उत्थान योग केंद्र बदलापूरमध्ये साउंड थेरपी

ही थेरपी नाही चमत्कार आहे ! हे जग स्पंदनांचेच तर आहे याची प्रचिती आज खूप प्रभावीपणे मला आज झाली.  आपल्या पाच ज्ञानेंद्रियांव्यतिरिक्त सहावी जाणीव सुद्धा किती महत्वपूर्ण काम करते हे सुद्धा या थेरपीत समजते. निद्रानाश, अर्धशिशी किंवा पूर्णशिशी तसेच तनावमुक्तीसह एकाग्रता वाढविणे, मनाची शांतता अनुभवणे आणि ध्यानधारणासाठी तयारी करणे यासाठी मला वाटते साउंड थेरपी खूपच उपयोगी पडेल. 
     आचार्य विनोबा भावे म्हणत हिंदू  धर्म हा अनुभवण्याचा धर्म आहे तसे ही थेरपी अनुभवण्याचा विषय आहे. पंचधातूंचे भांडे खूपच प्रभावी व गुणकारी आहे. मी या थेरपीच्या प्रेमात पडलो असून किमान महिन्यातून एकदा हा अनुभव घेतल्यास शरीरावर त्याचे सकारात्मक परिणाम होतील असा माझा ठाम विश्वास बनलाय ! 
थेरपी दरम्यान मी शून्यात गेलो होतो व थेरपीच्या शेवटच्या टप्यात मला पुन्हा थेरपीच्या आवाजामुळेच जाग आली व शेवटी पंचधातुच्या भांड्याची  अफलातून कंपने अनुभवताना मी थक्कच झालो.. 
खरच हा गहन विषय आहे ! कोल्हापूरच्या भाषेत हार्ड विषय आहे ! नाद खुळा थेरपी ! पुन्हा पुन्हा यायलाच लागतंय.... ! शेवटी येथील योगगुरू अविनाश लोंढे यांच्याविषयी बोलायचे तर स्वतः साधक म्हणून योगाभ्यासाचाच ध्यास घेतलेले व संपर्कात येतील त्यांच्या जीवनात योग व आयुर्वेद उतरवण्यासाठी धडपडत असलेले व्यक्तिमत्व. त्यांचा शांत सय्यमी स्वभाव योग साधकांची सदर विषयातील रुची वाढवणारा ठरतो. 
तुम्हाला हा अनुभव घ्यायचा असेल तर बदलापूर येथील उत्थान योग सेंटरला भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा..
योगगुरू अविनाश लोंढे 
9821896825

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income