सृजनोत्सव !

प्रजासत्ताक मासिकाला आज एक वर्षे पुर्ण झाले. वास्तविक प्रजासत्ताक तिमिरातुनी तेजाकडे असे
म्हणायला हवे कारण मासिकाच्या हेतुमागे दाखवायचे वेगळे दात कधीच नव्हते. कदाचित म्हणुनच प्रजासत्ताकच्या वाचकांनी वास्तवात राहुनच वाचण करावे अशी अपेक्षा सफल ठरली.....सुरूवातीच्या काळात
१५-२० लोकांसोबत गगणाला गवसणी घालण्याच्या आणि संपुर्ण परिवर्तणाच्या विचाराने (सर्वच क्षेत्रात उ
दा. नाटक, राजकारण, समाजकारण) दखलपात्र अशी सुरूवात झाली. अर्थातच त्यात नियोजनाचा अभाव
असल्याने वेळेचा आणि पैशाचा अपव्यय झाला. प्रजासत्ताकच्या ठिणगीत सत्याची, आत्मसन्मानाची,सृजनाची, उद्रेकाची आग होती - आहे आणि राहणारच कारण प्रेरणास्थानी असणारी प्रमाण
आणि लवचिक अशी राज्यघटना हाच एक महायज्ञ आहे. 
            जाणुन बुझुन आपल्या विचारांवर, आचरणावर जी जळमटे आहेत आणि कोणितरी हेतुपुर्वक कांही गोष्टी घडवुन आणत आहेत त्यांचे बुरखे टराटरा फाडुन लक्तरे करावित या भावणेने तर कधी कधी आक्रमक पवित्राही घेतला. ज्यांनी आपला पैसा प्रजासत्ताकसाठी लावला ते सर्व आजमितिला आमच्या सोबतच आहेत पण हळुहळु कांही  लोक जे फक्त ग्लँमरसाठी पत्रकारिता किंवा इतर आमच्या या सर्व पार्टटाइम उपक्रमात होते ते निघुण गेले मग नव्या लोकांसोबत नवि स्वप्ने घेवुन प्रजासत्ताक उभा झाला खरा मात्र तो छोटा दिसु लागला शिवाय भारतिय प्रजासत्ताकवर जसा आज कांही लोकांचा विश्‍वास नाही तसा या आगितुन फोफाटयात पडलेला छोटे सरकारला टी.सी. नंबरवरच समाधान मानत अभिव्यक्त होत राहावे लागले. पण मुंबई कांही केल्या शांत बसु देईना. रनजीत
हातकर या आमच्या सहका-याला फेसबुक पेजवर ३००० लोकांनी चांगला प्रतिसाद दिलाय. आणि जे मुंबईत
घडले त्याचा परिणाम महाराष्ट्रात झाल्याशिवाय कसा राहणार? खंडागळे या आमच्या प्रवर्तकांच्या मार्गदशनाखाली
गाव विकास समिति स्थापन होऊन संगमेश्वर तालुक्यात मोठे सामाजिक काम उभे राहत आहे. लोकांना विचार पटतात तसे ते येऊन मिळत आहेत आणि संघटना वाढत आहे. 
               मध्यंतरी सय्यद कादिर यांचा हात पकडून मोठी मजल मारण्याचा प्रयत्न टिम प्रजासत्ताकने केला पण तो कडुगोड आठवणीसोबत अयशस्वी ठरला. जीवनाच्याा लढाईत टिम प्रजासत्ताक प्रत्येकाला जसा यावर्षी  मान्सुन धावुन आला तशी कुठेणा कुठे मदतीस राहणारच आहे हे निश्चित.  आम्ही प्रत्येक अंकात आमची
भुमिका मांडली आहे.  त्यावरून आपणास कांही अंदाज आलेच असतील. सोबत आम्ही प्रत्येक वेळी
वेगवेगळया विषयांवर अभिप्राय मागवित असतो पण आजकाल कोणी पत्रे लिहित बसत नाहित सरळ फोन
करून शिव्या घालतात.  त्याचा प्रत्यय जेव्हा आम्ही माजी विदयार्थी सघटणेचे मुखपत्र असा लेबल चिकटवला
तेंव्हा आला. पण हेतुपुर्वक केलेल्या त्या कृत्याबदधल त्याचदरम्यान शिवमावळा वृत्तपरिवाराचा बेस्ट होम
मॅगझाीन ऍवॉर्ड प्रजासत्ताकला मिळाला मात्र आम्ही कोठेही गाजावाजा केला नाही कारण अशी प्रलोभणे
पत्रकारांसाठी कमी नसतात! मित्राच्या कविता घेऊन ठाण्याच्या साहित्य संमेलनात आम्ही फिरलो पण मुंबई
-पुण्याच्या प्रकाशन संस्थांनी प्रतिसाद दिला नाही त्याच सुनिल खवरेंनी 'आई' हा आपला कवितासंग्रह याच
दरम्यान प्रकाशित केला.
              असो, प्रजासत्ताक संघटणेचाच भाग असणा-या एका संस्थेने प्रजासत्ताक हे नाव विकत घेतले असुन
जरूर वाटली तर पुन्हा नियोजणपुर्वक नविन रजिस्ट्रेशनसह नव्या रंगात नव्या ढंगात येवु!  आमचे गावाकडील मित्र सुधिर सावंत (अध्यक्ष - माजी विद्याथीसंघटना, उत्तुर) यांचा विचार आम्हाला मान्य झालाय कि जशी गरज तशा संघटना आणि संस्था! तूर्त विकिलिकस आणि द न्युझ प्रमाणे प्रजासत्ताकला आपला मार्ग थांबवावाच लागेल!
नोकरी नाही, मदतिचे हात दुरावलेले, विचारांना पुर्णविराम मिळालेला २३ वर्षीय तरूण ज्याच्या सोबत पदव्या होत्या पण् हाताला काम नव्हते. मुलाखतींचा सपाटा लावला पण् काम पक्के होईना. पुन्हा
कर्जाचा डोंगर वाढु लागला होता. प्रजासत्ताकच्या विरोधकांचा हा मोठा विजय होता. 'गॉड फादर' हा
शब्द आता कुठे कळत होता ! लग्नाच्या वयात अशी बिकट अवस्था झाल्याने भविष्याचा त्रासदायक विचार
पाठ सोडत नव्हता. रनजित व मी फोर्टच्या ऑफिसमध्ये रात्री झोपायला जात असे तेंव्हा अगदी लहान
पणापासुनच्या संघर्षाची कथा शाळेतील करामती, कॉलेजमधील आठवणी व प्रजासत्ताकचे सिंहावलोकण अशी
चर्चा रात्री २ वाजेपर्यंत होत. चहालाही महाग झाल्याची परिस्थिती आल्याने वरळिच्या समुद्रकिणा-यावर
मित्रांसोबत कांहीकाळ घालवल्यावर बरे वाटले आणि मोठया निर्धाराने मी गाव गाठले. नोकरी शोधुन मित्र
पुन्हा मुंबईला बोलावणार होते. प्रजासत्ताक बंद केल्याची उत्तरे गावातही दयावी लागणार होती त्यामुळे शेत
गाठले व खालील शब्द जुळवण्यात आधार मिळाला.
दव
पहाटेच्या प्रहरी,
आभाळ दाटलं,
त्याच्या अश्रुंनी,
पृथ्वी न्हावुन निघाली!
त्या थेंबाच्या स्पर्षाने,
पाणे फुलली गर्वाने,
त्याच्या क्षणभंगुर जीवणाने,
आणले दु:खाचे उमाळे!
हा वेडा जीव,
कधी पहाटेचा मोती म्हणुन धावला!
कधी मृगजळ म्हणुन धावला!
कधी दवबिंदु म्हणुन धावला!
इतक्यात, तो नष्ट झाला....
क्रमशः 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income