भूमिका

       

  ग्रामीण भागातील तरुण हुशार,सामर्थ्यशाली,मेहनती आणि प्रामाणिक असतो मात्र गरिबीमुळे तसेच संधी न  मिळाल्यामुळे तो काम धंद्यासाठी शहरात विस्थापित होतो तेंव्हा एकाकी पडतो व घाबरतो… नेमके काय करावे याचे मार्गदर्शन न मिळाल्यामुळे वेळ आणि पैसा वाया घालवण्याचीही वेळ त्याच्यावर येते असा बहुतेकांचा अनुभव आहे. पुढे याच विद्यार्थ्यांची परिस्थिती 'ना घरका ना घाट का' अशीच होते ! खरी भारतीय संस्कृतीखेड्यात आहे असे महात्म्यांनी सांगून ठेवले आहे मात्र महाराष्ट्रात खेडी ओस पडत असल्याचे दिसत आहे. शहरातील नागरिकांना आपापल्या गावाचा शाश्वत विकास व्हावा व शहरातील सुखसोयी आणि संधी ग्रामीण भागात निर्माण व्हाव्यात असे वाटत असते. त्यानुसार यथाशक्ती आपल्या जडण-घडणीस कारणीभूत असणाऱ्या ग्रामीण भागातील  शिक्षण संस्था,सामाजिक संस्था यांचे उतराई होण्याचा प्रत्येकजन प्रयत्न करत असतो. या विचारसरणीच्या लोकांचा हा समूह असून चांगल्या समाजासाठी आदर्श विध्यार्थी पुरस्काराच्या निमित्याने सुरु झालेली कोल्हापूर जिल्ह्यातील  आजरा-भुदरगड तालुक्यातील नवा आणि प्रथम अविष्कार आहे.वैभवशाली राष्ट्राच्या निर्मितीमध्ये तरुणांनी योगदान देण्यासाठी सरू केलेली हि सृजनांची चळवळ ग्रामीण प्रतिभेचा आणि प्रामाणिकपणाचा नमुना आहे. आपल्या मध्ये ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणाऱ्या शाळेकडे परत वळून जीवनाच्या शाळेतील उत्कर्षाच्या संघर्षाची लढाई सामुहिकपणे लढून नवा आदर्श निर्माण करूया… 
कार्यक्रम
१)दरवर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा समारंभ घेवून त्यामध्ये आदर्श विध्यार्थी पुरस्कार देणे. 
२)विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन 
३)दर पाच वर्षांनी माजी विध्यार्थी मेळावा घेणे. 
४)शाळेच्या क्रीडा महोत्सवास हातभार लावणे. 
५)हायस्कूलच्या स्नेहसंमेलनामध्ये किंवा इतर कार्यक्रमामध्ये (उदा.१५ ऑगस्ट,२६ जाने. ,शिक्षक दिन,नविन वर्ष स्वागत,विध्यार्थ्यांचे प्रथम दिवशी स्वागत) यावेळी उच्चविद्याविभूषित/कर्तृत्ववान व्याख्यात्यांना निमंत्रित करणे. 
६)लोकप्रतिनिधींचा वार्तालाप आयोजित करणे. 
७)ग्रामपंचायतीमार्फत/जिल्हा परिषदेमार्फत ग्रामीण भागाच्या विकासासाठी सूचना करणे/सहकार्य करणे
८)साम-दाम-दंड-भेद वापरून तरुणांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याबाबत प्रबोधन करणे. 
९)विरोधाला विरोध न करता सत्य जाणून घेवून कुणालाही गृहीत न धरता  सामुहिकरित्या निर्णय घेण्याची सवय नागरिकांमध्ये निर्माण करणे (ग्रामसभा आणि निवडणूक याबाबत सजगता निर्माण करणे)
१०)आजी माजी विध्यार्थी यांनी सुचविलेल्या व संघटनेमार्फत वेळोवेळी मान्यता असलेल्या नवनवीन विषयांवर कार्यवाही करणे…. 
 श्री. बाबुराव खेडेकर (एम.ए.- मराठी)
संस्थापक/अध्यक्ष- माजी विध्यार्थी संघटना,झुलपेवाडी-बेगवडे,कोल्हापूर
उपसंपादक- दै. विश्वरूप,पनवेल 
कार्यकारी संपादक- मासिक मुख्यमंत्री (गाव विकासाचे व्यासपीठ)
सरचिटणीस/प्रवक्ता-गाव विकास समिती,रत्नागिरी;(एनजीओ) 
https://www.facebook.com/groups/278337078860081/

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income