पुन्हा पत्रकारितेकडे .....

          मार्केटिंगच्या अनुभवामुळे इतर बरेच मार्ग माझ्यासाठी बंद झाले होते. मला आता शेवटचा एकच मार्ग दिसत होता तो म्हणजे मराठी वृत्तपत्र. फार्मा कंपनीच्या पगाराच्या तुलनेत अर्ध्या पगारावर मी श्री. सतिश धारप यांच्या विश्‍वरूप या रायगडच्या जिल्हा वृत्तपत्रात पत्रकार म्हणुन दाखल झालो. सुनिल कर्णिक मॅडम यांचे लेख आणि सुनिल खवरे यांच्या कविता आता विश्‍वरूपमधुन प्रसिद्ध होवु लागल्या होत्या. सहा महिने  विश्‍वरूपमध्ये रूळल्यानंतर माझ्यातील पत्रकार नव्याने जागा झाला. ब-याच वेळाने लेखाणी पुन्हा हातात आली तसा शब्दांशी खेळ पुन्हा सुरू झाला. किती दिवस चालायचे, कसे चालायचे आनि कुठे पोहचायचे याचा थांगपत्ता पत्रकाराच्या आयुष्यात नसतो. तरीही तटस्थपने आणि त्रयस्थपनाने चांगल्या वाईटाचे गुनावगुन सांगणे. नविन कांहीतरी सुचवणे हे आलेच! प्रजासत्ताक मासिकाच्या आठवणीत रमताना माझ्या आयुष्यातील एका दिवास्वप्नासारखे भराभर दिवस डोळयासमोरून जातात आणि श्‍वासातील सुस्कारातुन प्रचंड कष्टाचे त्रासदायक दु:ख हवेत विरूण जाते. हा सगळा आयुष्याचा एकाकि संघर्ष पुस्तक रूपाने मांडावा हे ही स्वप्न मी पाहु लागलो.
स्वप्न
स्वप्ने ही स्वप्नेच असतात,
म्हणजे ती असत्य असतात;
स्वप्ने हि त्यांना पहायची असतात,
जी ती सत्यात उतरवु शकतात !
स्वप्ने हि त्यांनी पहायची नसतात,
ज्यांची स्वप्ने हि स्वप्नेच असतात!
पण् काय करणार?
बोलवायच्या आधी ती येतच राहतात !
कधी दिवस्वप्नातुन ! कधी स्वप्नगरीतुन !
स्वप्नात वाट्टेल तसं घडत,
हव्या त्या पात्रांनी स्वप्न सजतं,
मध्येच सुगंध, वारा येतच राहतो ,
आणि आपण त्यात गुंतत जातो !
आपल्याला शक्तीचा भास होतो,
लगेचच दुस-या विश्‍वात प्रवेश होतो,
देहावरचा मनाचा विश्‍वास संपतो,
आणि आपण चक्क मनाशीच खेळतो !
सत्य असो वा असत्य,
समाधान मिळत राहते;
देहाबरोबर मनही विश्रांती घेते!
खरच, स्वप्नात कसे?
घडतं अगदी हवं तसे !
क्रमशः 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income