पत्रकारितेची खडतर सुरूवात !

 पत्रकारीतेच्या वर्गातील धडे गिरवताना मला हायकोर्टातील क्लार्कच्या नोकरीत आपले भविष्य नसल्याचा
पक्का निर्धार झाला होता. माझा जिवलग मित्र रनजित हातकर योगायोगाने काम शोधत होता. त्याला पोळ
लिगल ज्युरीस मध्ये चिकटवुन मी तेथुन काढता पाय घेतला. आतापर्यंतच्या प्रत्येक जुण्या कामाच्या ठिकाणी
आपली निशाणी मी सोडलेलीच होती तशी इथेही ठेवली. आज रनजित वकिल आहे. मला पहिला धक्का
बसला जेव्हा मी तुटपुंज्या माणधनावर मुंबई मेट्रो या पोळ साहेबांच्या अशिलांच्या हिंदी साप्ताहिकात पत्रकारीतेची सुरूवात केली तेव्हा. साप्ताहिक महिणाभरात एकदाही निघाले नाही.  पण् तेथील ऑफिस सहाय्यक  असणा-या विवाहित मुस्लीम मुलीला माझा स्वभाव फार आवडला. एकदा तर तिने लाइट बंद करून किस ची ऑफर दिली पण् मी मनातुन इच्छा असतानाही घाबरून गेलो होतो. कारण आमच्या मंडळाच्या(बैठकीच्या) खोलीत लफडयाची नुसती बातमी पोहचली तरी बोजा बिस्तारा बाहेर पडेल म्हणुन! शिवाय निति, संस्कृतीच्या असंख्य बधनांनी मला चारी बाजुंनी बेडया घातल्याने त्या ऑफरला मी प्रतिसाद दिला नाही.  दुस-या महिण्यांत कंपनीने न निघणा-या साप्ताहिकलातोटयात जावु न देता आम्हा दोघांची नोकरी हिरावुन घेतली त्यानंतर आम्ही कधी संपर्कात आलो नाही.
         पुन्हा जमिनीवर आल्याने नोकरी शोधणे हे माझे आघाडीचे काम सुरू झाले. पत्रकारीतेचा अभ्यासक्रम  पुर्ण होत आला असताना लोकसत्ता,प्रहार, मटा, नवाकाळ,सकाळ इकडे मी पत्रे लिहुन कामाची अपेक्षा केली. प्रथम
लोकसत्ताच्या श्री.विनायक परब यांनी मला बोलावुन घेतले आणि 'कॅम्पस मुड' हया कॉलेजच्या पानासाठी
नेमले. कॅम्पस क्ल्बची मुले मला सामावुन घेत नव्हती पण् मी लोकसत्तेचे काम जवळुन पाहत होतो.
कॉलेजच्या पानाचा  अंदाज येत होता पण् त्यावेळी  मराठी टायपिंग येत नसल्याने मी कॅम्पसला रामराम ठोकला आणि शब्दांना सत्याची धार म्हणत दैनिक  प्रहारची ऑफर स्विकारली. इथल्या वैभवी मॅडमला मी सहाय्यक म्हणुन बराच बातमी विषय  आनुन दयायचो. दोन महिन्यानंतर मला अचानक इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे वेड लागले आणि दुरदृष्टी ठेवुन मी विसपुते सरांच्या भरोशावर आकाशवानी मध्ये ट्रेक्स म्हणुन जॉईन झालो. माझ्या कॉलेजवर लेक्चरला तसेच लायब्ररीत जसे मी माझ्या गाववाल्या मित्रांना आणायचो तसे आकाशवाणीत मित्रांना घेवुन फिरायचो. विविध पत्रकार परिषदेला जावुन आवाज घ्यायचा तो एडिट करायचा. ऍल्बम बनवायचा अशी
काम शिकता शिकता माहिना सरला. पगाराच्या वेळी समजले कि सिनिअर ट्रेकसचा दोन महिने पगार दिलेला
नव्हता. नवख्या प्रवेशकर्त्याला शिकावु म्हणुन सर्वच माध्यामांमध्ये वापरून घेणे हा त्याकाळचा नियमच
होता. मी पगाराची अपेक्षा न ठेवता तिथुनही पळ काढला. 
             माझी सर्व धडपड सलामवाडे भाऊ बघत होते.त्यांनी मला नवशक्तीच्या वितरण व्यवस्थापक गणेश कदम साहेबांकडे  पाठविले. मी आता मुलाखतीत प्राविण्य मिळविण्यात हुशार झालो होतो. हे कदम हि साता-याचे असल्याने त्यांनी नवशक्ती परिवारात मला वितरण प्रतिनिधी म्हणुन संधी दिली. मुळात पदवी आणि नंतर पत्रकरिता अभ्यासक्रम शिकुन हिरो बनु पाहणारा मी डेपोवर माझा सहकारी राजेश येलवे सह व्हिलन म्हणुन अवतरलो. इथुन नवा अध्याय सुरू झाला. वृत्तपत्र वितरणाचा व्यवसाय रद्दी या शब्दापासुन सुर होतो. डिएनए, एचटी, टाइम्सची स्कीम चचेत असताना फ्रि प्रेस या १ रूपयच्या दैनिकाच्या वितरणासाठी डेपो चालकापासुन विक्रेत्यापर्यंत कडी नजर ठेवावी लागे. डेपो कन्ट्रोल झाला कि स्टॉल व्हिजीट आणि फ्रि कॉपी चेकिंग असा दिनक्रम होता.आठवण्यातुन एकदा पेपर वाढिसाठी मार्केटिंग असे. वृत्तपत्र विक्रेत्यांना वाटायला मिळणारे  गिफ्ट, बॅनर, वेगवेगळ्या पिशव्या  ब-यापैकी जमा करून मित्र आणि माझे एलआयसीचे  कस्टमरला यांना  याच कारकिर्दीत भेट म्हणून देत होतो. 
             राजेश येलवेसोबत त्याच्याघरी मी आयुष्यात पहिल्यांदाच वयाच्या २४ वर्षाचा झाल्यावर मॅगी बनवुन खाल्याची नोंद कराविशी वाटते. पिज्जा, बर्गर सारख्या फास्टफुडशी ओळख मला आताकुठे होत होती. विक्रमदाच्या कॅन्टीनला (विक्रम झूम टीव्ही चॅनलच्याकॅन्टीनमध्ये सहाय्यक कुक होता) अधुन मधुन चक्कर मारीत तेव्हा ग्रील सॅन्डविच, फ्राय इडली, मेदुवडा अशा पदार्थांची ओळख झाली होती. मेंदुवडा तर सुरूवातीला मी खायचेच टाळले होते.  आज कुठे बाहेर गेलो तर अशा पेटंटेड फुडवर माझा जोर असतो कारण
सर्वत्र सारखी चव असते. मात्र तेव्हा हया आठवणी आल्याशिवाय राहत नाहीत! 
              दै.नवशक्तीमध्ये सकाळचे संपादक श्री.विनायक पात्रुडकर आले आणि बदलाचे वारे वाहु लागले. गणेशोत्सवात मंडळाच्या गणपतीचे फोटो लावुन २०० पेड कॉपी आम्ही ५०० रूपयांना बुक करून आम्ही वाटत असु.अगदी कामाठीपुरातले गणपतीही आम्ही सोडले नाहीत. अधुन मधुन मी बातम्या देत असल्याने पत्रकार आणि उपसंपादक मंडळींचा माझ्यावर रोष होता. सकाळी अंथरूणातुनच खोटे रिपोर्टिंग करून कामाचा गाडा चालला होता. डेपोवरचा आवाज रेकॉर्ड करून तो बॅग्राऊंड साऊंड म्हणुन वापरून डेपोवर असल्याचा आव आणत मी सिनिअरशी फोनवर बोलत असे. मराठी टायपिंग तर दुर इंग्रजी टायपिंगचा क्लास लावला असता कंटाळुन मी पहिल्या आठवडयातच क्लासला जाणेच  बंद केले. गुगलच्या जी मेलवर फोनेटिकमध्ये मराठी टायपिंग  करत मराठेशाही नावाचा ब्लॉग मी सुरू केला. ठाण्याच्या मराठी अभ्यास केंद्राचा माझ्यावर फार प्रभाव होता. त्यांच्या लढा मराठी शाळांचा आणि युनिकोड या चळवळिंची दखल घेतच त्यावेळी तत्कालीन शासनाने  नवा मराठी विभाग सुरू केला . श्री. सचिन परब आणि श्री. पराग पाटिल यांच्या मागदर्शनाखाली माझे ब्लॉगींग आणि
नवशक्तीमधील पत्रकारीता सुरू होती.
------*** ------
लघु-उद्योगासाठी लागणारा सय्यमिपना आणि मराठी मानसिकता
नवशक्ति या कौटुबिंक आणि दखलपात्र वृत्तपत्रासाठी वितरण प्रतिनिधी म्हणून काम करत असताना
वृत्तपत्रविक्रेते, वितरक  यांच्यासोबत जे अनुभव आले ते न रहावल्याने लिहिले. 
बहुतेक मराठी वृत्तपत्रविक्रेते असताना परप्रान्तियांनी या व्यवसायातही चांगला जम बसवालाय. 
पैशा-पैशा चा हा खेळ जमविता जमविता आजही हा ज्ञानदाता उपेक्षितच आहे. त्यांना हक्काचे स्टॉल
नाहीत. सरकारचे या संदर्भात निश्‍चित धोरण नाही. आता बरेच वृत्तपत्रविक्रेते आगळ-पगळ स्टॉल
राजकारणी, प्रशासकीय यंत्रणा यांच्या कृपाआशिर्वादाने लावतात तो भाग वेगला! वृत्तपत्रविक्रेते ज्या वृत्तपत्रासाठी काम करतात त्यांची ताकत एवढी आहे की ते क्रांति घडवू शकतात मात्र तसे का होत नाही?
कारण वृत्तपत्रविक्रेता संघाना राजकीय बाज चढ़ल्याने सर्वत्र एकसंघताा दिसत नाही! वृत्तवाहिन्यांचा प्रसार
आणि प्रसिध्दीपाहता काही दिवसानी वृत्तपत्रविक्रेत्यांना  कोणी विचारणार नाही असा नाराजीचा सूर वृत्तपत्रविक्रेतत्यांचा दिसतोय! तशी परिस्थिति खरच ठरेल जर न्यायालयात वृत्तवहिन्यांचे फुटेज ग्राहय धरले
जाईल.असो, आपला विषय लघु-उध्दोगासाठी लागणारा सय्यमिपणा! 
              भर पावसात सकाळी  ५ वाजताा चचगेट डेपोवर पोहचलो! पावसामुळे कुणाला काहीच न बोलता वळचनिचा आधार घेवुन पेपर वाचत होतो. थोड्यावेळाने आमची ठरलेली चहा ठरलेला चहावाला घेवुन आला तो पुरता भिजला होता. पाण्याने सुरकुत्या पडलेल्या हातातील किटलितुन गरम चहाच्या वाफा येत होत्या. त्याचा गरीब चेहरा, वाढलेली दाढी आणि चेह-यावरील शांत भाव पाहून वयाने मोठ्या असनारया त्या माणसाची माझ्यासारख्या भावनिक माणसाला दया येने साहजिकच!  त्याची कटिंग चहा थोडी न आवडणारी शिवाय लहान कपामुले प्रतिस्पर्धी चहावाला मला आकर्षित करत होता पण त्याचा आजचा अवतार पाहून एका मराठी चहाविक्रेत्याची आठवण झाली तो प्रसंग सांगण्यासाठी हा उहापोह!
                 त्यावेळी मी ताडदेव डेपोवर काम करत होतो. असेच एकदिवस असे दिसले की डेपोवर आज चहा
घेवुन कोणीतरी मराठी  माणुस केविलवाना चेहरा करून फिरतोय! एक गोष्ट निश्‍चीत केली की या
वाघावर कोणतेतरी संकट आल्याने तो चहा विकतोय पण त्याची मानसिकता त्याला झुकायला विरोध करत
होती. घडले असे, ठरलेला चहावाला(तो ही भय्याच.) असल्याने कोणी याच्या कड़े चहा घेईना. हा
आपला चहा-चहा करत मराठी वृत्तपत्रविक्रेत्यांकडे आशेने पाहत पण् हा कोण नविन? अशा अविर्भावात
सर्व विक्रेते त्याच्याकडे पातह होते. याच्याकड़े चहा घ्या! उद्यापासून लवकर येत जा हो!, परशुराम म्हणाला
परशुराम माझा आवडता एजंट (तो नवशक्ती चांगला सेल करतो म्हणून नव्हे तर तो माझ्यासारखा साने
गुरूजींच्या विचारांचा वाटतो शिवाय त्यांच्याच गावाकडील आहे तो. खो घालना-या विक्रेत्यांपेक्ष्या नविन
काहीतरी म्हणून का असेना प्रोत्साहन देणारा परशुराम मला भावला.
             चहाचे हे सर्व अर्थकारण चालले होते ३ रूपयांवर (आता चहा  ५ रू, झालाय)तात्पर्य हेच छोट्या माणसांची छोटी स्वप्ने छोटी भूक आणि त्यांच्यावर आधिकार गाजविनारी आणि करोडोंचा घोटाळा करणारी शिवाय देशध्दाराची स्वप्ने दाखवणारी माणसे ही तफावत माझ्या देशात कधी संपणार? पत्रकारीतेचा अभ्यासक्रम पुर्ण झाला होता. इथेही मला मुलगी पटवता आली नाही. मी मुलीला विचारण्यापेक्षा एखादया मुलीने मला प्रपोज करावे या पवित्रयात मी असायचो. 'टाइमपास' लव्हस्टोरी मध्ये मला अजिबात सारस्थ नव्हते मला हवी होती ती लाइफ पार्टनर! वीशी पंचविशितला प्रत्येक युवक कवि, प्रेमी आणि ध्येयवेडा असतो असे वि.स.खांडेकर म्हणतात ते मला तरी तंतोतंत लागु पडते. प्रेमाच्या कल्पनेच्या दुनियेत मी खालील रचणा याच काळात केली. 
मला ही आवडेल,
दुर एकांतात जायला,
लोकांना चुकवुन,
कोणाचीतरी वाट पहायला!
मला ही आवडेल,
कोणासाठीतरी फुले घ्यायला,
हकक दाखवत,
उशीर झाला म्हणुन रागवायला!
मला ही आवडेल,
वाट पहायला लावायला,
थोडेसे राागावुन,
त्यांची समजुन काढायला!
मला ही आवडेल,
प्रेमावर भाष्य करायला,
विश्‍वास टाकुण,
त्यांना आवडेल तसं वागायला!
क्रमशः 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income