मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणेबाबत विनंती पत्र !

प्रति
मा. अध्यक्ष 
साहित्य अकादमी, नवी दिल्ली 
विषय-मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणेबाबत विनंती पत्र !

मा. महोदय 
सप्रेम नमस्कार !लोकाभिमुख शासन आणि गतिमान प्रशासनाकडून नागरिकांच्या खूप अपेक्षा आहेत.सामाजिक भावनिक प्रश्न जिव्हाळ्याचा आणि अस्मितेचा असल्याने मराठी आय पाकृतअतिप्राचीन भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या भावनेने हा पत्रप्रपंच करत आहे. महाराष्ट्राच्या अस्मिता म्हणजे महाराष्ट्राचा दैदिप्यमान संघर्षाचा इतिहास आणि महाराष्ट्राची मातृभाषा मराठी ! भाषावार प्रांतरचना करत असताना मराठी भाषेच्या व मराठी भाषिकांच्या हौतात्म्यातून महाराष्ट्राची निर्मिती झाली असल्याचे सर्वश्रुत आहे. हिंदू धर्माचे परकीयांपासून संरक्षण करत असताना सहिष्णुतेची भागवत बीजे याच महाराष्ट्रात रुजली आणि देशाला मार्गदर्शक बनली. प्रसंगी नाठाळाचे माथी काठी हाणण्याचे सामर्थ्य याच महाराष्ट्र धर्मातून निर्माण झाल्याने स्वराज्य आणि सुराज्याची कल्पना सत्यात उतरविणारे जहाल आणि मावळ वीरसुद्धा याच भाषेचे बाळकडू घेवून सिद्धत्वास पावले. पुरोगामित्व प्रयोगातून सिद्ध करणारा महाराष्ट्र मागून गोष्ठ मिळवत नाही हा स्वाभिमान असल्याने केंद्र सरकारने मराठीला यापूर्वीच न्याय द्यायला हवा होता मात्र दिल्ली सदासर्वकाळ महाराष्ट्रावर रुसल्याने मराठीला अच्छे दिन येत न्हवते ! सदर पत्र आपल्याला कळावे म्हणून हिंदीतून लिहिण्याचा विचार होता मात्र अभिजात भाषेचा वापर आम्ही मराठे कसा करतो याची झलक आपल्याला व्हायला हवी म्हणून युनिकोड मराठी मध्ये पत्र पाठवत आहे. 
केंद्राच्या निधीपेक्षा मला व माझ्या सहकाऱ्यांना मराठीची प्रतिष्ठा,राजमान्यता महत्वाची वाटते. आज मराठी भाषेत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांना इंग्रजीच्या अतिमहत्वामुळे चिंता वाटू लागली आहे. मराठी शाळा ओस पडत आहेत. मराठी नवसाहित्याबाबत उदासीनता दिसत आहे. मराठी माणसांना आपल्याच राज्यात ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीचा वरचश्मा सहन करावा लागत आहे. 
तरी आपण सुबुद्ध अधिकारी या नात्याने मराठी भाषेच्या अभिजात दर्जा साठीच्या मागणीच्या लढ्याला तात्काळ न्याय द्यावा हि नम्र विनंती !

सहकार्याच्या अपेक्षेत 
आपला स्नेहांकित 

बाबुराव खेडेकर (एम.ए.- मराठी)

उपसंपादक- दै. विश्वरूप,पनवेल
 सरचिटणीस/प्रवक्ता-गाव विकास समिती,रत्नागिरी;
 पुरस्कृत- माजी विध्यार्थी संघटना,कोल्हापूर- अध्यक्ष
संस्थापक/संपादक-प्रजासत्ताक 
संपर्क-9702442024

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income