सतर्क रहा ! संकटांनी माणसे सुधरताना दिसत नसून जास्तच स्वार्थी बनत आहेत !


🙏नमस्कार मी बाबुराव खेडेकर; 
          पत्रकार म्हणून कोरोनाच्या विविध परिणामांना जवळून पाहत आहे. सध्या दुप्पट किमतीने सामान विक्री सुरु असल्याचे आपल्या पैकी काहीजण अनुभव घेत असतीलच. या व्यापाऱ्यांना विसरु नका ! याशिवाय लॉकडावुन मध्ये अफवा पसरवून जास्त किमतीने माल विक्री करनारे/प्रवासी वाहतूकीसाठी अव्वाच्या सव्वा भाडे मागणारे (धक्कादायक उदाहरणे आहेत👉 दिवा ते वाशी गरोदर महिलेला घेऊन जाने आणि आनने यासाठी एका रिक्षावाल्याने १५००० घेतले ! अशीच मागणी पनवेलमध्ये एका खाजगी रुग्णवाहिकेच्या वाहकाने स्मशानभूमीत मयताच्या नातेवाईकांकडे केली,) खाजगी रुग्णालयात प्रवेश नाकारणारे आणि प्रवेश दिलेल्या रुग्नाला भरमसाठ बिल देणारे ही भेटले ज्यावरून शासनाला दरपत्रक जाहीर करावे लागले. आतासुद्धा 'कामगार नाहीत, प्रॉडक्शन्स बंद आहे,माल कमी आहे' असे सांगून चड्या भावाने कधी दुकानाचे अर्धे शटर तर कधी पुर्ण शटर उघडून किंवा मागील बाजूने माल विक्री होत आहे. दारु आणि गुटखा किती रुपयांना विक्री झाली हे मि सांगायला नको. दारुमुळे सरकारचे आर्थिक नियोजन कदाचित होइल पण किती कुटुंबांचे आर्थिक नियोजन बिघडेल या प्रश्नाबाबत दारुबंदीची घोषणा देणारे चिडीचुप होते. 'भाडे मागू नका,पगार कापू नका,बिले स्थगित ठेवा घोषणा झाल्या मात्र याबाबत कोणीकोणी कसे असहकार्य केले हे सुद्धा लक्षात ठेवा. ८ जुन पासून परिस्थिती पूर्ववत झाली कि या सर्वांचा हिशोब चुकता करावा लागेल. 
          नियोजनाच्या अभावामुळे वेळेवर उपचार मिळाला नाही म्हणून मृत्यू झालेल्यांची सुद्धा माहिती समोर आली. कोणत्या रुग्णालयात किती बेड शिल्लक आहेत हे समजणारी वेबसाईट ठामपने आता नुकतीच सुरु केल्याने आतातरी कोठे गेल्यास तात्काळ प्रवेश मिळेल आणि उपचार सुरु होतील हे नागरिकांना कळेल. 
              विश्वगुरू बनू पाहणारा आपल्या देशातील किती नागरीक परावलंबी आहेत आणि बेरोजगारी/गरीबी हि समस्या देशात किती महत्त्वाची आणि मोठी आहे याची झलक मिळालीच आहे. ट्रिलियन डॉलर ईकॉनॉमी/ फास्टेस्ट ग्रोव्हिंग ईकॉनॉमी असलेल्या देशातील सरकारांना उत्पादन मिळविण्यासाठी दारुविक्रीचाच पर्याय मिळावा हे सुद्धा आपण पाहिले. 
         लॉकडावुनमध्ये घराघरात राहिलेल्या नागरिकांना राजकारण विषय चघळण्यासाठी सत्तासंघर्षचा क्लायमॅक्स पुरवण्यात राज्यकर्ते कमी पडलेले नाहीत. धार्मिक कट्टरतावाद्यानी लॉकडावुनचा फायदा घेत जे कारनामे केले हे कसे विसरून चालेल! माहितीच्या विस्फोटात परिस्थितीचा अन्वयार्थ लावताना आपली जी फसगत झाली असेल त्यासाठी कारणीभूत असलेल्यांना आठवा. 
          कोरोना गेलेला नाही, लढाई जारी आहे. कोरोना योध्यांचा सन्मान आहे आणि राहणार त्यांना विसरु नका. लक्झरी इंडस्ट्री आणि तिचे वापरकर्ते आज विवंचनेत आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची हि वेळ आहे. २० टक्के समाजाकडे पैशाचे एकत्रीकरण आणि उरलेला समाज परावलंबी ठेवण्याचे षडयंत्र निसर्गानेच  उलथवून लावले आहे. 
     आतातरी सुधरले पाहिजे मात्र आता पावलोपावली स्वार्थी मानसे दिसतील. चांगली सुद्धा भेटतीलच. मात्र कोरोनाचा गैरफायदा घेऊन लुटणाऱ्याविरूध्द लढाई सुरु ठेवावी लागेल. लॉकडावुन अनलॉक केलेय खरे पण शहरातील आरोग्य व्यवस्थेची क्षमता पाहता सोसायटीला कोविड कक्ष बनवा असे आवाहन प्रशासन सुद्धा करत आहे; याचा अर्थ संकट भयंकर आहे. बाहेर बिंधास्तपणे फिरून नियमांची पायमल्ली करून फुकटचा पुरुषार्थ दाखवण्याच्या भरात संकट ओढवून घेणे योग्य नाही. त्यामुळे हा पावसाळा सांभाळून रहा आणि इतरांनाही सांभाळून घ्या ! खात्रीशीर व्यक्तीकडून मिळालेल्या बाबींवर काम सुरु आहे; पुराव्याअभावी काही बाबींचा उल्लेख टाळून हे लिखाण अपूर्ण अवस्थेतच सोडत आहे. काही गोष्टी खोलवर जावून पाहू; तुर्तास येथेच थांबतो ! धन्यवाद ! 
www.yashpraptinews.com

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income