प्रजासत्ताक ची सुरूवात

                स्पर्धा परिक्षेचा स्ट्रगलर कँन्डीडेट असल्यामुळे प्रशासनाविषयी प्रचंड आत्मियता, आकर्षण आणि
प्रशासनातिल दुष्ट प्रवृत्तींविरूद्ध चिड असणारा मी पत्रकारीता हे समाजप्रबोधनाचे प्रभावि माध्यम माझ्यातील
नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी वापरत होतो. प्रदिप शिंदे हा ही माझ्यासारखाच १२ वी विज्ञानशाखा मग
बिए मराठी नंतर एम ए असा प्रवास करत स्पर्धा परिक्षांमध्ये सरकारी नोकरीसाठी गटांगळया खात होता.
आम्ही दोघांनिही इंडियानेट कंपनीमध्ये   मार्केट सर्वेचे काम  करत होतो. मुंबईतल्या बहुतेक  गल्या मी  पायी
पिंजुन काढल्या होत्या. 
           नवशक्तीसाठी दादरसारखा आशिया खंडातील सर्वात मोठा वृत्तपत्र डेपो सांभाळताना पत्रकारिता
व्यवसायात उडि टाकण्याचा विचार माझ्या मनात आला.नवशक्ती दैनिकात काम करताना ७००० पगार मिळायचा त्यातील दरमहिना ३००० वाचायचे.निकम सरांचे शिक्षणासाठी घेतलेले ७००० परत केल्यानंतर कांही महिण्यांनी पोळ वकिलांचेही पैसे देण्यासाठी गेले असता त्यांनी पैसे घेण्यास नकार दिला. 'मी पैसे परत देण्यासाठी मदत केली नव्हती मात्र तुला दयायचेच असतील तर ते निकम सरांच्या ट्रस्ट ला दे!' असे ते म्हणाले पण् ट्रस्टला देण्याइतपत माझे मण मोठे न झाल्याने मी माझ्या आयुष्यातला पहिला मोबाईल ४००० रूपयांचा त्यावेळी घेतला व पोळसरांच्या हस्तेच स्विकार केला.
            उपेक्षित कवी सु. शि. खवरे (आता ते अपेक्षित कवि आहेत) उपेक्षित नट व युवानेता(सतिश
खांडगे) यांना घेवुन विविध स्तरावर वैविध्यपुर्ण आणि प्रभावशाली काम करण्यासाठी स्व:ताचे प्रकाशन व
संस्था असावी असा विचार माझे परममित्र व धडाडीचे परिवर्तनवादी विचारवंत सुहास खंडागळे यांनी
माझ्यासमोर याच काळात  मांडला. शाळा कॉलेजवर जी.एस. म्हणुन नेतृत्वगुण गाजविलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला हि एकच ठिणगी पुरेशी होती. माझ्यासोबत अवि लोंढे, संदिप मेंगाणे, अमृत सुतार, अजित साबळे हि मंडळी तर सुहास सोबत नामदेव काशिद, मुकेश ठाकुर व पत्रकार मंडळी येणारच होती. २६ जानेवारी २०१० रोजी
पहिली मिटींग पोळ वकिलांच्या हायकोर्टजवळिल ऑफिसमध्ये केली. केवळ मी होतो म्हणुन कुठल्याही
गोष्टीचा विचार न करता तन मन धणाने माझ्यासोबत उभा राहिला तो माझा जीवलग मित्र रनजित हातकर.
मिटिंगसाठी हक्काची जागा मिळवण्यासाठी रनजितच कारणीभुत होता. सतिश खांडगे सोबत भारती
खोपटकर आणि भारती आहे म्हणुन तिची शिक्षिका सुनिता कर्निक मॅडम मिटिंगला हजर होत्या. 
(सतिश-भारती शुभविवाह आमच्या या चळवळिची निशानी सध्या आहे)
           प्रत्येकजण आपआपल्या नेटवर्क मध्ये 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे!' नाटक/सिनेमा,
पत्रकारिताा, शिक्षण ,सामाजिक, राजकिय इ. क्षेत्रात आपआपल्या आवडीनुसार पुढाकाराने कार्य करावे
त्यात सर्वांची मदत मिळेल असे ठरले. प्रथम आपला विचार लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी मासिक काढायचे
ठरले.संपादक म्हणुन माझी नियुक्ती केली गेली. या मीटिंगनंतर सर्वांनी कॉन्ट्रीब्युशनमध्ये जेवण केले. इथुन माझ्या
 पत्रकारितेच्या अध्यायाला सुरूवात झाली.  टायटल रजिश्ट्रेशनसाठीचे दोन अर्ज दिल्ली दरबारी नापास
झाल्याने सर्वांमध्ये नाराजी पसरली. अचानक सुहासला प्रजासत्ताक हे नाव आमच्या मिटिंगच्या
आठवणींवरून सुचले. नेमके तिस-यावेळी 'प्रजासत्ताक तिामिरातुनी तेजाकडे' हे नाव आम्हाला आरएनआय कडून मिळाले.वृत्तपत्र व्यवसायातील सर्व प्रशासकीय कामकाजाचा   कुणाचेही मार्गदर्शन न घेता स्वखर्चाने शिकता शिकता मी अनुभव घेत होतो आणि  प्रजासत्ताक मासिक मुर्त स्वरूप घेत होते. जिद्दी, मेहनती, मोहोळ तयार करण्याचे काम सुरू झाले. नुसतीच कल्पनारम्यता नाही तर साक्षात स्वत्वाचं सत्यत्व सिद्ध करणारा प्रजासत्ताकचा पहिला अंक १००० प्रतींचा छापण्यात आला. त्यासाठी ५०० रू. कॉन्ट्रीब्युशन प्रत्यकाने काढले होते. पुढच्या अंकांचे पैसे अधिच घेण्याची तरतुद करून दुसरा मग तिसरा असा उपेक्षितांना न्याय देणारा अपेक्षितांचा प्रजासत्ताक अल्पवधित लोकप्रिय झाला. 
            आमच्या शेअर्स होल्डर्सच्या गावाकडेही अंक पार्सल रूपाने पोहचत होता. मुंबईमध्ये वृत्तपत्र स्ट्रॉर्ल्सवर, सरकारी कचे-यांमध्ये, वाचनालयांमध्ये मी स्व:ता अंक पाठवत होतो.अनेक ठिकाणी माध्यम पोहचत नाही अशा सामाजिक संस्थांपर्यंत पोहचुन प्रजासत्ताक त्यांना प्रसिद्धी देत त्यामुळे आमचे वितरण वाढत होते. याचवेळी माझ्या मनात गावामध्ये प्रजासत्ताक मासिकाच्या माध्यमातुन आणि नेतृत्वगुगुणांना  वाव मिळण्यासाठी विद्यार्थी संघटणा निर्माण करण्याचे विचार आले. 'हा काळच असा राजकीय व्यक्तींमागे स्वताची संघटणा व मुखपत्र असण्याचा होता'. गावातही तसे योग्य वातावरण होते कारण माझे सहकारी मित्र कृष्णात शिंदे, प्रविण पावले, श्रीपाद पोटे, तुषार खेडेकर, प्रेमकुमार आळवेकर, अभिजित पावले आपला छावा क्रिकेटचा संघ रजिस्टर्ड करण्याच्या उद्देशाने माझ्याशी विचारणा करत होते. त्यांना मी माझी विद्यार्थी संघटनेची संकल्पना सांगितली व ती मान्य झाली. माझ्या वर्गातील मित्र प्रदिप पोटे, अविनाश धुमाळ, श्रीकांत पावले,संदीप पोटे, जितेंद्र येजरे,एकनाथ कदम व दत्ता पाटील यांना पटवणे मला अवघड नव्हते. त्यानुसार माजी विद्यार्थी संघटनेचे माध्यम प्रायोजक म्हणुन प्रजासत्ताक प्रसिद्ध झाले.कोल्हापुरात प्रजासत्ताक मासिक पोहोचले विध्यार्थी संघटनेचा विचार म्हणून तर दुसरीकडे  रत्नागिरीमध्ये   सुहास खंडागळे यांच्या गावी आम्ही  गाव विकास समितीची स्थापना करून तिकडेही प्रचार आणि प्रचार सुरु केला. 
क्रमशः 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income