मराठ्यांचे सरसेनापती धनाजीराव जाधव

*⛳मराठ्यांचे सरसेनापती धनाजीराव जाधव यांचा आज स्मृतिदीन..⛳👏*

संताजी घोरपडे यांच्या मृत्युनंतर मोगलांविरूद्ध यशस्वीपणे लढा देण्याचे श्रेय सेनापती धनाजीराव जाधव यांचे.
छत्रपती राजाराम महाराजांच्या कार्यकाळात सरसेनापती धनाजीराव जाधव यांनी मोगल फौजांशी अनेक धावपळीच्या लढाया केल्या व मोगल सरदारांना आपल्यामागे मोठी पायपीठ करण्यास भाग पाडले. त्यानंतर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई सरकार यांच्याकाळात गुजरातमधील बडोद्यापासून ते धारवाड़ आणि कारवार पर्यंत आपल्या लष्करी मोहिमा चालवल्या अनेक मोगल शहरे मारली इतकेच काय खुद्द बादशाहच्या छावणीवर हल्ले चढ़वले.
धनाजीराव जाधव यांच्या या उपक्रमामुळे बादशाह इतका हवालदिल झाला होता की त्याने धनाजीराव जाधव यांच्याशी लढणाऱ्या सरदारांचे रक्षण व्हावे म्हणून त्यांना खास मंतरलेले ताईत पाठवून द्यावे लागले.
तसेच छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या कालखंडात ही सेनापती धनाजीराव जाधव यांनी महत्वपूर्ण कामगिरी बजावली आणि त्यातच त्यांचा पायाला ईजा होऊन नैसर्गिक मृत्यू झाला..

तब्बल ५ छत्रपतींच्या कारकिर्दीत आपल्या पराक्रमाने आणि मुत्सद्दगिरीने मोगल सैन्यास सळो की पळो करून घायतुकीला आणणाऱ्या सरसेनापती धनाजीराव जाधव यांना मानाचा मुजरा आणि स्मृतीस विनम्र अभिवादन..

(स्मृतीदिन - २७ जून १७१० )

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income