दिवावासीयांना लवकरच पाणी दिलासा !


·        पलावा (लोढा) येथे १००० मिलीमीटर पाण्याच्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ
ठाणे (प्रतिनिधी) १३ नोव्हे.: दिवा शहरात पिण्याच्या पण्याची समस्या भेडसावत होती. त्यामुळे हि समस्या लक्षात घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाणे मनपा आयुक्त आणि महापौर नरेश म्हस्के यांच्या माध्यमातून एकूण २२१ कोटीचा दिवा - मुंब्रा रिमॉडलिंग हा प्रकल्प सुरू आहे. त्यामधील दिवा शहरासाठी ५ किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील अवघे १००० मीटर काम शिल्लक होते. यात पलावा (लोढा) मधील ७५० मीटर जलवाहिनीचे काम काही तांत्रिक कारणास्तव रखडलेले होते. या जलवाहिनीचे काम करण्यासाठी आवश्यक ना हरकत दाखला गेल्या अनेक दिवसांपासून मिळत नव्हता. त्यामुळे सदर ठिकाणी पाइपलाईन टाकण्याचे काम रखडले होते. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे अखेर हा दाखला नुकताच मिळाला.  त्यामुळे शनिवारी दिवा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी कल्याण शीळ रस्त्यावर असलेल्या पलावा गृह प्रकल्पापासून दिव्यापर्यंत स्वतंत्र ८०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या जलवाहिनीमुळे दिवा वासीयांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
 
यापूर्वी पाईपलाईन हि १८ मिलिमीटरची होती, परंतु आता ती ३२ मिलीमीटरची करण्यात आली आहे. तसेच उर्वरित २५० मीटरच्या कामाला देखील लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याने दिव्याचा पाणी प्रश्न निकाली लागणार असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income