवारची सुट्टी माझ्यासोबत फिरण्यात, मजामस्ती करण्यात घालवत कारण ते मुंबईत नविन असताना माझ्या वडिलांनी त्यांना अशी साथ दिली होती. पाटलांनी मला क्लार्क म्हणुन ऍड.पांडुरंग पोळ यांच्याकडे पाठविले. पोळ हायकोर्टात सरकारी वकिल होते. मुळचे साता-याचे असल्याने आणि पाटलांच्या तर्फे शिफारस गेल्याने बिगर बायोडाटा माझे काम सुरू झाले. ऍड. पोळ यांच्याकडे फायलिंगचे काम मी करत होतो. त्यांच्याकडील जुने कारकुण शरद सुर्यवंशी वकिल झाले होते. अतिशय मानमिळावु आणि हुशार असे पोळ साहेब हायकोर्टात सुप्रसिद्ध असल्याने माझी कॉलर ताट असायची. मंत्रालयात ५:३० वाजता केस दाखल करणारा मी कारकुण होतो. पाल, गुप्ता वगैरे त्यांच्या अशिलांकडुन माझ्या दुपारच्या जेवणाची सोय व्हायची. 
          वकिलांचा कारकून म्हणून   मला ४००० मिळत होते. माझी वर कमाई व्हायची दररोज २०० रूपये . बौद्धिक   काम असल्याने ब-याच दिवसांनी चांगले काम मिळाल्याचा आनंद होता. वकतृत्व
स्पर्धेतील माझ्या यशाचे पोळ साहेबांना विशेष कौतुक वाटायचे. माझ्याकडे काम करत आपला मार्ग बनवायचा! हा त्यांचा सल्ला होता. वकिलीसाठी किमाण ५ वर्षे प्रतिक्षेचा काळ असल्याने मला त्यांनी
वकिलीला प्रवेश न घेण्यास सांगितले. मी मग माझ्या आवडीनुसार आणि सोयीनुसार बॉम्बे कॉलेज ऑफ
जर्नालिझम या के.सी कॉलेज या चर्चगेट मधील विद्यालयात मराठी पत्रकरीतेसाठी प्रवेश घेतला. कॉलेजची
१४००० फि पोळ आणि निकम साहेब यांनी प्रत्येकी ७००० रूपये देवुन भरली. गरीबांच्या केसेस एकही
पैसा न घेता हायकोर्टात चालविणारे पोळ वकिल मी पाहिलेत. गावाकडुन न्याय मागण्यासाठी आलेली गरीब मंडळीही जेव्हा मला साहेबांचा माणुस म्हणुन फायलिंग केल्याबद्दल १०० ते ५०० रूपये काढुन देत तेव्हा माझ्या मनात कालवाकालव होत. मी नकार देताच ते गयावया करत घ्याच म्हणुन मागे लागत.
क्रमशः 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income