अनुसूचित जातीतील तरुणांनी केंद्र शासनाच्यास्टँड अप इंडिया योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


 

ठाणे : अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील नवउद्योजक तरुणांसाठी केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत कर्ज मिळणार आहे. तरी ठाणे जिल्ह्यातील नवउद्योजक तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बलभीम शिंदे यांनी केले आहे.

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीतिमित्त केंद्र शासनाने अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांसाठी स्टँड अप इंडिया ही योजना सुरु केली आहे. या योजनेमधून  महाराष्ट्र शासनाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अन्वये जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकांतील तरुण नवउद्योजकांना १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने स्टँड अप इंडिया योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी अनुषंगाने नवउद्योजकांना प्रकल्प मुल्याच्या १५ टक्के हिस्सा (अनुदान) शासनामार्फत देण्यात येणार आहे. पात्र इच्छुक नवउद्योजकांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, कार्ट नाका, ठाणे या कार्यालयाशी संपर्क साधावाअसे आवाहन श्री. शिंदे यांनी केले आहे. 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income