मराठा_पायदळ

*#मराठा_पायदळ*

*मराठ्यांचे सैन्य संघटन – पायदळ*

पायदळ हा सुद्धा घोडदळाप्रमाणे मराठ्यांच्या सैन्याचा महत्वपूर्ण भाग होता. मराठा सैन्यात पायदळाला दुय्यम स्थान प्राप्त झाले होते. पायदळाची गतिशीलता घोडदळापेक्षा निश्चित कमी होती परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी पायदळाकडे तेवढेच बारीक लक्ष्य दिले.

महाराष्ट्रातील पर्वतमय भागात पायदळ जास्त उपयोगी पडत असे, तसेच किल्ल्यांच्या वा लष्करी ठाण्यांच्या रक्षणासाठी हजारो पायदळ सैनिकांची गरज भासत असे. युद्धात संख्येने सर्वात जास्त असणारे पायदळ हातघाईच्या लढाईत पारंगत असते. प्राचीन तसेच आधुनिक काळातही पायदळ हे सैन्याचा कणा मानले जाते. इतर सैन्याच्या मानाने युद्धात पायदळाची हानी जास्ती होते. पायदळ सैनिकांची भरती मुख्यत: मावळे, हेटकरी आणि इतरही काही लोकांमधून करण्यात येत असे. स्वतः शिवाजी महाराजांतर्फे सैन्यभरती होत असे. प्रत्येक किल्ल्यात पायदळच्या तुकड्या सज्ज असत. किल्लेदार शिपायांची हत्यारे स्वत:ची असत व दारूगोळा सरकारातून मिळे. पायदळात दहा माणसांचा दाहिजा (समूह) असून हवालदार, जुम्लेदार, एक हजारी, पंच हजारी, सरनोबत असे अधिकारी असत, सर्वात लहान तुकडी १० सैनिकांची असे.

◆पायदळाची रचना अशी होती:
१० सैनिकांवर – १ नाईक
५ नाईकांवर – १ हवालदार
३ हवालदारांवर – १ जुमलेदार
१० जुमलेदरांवर – १ हजारी
७ हजारींवर – सेनापती (सरनौबत)

मराठा सैन्याच्या पायदळत सुमारे १०००० सैनिक होते.
पायदळतील जुमलेदारास १० होन प्रतिवर्षी मिळत तर सबनिसास ४० होन मिळत असत.
हजारीस ५०० होन किंवा १२५ रुपये प्रती महिना प्राप्ती होत असे.
१०० सैनिकांच्या अधिकाऱ्यास ३ ते ९ रुपये प्रती महिना मिळत असे.

पायदळाचे मुख्य कार्य पर्वतीय आणि दुर्गम भागातील शत्रूशी लढण्याचे असे. सोबत त्यांना घोडेस्वरांचे सुद्धा रक्षण करावे लागत असे. पायदळात ठिकठीकाणाहून गोळा केलेले अनेक नवशिके लोक होते. त्यांना युध्हाचे शिक्षण देण्याकरिता त्यांना मोकळ्या शेतात तीन महिने तळ ठोकावा लागे, वेळ पडल्यास घोडेस्वारी, युद्धकलेचे सर्व डाव कसे खेळावेत आणि लढाई कशी करावी या विषयीचे शिक्षण काळजीपुर्वक दिले जात असे. सैन्य वर्षातील आठ महिने मुलूखगिरीवर जाई व चार महिने छावणीस असे. सैन्याची शिस्त कडक असे. आणलेली लूट सरकारात भरावी लागे, तसेच मुलूखगिरीवर असताना स्त्रियांना नेण्यास मज्जाव होता आणि धार्मिक स्थाने, स्त्रिया, मुलेबाळे यांना किंवा प्रजेला उपद्रव दिल्यास कडक शासन केले जाई.

मराठा पायदळात पाच प्रकारचे भाले वापरात होते, इटा व बर्च्छा (फेकण्याचे) हातातला भाला, सांग किंवा संग (लांब सरळ टोकदार
फाळाचा) व फाळाचे टोक बाकदार चोचीसारखे असलेला भाला. पायदळातील सैनिक तलवारीसोबत ढाल वापरली जात असे, पायदळातील सैनिकांकडे संगिनी सुद्धा असत.

राजांनी सैन्यात एक शिस्त निर्माण केली.
सैन्यासंबंधी निरनिराळ्या तजविजींवर शिवरायांचे बारकाईने लक्ष्य असे, त्याचप्रमाणे आपल्या सैन्याकडून रयतेला यत्किंचितही उपसर्ग होऊ नये म्हणून ते प्रचंड दक्ष असत.

◆राजाभिषेकाच्या थोड़ आधी म्हणजे १६७४ मध्ये शिवरायांनी चिपळूण येथील अधिकार्यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात,

मोघल मुलकात आले त्याहूनही अधिक तुम्ही रयतेस काडीचाही आजार द्यावयाची गरज नाही.
पत्रामध्ये लष्करी छावणीमध्ये शिस्त कशी हवी हे सुद्धा राजे लिहितात.
चोख शिस्त असलेल्या सैन्याला प्रशिक्षण देखील तितकेच महत्वाचे असते. त्यासाठी आवश्यक आयुधे, शस्त्रे आणि इतर सामुग्री वेळेवर उपलब्ध करणे सुद्धा महत्वाचे असते. या बाबतीत सुद्धा शिवरायांनी एक धोरण अंगीकारले होते. वेळप्रसंगी परकीय सत्तांकडून दारूगोळा आणि शस्त्रे ते घेत असत. पायदळाचे सरनौबत म्हणून नूरखान बेग आणि नंतर येसाजी कंक यांची नेमणूक महाराजांनी केली होती.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income