विज्ञानात संधी



जीवनात कांही गोष्टी हया नियोजितच असतात. १२ वी विज्ञान शाखेला प्रवेश घेऊन  मी चुक केली असे
वाटत होते. मात्र नेमक्या  या हालाखिच्यावेळी नोकरीची संधी आली ती वैद्यकिय कंपनीत मार्केटिंगसाठी.
मोदी मुंडी फार्मा ही तशी नामांकित कंपनी! या कंपनीत एम. आर. म्हणुन माझा क्लासमेट सचिन पाटिल
काम करत होता. त्याच्या रेफरन्सवर मी मुंबईतील तीन मुलाखतीच्या पाय-या पास केल्या. प्रश्‍न नवा निर्माण झाला तो ट्रेनिंगसाठी दिल्लीला जाण्याचा. मराठी माणसांना दिल्लीचे बरेच आकर्षण पण् माझ्या खिशात पैसे नसल्याने ताबडतोब कसे जायचे हा प्रश्‍न पडला. रनजित, अवि, खवरे यांनी वर्गणी काढुन मला पाठविले.
           देशातल्या विविध ठिकानाहुन प्रशिक्षणासाठी आलेल्यांची सोय कंपनीने नेहरू प्लेस येथील पंचतारांकित हॉटेल मध्ये केली होती. कडक शिस्तीत प्रशिक्षण होत होते. मेडिकलचे ज्ञान व मार्केटिंग कौशल्याचे बाळकडु पाजले जात होते. बिगबॉसच्या आखाडयासारखे अर्धे उमेदवार प्रशिक्षणातूनच  बाहेर काढले होते. मुंबईतुन गेलेल्या १६ जनांपैकी केवळ ५ जनांना संधी मिळाली
त्यात माझा नंबर होता. कारण मला हि संधी सोडायचिच नव्हती. एका महिण्याच्या सहवासात बि.एस.सी,
एम.एस.सी, एम.ए, इंजिनिअरींग, बी.फार्म, केलेल्या श्रीमंत मुलांनी माझ्या नावाचा डांगेरा पिटला होता.
अल्पावधित शिक्षक आणि सहका-यांमध्ये मी प्रसिद्धीस पावले होतो कि मी  आर्टस करून परिक्षाही पास होतो व उत्तम इंग्रजीमध्ये संभाषनही करू शकतो म्हणुन..                
            दिल्लीतुन मुंबईत नोकरीची हमी घेवुन आल्यावर समजले कि माझ्यासाठी दोन नोक-या चालुन आल्या आहेत. पण् मोदी मुंडी फार्माशी वचनबद्ध केलेले इमान कसे विकता येईल.  पहिल्याच वर्षी वार्षिक बजेट  ऍचीव्ह करून स्व:ताची ही आर्थिक परिस्थीती सुधारून घेतली. आता २५० रू डेली भत्यामुळे राहणीमान सुधारलेच; शिवाय २०,००० महिणा पगार असल्याने विचारसरनीही बदलत होती. न चुकता ५००० रूपये क्लोझिंगच्या वेळेला स्टॉकिस्टला ऑर्डर काढण्यासाठी दयावे लागायचे. हा भ्रष्टाचार खपवुन घेणारा मीच प्रजासत्ताकमधुन भ्रष्टाचारावर रखाने भरून लिखान करत होतो. चाळु धुमाळे हा माझा दुसरा आदर्शवादी मित्र मी इथे कमवला. एल. आय. सी.चा धंदाही त्यावेळी जोरदार चालला होता.
मार्केटिंगमध्ये तुमच्या मॅनेजरशी  आपले व्यवस्थित असेल तोपर्यंत सर्व कांही व्यवस्थित चालते.फार्मा कंपन्यांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ फारच कमी मॅनेजर काम करतात.  दोन वर्षानंतर फार्मा मार्केटिंगमध्ये कंपनीने माझ्याकडे एल. आय. सी. एजन्सी आहे या कारणावरून मला काढुन टाकले आणि पुन्हा मी नव्या नोकरीच्या शोधात निघालो.
क्रमशः 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income