दिव्यातील आगरी, कोळी आणि वारकरी भवनासाठी १५ कोटींचा खासदार निधी


·        भुमीपुत्रांची संस्कृतीपरंपरा ठसठशीतपणे दिसणारदिवा बेतवडे गावात होणार आगरी-कोळी आणि वारकरी भवन

 

ठाणेः कोकण पट्ट्यातील ठाणे जिल्ह्यात मुळचे भूमीपुत्र असलेल्या आगरीकोळी समाजाची संस्कृतीपरंपरा आणि ओळख पुढील पिढ्यांना व्हावीया उद्देशाने आगरी भवन उभारण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पाठपुरावा करत होते. ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा - बेतवडे गावात यासाठी असलेल्या सुविधा भूखंडावर  आता आगरीकोळी आणि वारकरी भवन उभारले जाणार आहे. भवनाच्या उभारणीसाठी नगरविकास विभागाने तब्बल १५ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आगरी-कोळी आणि वारकरी भवनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

ठाणे जिल्ह्यात आगरीकोळी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. आपल्या पारंपरिक कामांपासून दूर जात या समाजातील बांधवांनी गेल्या काही वर्षात इतर कामे स्विकारली आहेत. बहुभाषिक होत चाललेल्या शहरांमध्ये स्थानिक आगरीकोळी समाजाची ओळख नव्याने ठसठशीतपणे होण्याची गरज आहे. आगरीकोळी समाजाची संस्कृती जोपासली जावी. आगरी समाजातील बांधवांना आपली संस्कृती टिकवण्यासाठीसांस्कृतिक उपक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे या भावनेतून ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा बेतवडे गावात आगरीकोळी आणि वारकरी भवन उभारण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे प्रयत्नशील होते.

 

बेतवडे गावातील सर्व्हे क्रमांक ३६ हा भूखंड पालिकेच्या सुविधा वापरासाठी होता. येथे या भवनाच्या उभारणीसाठी निधीची आवश्यकता होती. स्थानिक नगरसेवक रमाकांत मढवीसुनीता गणेश मुंडेदर्शना चरणदास म्हात्रेदीपक नामदेव जाधव यांनी या भवनाची आग्रही मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली होती. त्यासाठी विविध पातळ्यांवर डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला. अखेर दिवा बेतवडे गावातील नियोजीत जागेवर आगरीकोळी आणि वारकरी भवन उभारण्यासाठी नगरविकास विभागाच्या माध्यमातून १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  दिवाळीच्या सणात राज्य शासनाच्या नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेल्या या निधीमुळे या भवनाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांचे आगरीकोळी आणि वारकरी बांधवांच्या वतीने आभार मानले आहेत.

 

·        असे असेल भवन

 

आगरी-कोळी समाजाची एक वेगळी ओळखसंस्कृतीचे दर्शन सर्वसामान्यांना व्हावी यासाठी या भवनात स्वतंत्र दालन उभारले जाणार आहेत. यात कलादालनसभागृहमंचस्वच्छतागृहप्रेक्षागृह अशा गोष्टी समाविष्ट असतील. नागरिकांना आगरी समाजाची ओळखसंस्कृतीजडणघडणपरंपराइतिहासमहत्व कळण्यास मदत होईल.

भवनात वारकऱ्यांसाठी स्वतंत्र दालन उभारले जाणार आहे. हे भवन सामाजिक बांधिलकीचे प्रतिक ठरेल अशी प्रतिक्रिया कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income