ओबीसी आरक्षणसाठी पहिली ठिणगी

ठाणे : कल्याण पश्चिम येथील, दामोदर हॉल मध्ये , मराठा समाजाच्या वतीने राज्यव्यापी चिंतन शिबिराचे  रविवार दिनांक  5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाचे आरक्षण व ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्दबातल झाल्यानंतर सदर चिंतन शिबीर ही पहिली ठिणगी ऐतिहासिक कल्याणमध्ये पडणार आहे. 
     मराठा समाजाला 50% च्या आतील ओबीसी आरक्षण मिळाले पाहिजे! यासाठी सर्व संघटना मध्ये व्यापक सहमती, आणि एकवाक्यता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवून कल्याणमधील मराठा समाज एकवटला आहे. 
मराठ्यांना आरक्षण हे संविधानाने नाकारले नाही तर राजकीय पक्ष आणि नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने नाकारले आहे अशी भावना समाजात तयार झाली आहे. त्यामुळे यापुढे संविधान संमत ओबीसी आरक्षण मराठ्यांना मिळवून घेण्यासाठी कल्याण येथे मराठा समाज धडकणार आहे. 
       या शिबीरास राज्यातल्या सर्व मराठा संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्यांनी, तसेच मराठा समन्वयकांनी उपस्थित रहावे . यासाठी सामुहिक प्रयत्न होणे गरजेचं आहे . संघटनांच्या संपर्कात असणार्या मराठा बांधवांनी या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आणि उपस्थिती साठी आणि कायमस्वरूपी 50 टक्केच्या आतील संविधानिक मराठा आरक्षण मागणीला आपला पाठिंबा देण्यासाठी राज्यस्थरीय चिंतण शिबीरास आपण उपस्थित रहावे असे आवाहन अयोजकांनी केले आहे. 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income