प्रवाहाच्या विरुद्ध जाणारी "बिकट वाट"


माझी विदर्भातील अमरावतीची मैत्रीण पूजा डकरे हिचा बिकट वाट हा कविता संग्रह परवाच वाचून काढला. तेथील बोके प्रिंटर्स प्रकाशनाने मागील वर्षी या कवितासंग्रहाचे प्रकाशन केले होते. मराठी आणि हिंदी अश्या दोन भागात विभाजन केलेले हे छोटेखानी पुस्तक ६० रुपयात उपलब्ध करून देण्यामागे प्रोत्साहानाचाच मुख्य हेतू समोर दिसतो. तीमिरातुनी तेजाकडे हा या एकूण कवितांचा सूर दिसून येतो.वि. स. खांडेकर एकदा म्हणाले होते कि, "विशी पंचविशीतील बहुतेक तरुण तरुणी प्रेमवीर,देशभक्त आणि ध्येयवेडी असतात!" हि गोष्ट कवितेतून आदर्शवाद मांडणाऱ्या पूजाला तंतोतंत लागू पडते असे माझे मत बनले आहे ! देशप्रेम,स्वार्थत्याग, भ्रष्टाचाराला विरोध,शब्दमहती, युवक, गरिबांच्या वेदना हे नवख्या कवीच्या पहिल्या कविता संग्रहात येणारे विषय येथे पाहायला मिळतील. स्त्रीत्वाचा अभिमान ठेवून तुझा वर तूच निवड असा स्त्री सबलीकरणाचा विषयही पाहायला मिळतो.त्याचबरोबर स्त्रीविना जग अस्तित्वहीन होईल कारण चंद्रालासुद्धा चांदनिचाच आधार असतो असा स्त्रीचा माहीमापण पाहायला मिळतो. आजची शिक्षणप्रणाली कारखान्याचा कच्चा माल असून त्या कारखान्याचे मालक राजकारणी आहेत हे वास्तव कवितेत शब्दबद्ध केलेले आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी कर्णाचा आदर्श तर राजकारणातील यशस्वी महिला म्हणून इंदिरा गांधी यांचा आदर्श कवयत्रीने घेतलेला दिसतो. संविधानाची गरज आणि लोकशाहीचे अस्तित्व राजकारणात दिसायला हवे असे कवयत्रीला वाटते. 
                          विदर्भातील शेतकरयाच्या व्यथा मांडताना कापसाचे पिक घेणाऱ्याचा सदरा फाटका असल्याचे सत्य चित्रण केले आहे. उन्हात तापला,थंडीत थंडावला, पावसात वाहून गेला अशी  परिस्थिती तेथील शेतकऱ्यांवर आली  याला दूरदृष्टीचा अभाव असणारे लोकप्रतिनिधी आणि अकार्यक्षम प्रशासन जबाबदार आहे कारण सरकारचा निधी शेवटपर्यंत पोहोचलाच नाही.आत्महत्या करायचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी जेलमध्ये डांबल्याचा प्रसंग एका कवितेत आहे. एकीकडे शिक्षणावर विश्वास दाखवतानाच दुसरीकडे शिक्षणाचा दर्जा आणि शिक्षकांच्या स्वार्थी व लंपट भावनांचा उहापोह केलेला आहे. गावच्या निवडणुकीत दारू आणि मटन यावर दुर्जनांच्या हातात सत्ता जाते  या सर्वाचे वास्तववादी चित्रण बिकट वाट मध्ये केले आहे.कशाला मी जगून राहलो ? असा वैदर्भीय सूर कवितांची लोकाभिमुखता वाढवतात ! मुक्तछंदबद्ध बिकट वाट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करताना आपणाला नक्कीच मनोरंजक वाटेल !
बाबुराव खेडेकर (उपसंपादक- दै. विश्वरूप- रायगड)
९७०२४४२०२४


Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income