कल्याणमध्ये आंबेडकर भवन निमित्ताने मराठा भवनच्या मागणीला जोर

ठाणे :- (बाबुराव खेडेकर) कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठापुराव्यामुळे कल्याण पूर्व येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा झाला असला तरी या भागात मराठा भवन मागणीसाठी मराठा समाज पुन्हा आग्रही झाला आहे. मराठा भवन साठी खासदारांचे वारंवार लक्ष वेधुनही हालचाली होत नसल्याने येत्या महापालिका निवडणुकीत हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे.
        कल्याण पूर्व भागात ‘ ड ‘ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत गेल्या अनेक वर्षांपासून राज्यघटनेचे शिल्पकार महामानव प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारावे या नागरिकांच्या मागणीची दखल घेत या स्मारकासाठी प्रयत्नशील राहून ५ कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच उपलब्ध करण्यात आला. परंतु प्रभाग समितीचे आरक्षण असल्याने या जागेवर स्मारक उभारणीत तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. आरक्षण बदलण्यासाठी पुढाकार घेत अखेर काही महिन्यातच सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या जागेवरील १३०० चौरस मीटर क्षेत्राचे आरक्षण क्रमांक ४२३ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी बदलण्यात आल्याने आता येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. स्मारक उभारणीच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन लवकरच स्मारकाच्या प्रत्यक्ष कामाला देखील सुरुवात होणार आहे. याबाबतची माहिती श्रीकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिली आणि आंबेडकरी जनतेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले . मात्र असे असले तरी गेली अनेक वर्षांपासून येथील मराठा समाज मराठा भवनसाठी सातत्याने मागणी करत आहे त्यांच्या पदरी सध्या तरी काही पडलेले नाही. त्यामुळे मराठा भवन हा विषय या परिसरात पुन्हा चर्चेचा विषय आहे. खासदार श्रीकांत शिंदे हे स्वतः जातींने याकडे लक्ष देतील का हे पाहावे लागेल.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income