आजरा तालुक्यातील उत्तूर पंचायत समिती गटातील विविध समस्यांबाबत माजी विध्यार्थी संघटनेचे निवेदन

                                                         




         लोकाभिमुख सरकार आणि गतिमान प्रशासनाकडून तरुणांच्या खूप अपेक्षा आहेत. गावाकडील सुशिक्षित युवक मोठ्याप्रमाणावर शहरांकडे विस्थापित होत असल्याने गावे ओस पडत आहेत.विकासगंगा शहराकडून गावाकडे पाझरत येत असल्याने शहर आणि ग्रामीण अशा दोन भागात समाजाचे विभाजन होवून परावलंबत्व येताना दिसत आहे. ग्रामीण भागात शिक्षण घेवून शहरात गेलेल्या विध्यार्थ्याला स्पर्धेत टिकण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो; शिवाय केंद्रीय बोर्डाच्या शिक्षणाची वाढती मागणी राज्याच्या शिक्षण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे.ग्रामीण भागातील विध्यार्थी स्पर्धेत स्वयंपूर्ण होण्यासाठी आणि भावी सक्षम नागरिक बनण्यासाठी गेल्या ३ वर्षांपासून लक्ष्मी विद्यालय बेगवडे येथील माजी विध्यार्थ्यांची संघटना कार्यरत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गाव विकास समिती या नोंदणीकृत बहुउद्देशीय संस्थेचा सरचिटणीस म्हणूनही मी काम पाहत आहे. उत्तूर पंचायत समिती गट हा कोल्हापूर जिल्ह्यातील विकसनशील भाग आहे. याभागातील सर्वच स्तरातील विकासाचा/बदलाचा  फायदा नव्या पिढीला होणार असल्याने आमची कांही निरीक्षणे आपल्यासमोर मांडत आहे. 
१)आजरा तालुका आणि उत्तूर या शहरांची लोकसंख्या १५००० पेक्षा जास्त आहे तरीही त्या नगरपरिषदा झालेल्या नाहीत.त्यामुळे विकासाला मर्यादा येत आहेत. 
२)आजरा, गडहिंग्लज आणि भुदरगड या तिन्ही तालुक्यांसाठी एकच प्रांत असून त्यांचे कार्यालय गारगोटी येथे आहे. त्यामुळे आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील नागरिकांना आपल्या कामासाठी एक दिवसाचा खाडा करून त्यांना भेटावे लागते. 
३)२००९ च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत आजरा तालुक्याचे तीन भागात विभाजन करून पूर्वीच्या गडहिंग्लज मतदारसंघातील उत्तूर हा भाग कागल तालुक्याशी जोडला गेला आहे. वास्तविक भौगोलिकदृष्ट्या आणि संपर्कासाठी गडहिंग्लज तालुका या पंचायत समिती गटासाठी जवळचा असल्याने पुनर्रचनेचा फेरविचार व्हायला हवा अशा नागरिकांच्या भावना आहेत. 
४)या भागात सरकारच्या पुढाकाराने एकही उद्योग उभारला गेला नसल्याने रोजगारासाठी केवळ शेतीवर अवलंबून राहावे लागते. 
५)उच्च शिक्षण, आरोग्यसेवा,करमणूक,बाजारपेठ यासाठी गडहिंग्लज किंवा गारगोटीला जावे लागते. 
६)अनेक सरकारी आस्थापनांमध्ये कर्मचारी भरती करणे गरजेचे आहे मात्र भरती झालेली नाही. अनेक शासकीय योजनांची माहिती नागरिकांना नसल्याने आणि शासनाची एक खिडकी उत्तूर ला नसल्याने शासकीय योजनांचे कार्यान्वयन झालेले दिसत नाही.मुळात अनेक योजनांच्या व उपक्रमांच्या किचकट पद्धतीमुळे गावकरी तिकडे पाठ फिरवताना दिसत आहे.
७)सरकारच्या वतीने किंवा मदतीने सांस्कृतिक महोत्सव/क्रीडा महोत्सव/विज्ञानप्रदर्शने/लोकजागृती कार्यक्रम झाल्यास प्रबोधन होईलच त्याचबरोबर या भागाचा पर्यटन विकास आणि स्वतंत्र ओळख निर्माण होईल. 
८)चिकोत्रा मध्यम प्रकल्पावर मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केल्यास  धरणाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास आणि निसर्गसंवर्धन होईल.
              

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income