साहित्यीक संदीप मेंगाने राज्यस्तरीय उडान समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मुंबईस्थित समाजसेवक संदीप दत्तात्रय मेंगाणे यांना उडान फाउंडेशन तर्फे नुकत्याच आयोजित केलेल्या दिमाखदार सोहळ्यात राज्यस्तरीय उडान  समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष भूषण लाड, उर्वी वुमन फौंडेशनच्या अध्यक्षा सारिका पाटील, धर्मादाय सहआयुक्त शिवाजीराव नाईकवाडे , गटशिक्षणाधिकारी गणपती कमळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
          ग्रामीण कोल्हापुरातील बामणे गावचे सुपुत्र कवी,लेखक,गीतकार समाजमाध्यमात शादपुत्र उमाकांत नावाने परिचित व गावात शाहीर या नावाने ओळख असलेले मेंगाने लहानपणापासूनच समाज सेवेची आवड असल्याने अनेक मंडळे , प्रतिष्ठान व मित्रांच्या मदतीने मदत कार्यात अग्रेसर असतात. आयुर्वेदिक मोफत आरोग्य शिबीर राबवणे, रक्तदान शिबीर राबवणे, काही शालेय उपक्रम जसे एक वही एक पेन जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना थोडी शैक्षणिक मदत मिळेल, ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून कचरा साफ करणे, गरजुंना मोफत अन्नधान्य वाटप,दाल खिचडी वाटप,कोरोना काळात सेफ्टी मास्क, अर्सेनिक गोळया, सॅनिटायजर,कोविड किट वाटप, झोपडपट्टी एरिया सॅनिटाईस करणे, खेड्यातील लोकांना शेतकरी मंडळ चालू करून देणे, महिलांचे - पुरुषांचे बचत गट चालू करणे व त्यांना कर्ज मंजूर करून देणे , दारिद्र्य रेषेखालील लोकांना मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण देणे व मोफत शिलाई मशीन वाटप करणे, पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करणे, वृक्षारोपण करणे, शासन आणि प्रशासनाच्या मदतीने रस्त्यांची डागडुजी करणे ह्या सारखी समाजकामे त्यांनी केली आहेत. त्यांच्या ह्याच कामाची पोचपावती म्हणून त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्कार साहीत्य, शैक्षणिक, सांस्कृतिक, चित्रपट अशा विविध क्षेत्रात मिळाले आहेत. त्यात आता उडान समाजभूषण पुरस्काराची भर पडली आहे. त्यामुळे बामणे गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेल्याची प्रतिक्रिया त्यांच्या क्रिएटिव्ह योगा समूहाचे योगगुरू अविनाश लोंढे आणि सुनील बोरणाक यांनी दिली आहे. 

Comments

Post a Comment

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income