पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या फसवणुकीचा विषय मंत्रिमंडळात गाजला !

पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार

परतावा मिळण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी

- राज्यमंत्री शंभुराज देसाई

 

            मुंबई, दि. 25 : पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणुकदारांना नियमानुसार परतावा मिळावा यासाठीच्या प्रक्रियेला गती देण्यात यावी. संबंधित सक्षम प्राधिकरण अधिकारी यांनी कंपनीच्या मालमत्तेच्या लिलावासंदर्भातील प्रकिया तातडीने राबवावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यासदंर्भात राज्यमंत्री श्री.देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री श्री.देसाई यांनी आर्थिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या.

            राज्यमंत्री श्री.देसाई म्हणालेसिंधुदुर्गअमरावतीसातारानाशिकनवी मुंबईनागपुर येथे या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून५१ लाख गुंतवणुकदारांची फसवणूक झाली आहे. या गुंतवणुकदारांना दिलासा देण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने मालमत्ता लिलावाची प्रक्रिया करण्यात यावी. संबंधित सक्षम अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा असे निर्देशही राज्यमंत्री श्री.देसाई यांनी दिले.

            या बैठकीस आमदार प्रकाश आबीटकरआमदार किशोर पाटीलगृह विभागाचे उपसचिव रमेश मनाळे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income