वाईचा_शिवकालीन_इतिहास

वाईचा_शिवकालीन_इतिहास 🛡⚔️🛡

            वाईचा_इतिहास_तसा_जुनाच_वाईपासुन_कोरेगावप र्यंतच्या_प्रदेशास 'वायदेश' संबोधले जात असे. 14 व्या शतकापर्यत वाई हे बहमनीचे लष्करी ठाणे म्हणून ओळखले जात होते त्यानंतर अनेकदा वाई मिळवण्याकरिता मराठा व 'निजामशाही-आदिलशाही-मुघल' यांच्यात प्रचंड मोठा संघर्ष झाला.......... पेशवाई येईपर्यंत वाई कधीच सलगपणे मराठ्यांच्या अधिपत्याखाली राहिली नाही....... वाई मिळवण्यासाठी फार मोठा संघर्ष मराठे व 'निजामशाही-आदिलशाही-मुघल' यांच्यात झाला पण हा संघर्ष इतिहास जाणकारांने कधीच प्रकरतेने मांडला नाही म्हणूनच वाईचे महत्व इतर प्रांताच्या तुलनेने साधारणच राहिले "...........!!!!
           
               " साधारण इ. स 1481 पासुन वाई ही 1489 पर्यंत आदिलशाहीकडे होती त्यानंतर वाईची सत्ता ही निजामशाहीकडे इ. स. 1551 पर्यंत आली. या 100 वर्षाच्या कालवधीत वाई कधी आदिलशाहीकडे राहिली तर कधी निजामशाहीकडे पुढे निजामशाही राजवटीचा अंत झाला........ त्यानंतर वाई अनेक काळ ही आदिलशाहीकडेच राहिली ".........!!!!
           
                " आदिलशाहीच्या कालखंडात सन 1649 ते 1659 या 10 वर्षाच्या कालावधीत आदिलशाहीकडून कुरकर्मा आदिलशाह सरदार अफझल खान याची वाईच्या सुभेदारपदी नेमणूक करण्यात आली या कालावधीत यानी वाई परिसरात फार धुडगूस घातला...... ब्राम्हणावर प्रचंड अत्याचार केला त्यांना वेठीस धरून अनेक हिंदू मंदिरे उध्वस्त करून वाईच्या दक्षिणेस आपल्याला राहण्यास प्रशस्त वाडा बांधला त्या वाड्याच्या पाऊलखुणा आजही वाईच्या रविवार पेठेच्या एका वाड्यात दिसतात. हा वाडा बांधत असताना अनेक कोरीव दगड हें किकली गावातील ग्रामदेवताचे मंदिर उधवस्त करून आणले होते. प्रतापगडावरील अफजल खानाच्या वधानंत्तर वाई ही मराठयांच्या छत्राखाली आली  "............!!!!
               
               " काहीच दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांकडून वाईचा ताबा पुन्हा आदिलशाहकडे गेला. वाईचा ताबा आपल्याकडे आल्यावर आदिलशाहीकडून इलियास सर्जाखान याची वाईच्या सुभेदारपदी नेमणूक काही दिवसापुरती करण्यात आली होती. तद्नंतर आदिलशाहीचा मराठा सरदार बाजी घोरपडे याची सर्जाखानच्या जागी नव्याने वाईच्या सुभेदारपदी नेमणूक करण्यात आली. इ. स 1665 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी वाईच्या कोटास वेढा घातला व तो हस्त केला त्यावेळी त्यांचा मुक्काम खिराचे बागेत होता......... मराठा सरदार बाजी घोरपडे याचा पराभव करून कोट व वाय प्रदेश महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला व येसाजी मल्हार यांची वाईच्या सुभेदारपदी वर्णी लावली.......... पुढे छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात म्हणजेच 1687 साली वाईचा सुभेदार सर्जाखान याच्यासोबत संभाजी महाराजांची लढाई वाईजवळली केंजळ-खानापूरच्या माळावर झाली यात मराठा सरदार हंबीरराव मोहिते धारातीर्थ पडले.......1660 नंतर वाई मुघलांच्या ताब्यात गेली. अगदी पेशवाई येईपर्यंत कधी वाई मुघल तर कधी मराठे यांच्या ताब्यात वाई येत होती त्यानंतर इंग्रजाचे राज्य येईपर्यंत वाई ही शेवटपर्यंत पेशव्याच्या ताब्यात राहिली "...........!!!
                 
             " पेशव्याच्या कालखंडात वाईस विशेष महत्व प्राप्त झाले. वाईत अनेक मंदिरे बांधली गेली.......म्हणूनच 18 व्या शतकात वाई ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी ओळखली जाऊ लागली होती........... वाईचे अनेक मतबदार मराठा-गैरमराठा सुभेदार होऊन गेले पण छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार  येसाजी मल्हार आणी रास्ते सोडले तर कोणीच वाईचा सामाजिक व सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केले नाही हीच मोठी शोकांतिका होती "............!!!!

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income