देसुरच्या किल्ल्याचा खरा इतिहास


*🚩🚩देसुरचा किल्ला. मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष.🚩🚩*

*🚩🚩जिंजीपासून ईशान्येस २१, किलोमिटरवर (१३,मैल) हा किल्ला आहे.* 
*आजच्या घडीला हा किल्ला गावतल्या लोकांच्याही विस्मृतीत गेला आहे,*
*ईथवर जर पोहोचायचे असेल तर पच्चई अम्मन कोवील या मंदीराची चौकशी करत जावे लागते.*
*या मंदीराच्या पाठीमागे पडीक रानात हा किल्ला काही अवशेष ट्कवून जिवंत आहे.*
*संपुर्ण किल्ला जरी काट्याकुट्यांनी माखला असेल तरी बारकाईने पाहिल्यास आजही किल्ल्याच्या अर्धवट भिंती नजरेस पडतात.*
*एक बुरूज, एक पाण्याची विहीर व एक सभामंडप अाजही सुस्थीतीत आहेत.* *याखेरीज किल्ल्यात ५, पाच अतिशय सुंदर पाच फुटी विरगळी आढळतात.*

*देसुर हे नाव मुळ तेज सिंग या नावातून उद्भवले आहे.* 
*तेजसिंगाचा दक्षिणी तमिळ भाषेत देजसिंग असा अपभ्रंश होतो व पुढे ह्या देजसिंगचा देसिंग असा अपभ्रंश झाला.*
*देसुर म्हणजे देसिंग उर (देसिंगाचे गाव).*
*हा तेज सिंग म्हणजे स्वरूपसिंगाचा मुलगा.*
*सन १७९८, ला जिंजी मराठ्यांकडून घेतल्यावर त्याठिकाणी स्वरूपसिंगाची नियुक्ती करण्यात आली.*
*सन १७१४, ला स्वरूपसिंग मरण पावला व त्यानंतर पित्याची जागा तेज सिंगाने घेतली परंतू तत्पुर्वी अर्काटच्या नवाबाने जिंजीची सुत्रे अर्काटला हलवल्यामुळे तेज सिंग व नवाबाचे संबंध बिघडले.*
*नवाब व तेजसिंगाचे मैत्रीचे संबंध होते तसेच नवाबाची मुलगी आणि तेजसिंगाचे प्रेमसंबंध होते असे तमिळ कवितांमध्ये सांगितले जाते.* 
*हीच मुलगी पुढे इ. स. १७१४, मध्ये उद्भवलेल्या युद्धात बापाविरूद्ध लढल्याचे सांगितले जाते.*
*ह्या तेजसिंगाचा कार्यकाळ फारतर ८, आठ महिण्याचा परंतू नवाबाशी दिलेल्या प्रखर लढ्यामुळे तमिळ कथा काव्यांमध्ये तो कमालीचा छाप सोडून गेला.*
*विल्लुपुरम् तसेच जिंजी–दिंडीवोनम रोडवर असलेल्या काॅलेजना राजा देसिंगाचे नावा देण्यात आले आहे.*
*ह्या देसिंगाने हा किल्ला बांधल्याचे सांगितले जाते.*
*(जे साफ खोटे आहे).*
*या गावाला जरी देसिंगाचे नाव दिले गेले असले तरी देसिंगापुर्वीही या गावाचा व किल्ल्याचा काही ऐतेहासीक संदर्भ आढळतात त्यामुळे या नावामागच्या खटाटोपास अर्थ उरत नाही.*
*शिवाय हा किल्ला देसिंगाने बांधला हे Google चे मतही खोटे ठरते.*

*भिमसेन सक्सेना म्हणतो की देसुर मुक्कामी मोगल सैन्य रात्री किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले.*
*त्याअर्थी याअगोदर तिथे केल्ला होता हे सिद्ध होते.* *शिवाय जर हा दुसरा किल्ला असेल तर जवळपास तेल्लार येथे मातीचा भुईकोट किल्ला आहे.*
*पण खान चाललाय जिंजीकडे आणि हा किल्ला जिंजीच्या विरूद्ध दिशेला म्हणजेच देसुरपासुन वांदीवाॅश कडे जाताना १०, किलोमिटरवर आहे.*

*कर्नाटकात संताजी आणि धनाची यांना मिळालेल्या विजयामुळे शत्रूच्या मनात धडकी भरली होती.*
*सर्वत्र ईतकी घबराट पसरली होती की जिंजीला वेढा टाकून बसलेली मोगली फौज व बादशहाची छावनी यादरम्यानचे दळनवळन बंद पडले होते.*
*बादशहाच्या छावनीतून काही वार्ता येत नसल्याने फौजेत अफवांना उत आला होता.*
*दरम्यान जिंजीचे मोर्चे टाकून मोगल सैन्य मुख्य तळाकडे येऊ लागले होते.* 
*सर्वत्र मराठ्यांविषयी मोठी धास्ती निर्माण झाली होती.* 
*अशा संधीचा फायदा घेऊन मराठ्यांनी किल्ल्याबाहेर पडून मोगलांचे मोर्चे उद्ध्वस्त करून लावले.* 
*मोगल मराठ्यांची मोठी लढाई झाली.*
*खुद्द जुल्फीकारखानास हाती शस्त्र धरावे लागले.* *मराठ्यांच्या प्रखर हल्ल्यातून जुल्फीकारखानाने आपले लष्कर कसेबसे मुख्य तळावर आणले.*

*मोगलांना त्राही भगवान झाले होते यात कहर म्हणजे छत्रपती श्री राजाराम महाराजांनी पसरवलेली बादशहाच्या मृत्यूची अफवा.* 
*१६, डिसेबर इ. स. १६९२, ला शहजादा कामबक्ष औरंगजेब वारला ह्या अफवेला बळी पडून मराठ्यांना सामील होण्यास निघाला परंतू ही बातमी जुल्फीकारखानास लागली व त्याने त्वरीत शहजाद्याच्या तळावर छापा टाकून त्यास गिरफ्तार केले.*
*या घटनेमुळे मोगलांचे उरले सुरले नितीधैर्यही नष्ट झाले.* 
*फौजेत अफवांबरोबर कटकारस्थानांचे पिक माजले होते शिवाय अन्नधान्य व चारा यांच्या टंचाईमुळे मोगल छावनी मोठ्याच संकटात सापडली होती.*
*या संकटातून तारन्याची कुवत फक्त जुल्फीकारखानाकडेच होती.* 
*त्याने तळाबाहेर पडून रसद अाणण्याचा दोनदा प्रयत्न केला परंतू दोन्हीवेळा मराठ्यांच्या हल्ल्यामुळे त्यास माघार घ्यावी लागली.* 
*आता परिस्थीती अशी होती की मराठ्यांनीच मोगलांच्या तळाभोवती वेढा टाकल्यासारखे झाले होते.*
*जिंजी पासून वांदीवाॅश हे सुमारे २५, किलोमिटर आहे जिथे मोगलांची अन्नधान्य व ईतर साधनसामग्री होती.*

*जुल्फीकारखानाने वांदीवाॅशला जान्याचा तिसरा प्रयत्न केला जो यशस्वी झाला.*
*वांदीवाॅशला बंजार्यांचे तांडे अन्नधान्य घेऊन थांबले होते.* 
*मोगल सैन्यात ईतकी बेशिस्त माजली होती की उपाशी सैनीकांनी त्या तांड्यावर हल्ला चढवून ते लुटले.*
*दुसर्‍या दिवशी हल्ल्यातून वाचलेले अन्नधान्य गोळा करून जुल्फीकारखान वांदीवाॅशहून आपल्या तळाकडे निघाला.* *वांदीवाॅशहून २२, किलोमिटर देसुर येथे संताजी रावाने २००००, सैन्यानिशी ५, जानेवारी इ. स. १६९३, रोजी खानास गाठले.* 
*भिमसेन सक्सेना हा रावदलपताचा चिटनिस व मोगल ईतिहासकार त्यावेळी या लढाईत सामील होता त्याने हा प्रसंग सविस्तर लिहून ठेवला आहे तो म्हणतो जुल्फीकारखान परत येण्यास निघाला.*
*मराठ्यांनी चोहीकडून हल्ले करण्यास सुरवात केली.* 
*मराठे देसुर मुक्कामी गोळा झाले होते.*
*त्यानी मोगलांची वाट अडवली.*
*मोगलांकडे १२००, बाराशेपेक्षा जास्त फौज नव्हती.*
*राव दलपताने सैन्याची उजवी बाजू संभाळली आणि त्याने शत्रूंना हटवले.* 
*ईतक्यात रात्र झाली.*
*मोगल सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी तळ देऊन राहिले.*
*दुसर्या दिवशी मराठ्यांनी बरेच मोठे सैन्य आणले.* *त्यानी निकराचे हल्ले चढविले.*
*त्यानी ईतक्या गोळ्या झाडल्या की मोगल सैनिक आणि सैन्यासोबत असलेले वंजारी हवालदिल झाले.*

*मराठ्यांच्या बंदुका मोगल सरदाराच्या हत्तीवर नेम धरून गोळ्या झाडू लागल्या.* 
*जुल्फीकारखान व राव दलपत यांच्या हत्तीना अनेक गोळ्या लागल्या.*
*राव दलपताने स्वत: गोळ्या झाडून आनखी काही मराठा सरदारांना ठार मारले.* 
*मराठ्यांकडून गोळ्यांचा वर्षाव चालूच होता.*
*मी राव दलपताच्या माघे बसलो होतो.*
*राव दलपताचे रक्षण व्हावे म्हणून राव दलपताच्या समोर ढाल धरली.*
*खराखुरा वाचवनारा भगवान आहे!*
*लागोपाठ दोन गोळ्या माझ्या खांद्याच्या दिशेने आल्या त्या ढालीला लागल्या.*
*आम्ही कूच करीत असता वाटेत भातशेते लागली.* *आमच्या सैन्यातील कितीतरी बैल आणि उंट चिखलात अडकले.* 
*घोडे मोठ्या मुश्किलीने पार झाले.*
*आमच्यापाशी दारूगोळ्याचा तुटवडा पडला.*
*बरकंदाजापैकी कोनापाशीही दारूगोळा राहीला नाही.*
*एकीकडे राव दलपत आणि त्याचे पथक, मध्ये चिखल आणि पलिकडे उजव्या बाजूस बरकंदाज स्वार अशी स्थिती झाली.*
*राव दलपताच्या हत्तीजवळ ऐंशीपेक्षा अधिक स्वार शिपाई नव्हते.*
*मराठ्यांनी तेथून जवळ असलेल्या टेकडीवर आपले पायदळ पाठवले.*
*तेथून मराठ्यांनी रावदलपताच्या तुकडीवर गोळ्या झाडावयास सुरूवात केली.*
*त्यामुळे अतिशय कठीण परिस्थीती झाली.*
*चिखलातून अडकलेले बैल व उंट यांना काढण्यासाठी म्हणून राव दलपत तेथे थांबला होता.* *बरीचशी मोगल फौज पुढे निघून गोली होती.*
*राव दलपताने प्राणपणाचा निर्धार करून मराठ्यांच्या दिशेने चाल केली.*
*ईतक्यात जुल्फीकारखानाचा आघाडीचा सरदार सर्फराजखान हा पाच–सहा हजार सैन्य घेऊन राव दलपतला येऊन मिळाला.* *दोघांनी एक होऊन मराठ्यांवर चाल केली.* *युद्धाला तोंड लागले हा आपल्या सैन्यात दाखल होण्यासाठी तिकडे वळला.*

*मराठ्यांची मुख्य तुकडी १२०००, बारा हजाराची होती.*
*राव दलपत या तुकडीवर चालून गेला अाणि मर्दुमकीने लढू लागला.*
*युद्धाचा एकुन रंग पाहून मराठे एका बाजूस झाले.*
*राव दलपताने पाव कोसापर्यंत मराठ्यांना मागे हटवले.*
*त्याच्या ८०, ऐंशी स्वारांवर मराठ्यांनी हात टाकला नाही.*
*राव दलपत त्या ठिकाणी घटकाभर थांबला.*
*त्याने सामान सुमान चिखलातून बाहेर काढविले.* 
*मराठे लांब आपल्या जागेवर थांबले होते.*
*यानंतर राव दलपत हळूहळू आपल्या बुनग्यांच्या पाठीमागे रवाना झाला.* 
*गोळ्यांचा मारा व चकमकी कमी झाल्या.*
*राव दलपत नदीच्या काठावर पोहचला.*
*काही तोफा चिखलात फसल्या होत्या.*
*राव दलपताने हत्तीच्या कमरेला जाड दोर बांधून त्याच्या सहाय्याने तोफा बाहेर काढल्या.*
*मराठे आश्चर्यचकित झाले.* 
*त्यांनी जिंजीची वाट धरली.🚩🚩*

*🙏दुर्दैव म्हणजे ह्या किल्ल्याची नाॅर्थ अरक्काट १८९२, अवृतीत जी नोंद आहे ती पुढे कुठल्याच नवीन गॅझेटियर्स अथवा पुस्तकात नाही.* 
*भारतात अगनित ठिकाणी ईतिहासाने पाऊलखुना सोडल्या आहेत मात्र आपल्या कंटाळखोर वृत्तीने त्या पुसून चालल्या आहेत.* *सर्व गोष्टी सरकार वा पुरातत्व खाते करेल ही मानसिकता झुगारली पाहिजे.🙏*

*🙏संदर्भ:-१,तारिखे दिल्कुशा (भिमसेन सक्सेना)*
*२,A history of gingee*
*Martin memories*
*Diary and* *consultation book*
*डाॅ. जयसिंगराव पवार*
*History of gingee and it’s ruler🙏*

*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income