कल्याणचा राज काळे एनडीएची परीक्षा पास

भारतीय सैनिकी विद्यालय, खडवली, ता- कल्याणच्या कु राज प्रशांत काळे याचे एन . डी . ए . परिक्षेत मिळवले घवघवीत यश !

 कल्याण - (बाबुराव खेडेकर)
युपीएससी  द्वारे घेण्यात येणाऱ्या  एन . डी .ए . 'परिक्षा - २०२१ ' या   देशसेवेत- भारतीय संरक्षण दलातील अधिकारी म्हणुन दाखल होणेसाठी घेण्यात येणाऱ्या  अत्यंत कठीण अशा लेखी-परीक्षेत कु. राज माधुरी- प्रशांत काळे याने  घवघवीत यश संपादन केले आहे.

युपीएससी द्वारे घेण्यात येणाऱ्या एन डी ए ची परिक्षा - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला, पुणे मार्फत देशसेवेत- भारतीय संरक्षण दलातील अधिकारी म्हणुन दाखल होणेसाठी घेण्यात येतात .अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या लेखी-परीक्षेत कु. राज प्रशांत काळे याने हे यश संपादन केले आहे .
स्वर्गिय धर्मवीर आनंद दिघे संस्थांपित आणि शिवनिकेतन ट्रस्ट संचालित भारतीय सैनिकी विद्यालय तसेच कनिष्ठ महाविद्यालय , कल्याण तालुक्यातील खडवली, जि. ठाणे  येथे शैक्षणीक वर्ष २०२१ - २२ मध्ये इयत्ता १२ वी. सायंन्स मध्ये शिक्षण घेत असलेला कु. राज काळे याच्या या घवघवीत यशासाठी पुणे येथील अनीस डिफेन्स कॅरिअर अकॅडमी चे संचालक तथा गणित तज्ञ  श्री अनीस कुट्टी सर व त्याचे सर्व सहकारी यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले.
राज माधुरी- प्रशांत काळे याने यश संपादन केल्याबद्दल शिवनिकेतन ट्रस्ट संचालित सैनिकी विद्यालयाचे अध्यक्ष मा.श्री.जगन्नाथ तथा आप्पा शिदें तसेच संचालक मंडळ व 
सौ .राजेश्रवरी विक्रांत शिंदे अध्यक्षा,शालेय समिती,  प्राचार्य.श्री.रविंद्र तोरवणे,पर्यवेक्षक श्री.महेश भावसार सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाने हार्दिक राज याचे अभिनंदन केले आहे .

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income