उल्हासनगरमध्ये कोरोना रुग्नांची परवड

भाजप नेते प्रदीप रामचंदानी व कपिल आडसुळ यांनी केली पोलखोल

उल्हासनगर/ बाबुराव खेडेकर
        उल्हासनगर ४ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका या कोविड सेंटरमध्ये सोयीसुविधांची वानवा असून येथील गलथान कारभारावर येथील रुग्ण नाराज असल्याची धक्कादायक माहिती कोरोना कक्षात जावून व्हिडिओ बनवून भाजप नगरसेवक प्रदीप रामचंदानी आणि भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कपिल आडसुळ यांनी पोलखोल केली आहे.  याबाबत मनपा आयुक्तांना  तातडीने लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
        उल्हासनगर मध्ये कोरोना रुग्णांचा आकडा आता ५८० वर पोहोचला आहे. विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या रुग्णांची चौकशी लोकप्रतिनिधी या नात्याने करत असताना प्रदीप रामचंदानी यांना उल्हासनगर ४ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका येथील रुग्नांची दुरावस्था असल्याचे समजले. रविवार ७ जून रोजी त्यांनी अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष कपिल आडसुळ यांना घेऊन या ठिकाणी धाव घेऊन आढावा घेतला. यावेळी रुग्णानी पाणी सुद्धा विकत आणावे लागते, मास्क आणि सॅनिटायजर मिळत नाही, जेवण वेळेवर येत नाही आणि आलेच तर चांगले नसते अशी तक्रार केली. सेंटरच्या स्वच्छतागृहात स्वच्छता नसल्याची सुद्धा तक्रार रुग्णांनी केली आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार  पी पी ई किट घालून लोकप्रतिनिधी या नात्याने कोविडच्या वॉर्डमध्ये जावून रामचंदानी आणि आडसुळ यांनी उघडकीस आणला आहे.
      सोमवारी नगरसेवक प्रदीप रामचंदानी, कपिल आडसुळ यांनी हि बाब उल्हासनगर मनपा आयुक्त उन्हाळे यांच्या निदर्शनास आणुन दिली आहे. याबाबत आता प्रशासन ठोस उपाय करणार की रुग्णांना असेच वाऱ्यावर सोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income