नावात काय आहे ?

          भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदु धर्मातील जातीभेदापासुन कायमची मुक्ती मिळविण्यासाठी धमांतराचा मार्ग अवलंबिला. हे धर्मांतर त्यांच्या संपुर्ण समाजाचे झाले नाही.  शिवाय वेगवेगळया कारणांवरून धर्मांतरे झाल्यावर हिंदु धर्मांत शिल्लक राहणार तरी कोण! असो, आरक्षणाचा मेवा खात आपली आर्थिक परिस्थीती सुधरली तरी सामाजिक दर्जा/मान सन्मान आजही म्हणावा तितका मिळत नसल्याने माझ्या अनेक मित्रांनी  नाव  बदलण्याचा (गॅजेट) संविधानिक मार्ग अवलंबिलाय. त्यांना नावे हवी आहेत पण आडनावे नकोत कारण काळाबरोबर नावे बदलतात आडनावे तशीच राहतात. आडनावांतल्या बदलाचे उदाहरण पहा, माझे पुर्वज आमच्या आजरा तालुक्याजवळील खेड गावाचे पाटील त्यांनी ते गाव सोडुन झुलपेवाडीत आल्यानंतर झाले खेडेकर. तेही विदाऊट गॅझेट! आडनावाच्या आदानाची ही प्रक्रिया संख्याबळ किंवा अनुकरणातुन होत असुन काहीना तर चकक अमराठी नावे, आडनावे हवीत. 
      मला माझ्या नावाबाबत घडलेले ठळक प्रसंग आठवतात. बाबुराव खेडेकर हे माझे अस्सल मराठी, ग्रामीण, कोल्हापुरी नाव पण ज्या ज्या मुंबईतल्या कॉलेजच्या मित्रांना माझे नाव समजत तेव्हा ९५ टक्के मित्र नाव बदलण्याचा सल्ला देत आणि मी नावात काय आहे? या शेकसपिअरच्या सिद्धांतावर ठाम राहत त्यांची मागणी फेटाळुन लावत! 
           काही जवळच्या मित्रांनी तर नाव बदलण्याचा आक्रमक पवित्रा घेतला होता आणि त्याचवेळी कॉलेजच्या माय मराठी ग्रुपने तर मला बेबो म्हणायला सुरूवात केली पण बेबो म्हणजे करिणा कपुर मग बॅब्स म्हणत पण कालांतराने बॅब्स मला ही व त्यानाही गैरसोईचे वाटले. ग्रुपमधल्या मुलांची नावे पहा अमरसुतार म्हणजे अमी, मंगेश कांबळे म्हणजे मॅगी,अनिल म्हणजे निल तसाच सॅम वगैरे.....
मी कॉलसेंटर  मध्ये काम करतानाचा अनुभव पहा. पीसीवर लॉगीन करायला बसलो तेव्हा
मदतीसाठी आलेल्या एस.एम. ई ने विचारले, बाबुराव! किसने नाम रखा रे तेरा ये? मी म्हणालो,
'ऑफकोर्स यार, मॉं बाप ने !' तो पटकन कैसे कैसे कॉमेडी नाम रखते है ना मॉं बाप भी? म्हणत निघुन गेला.  पुढे काम करताना म्हणजे कॉल घेताना एखादा कठिण कॉल आला ज्याचे उत्तर आपल्याजवळ नाही तेव्हा तो पुढे सिनिअरकडे पाठवायचा असतो. आता हे एकस्टेंशन नेहमी बिझी असायचे आणि आमचा कॉल टाईम वाढायचा. एकदा मी कॉल एकस्टेंशनला पाठवला तोच समोरून प्रतिक्रिया आली ती अशी, बोल बाबुराव खेडेकर! कुठुन खेडयावरून कॅाल आलाय काय? माझ्या नावाचे लोकांना व्यंग का करावेसे वाटते कुणास ठाऊक पण ते काहीकाळ स्वताःचे मनोरंजन करून घेतात यात समाधान मानायचे. केरळमध्ये बाबु नावासाठी एक गोष्ट सांगितली जाते तेथील लोक मासे खावुन येत आणि त्यांच्या तोंडाचा वास येई; म्हणुन इंग्रज त्यांना बा म्हणजे माणुस आणि बु म्हणजे वास येणारे! हे सर्व न पटण्यासारखे पण प्रचलित आहे.  शिवाय आपल्याकडे बाबुशाहिवर लगाम, सरकारी बाबु खुश अशी वर्तमान पत्रांची हेडिंग्ज असतातच ......
क्रमशः 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income