कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी

*कोकणचा विकास व विद्यार्थ्यांमधून कुशल मनुष्यबळ घडवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात स्वतंत्र कोकण विद्यापीठाची स्थापना करा!*

*गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी*

*रत्नागिरी:-* कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणे आणि कोकणातील विद्यार्थ्यांना त्याच भागात उच्च शिक्षण मिळावे,उच्च शिक्षित तरुणांनी स्थानिक भागात रोजगार निर्मिती करावी या हेतूने रत्नागिरी जिल्ह्यात स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करावे अशी मागणी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे पाठवलेल्या पत्रात खंडागळे यांनी म्हटले आहे की,कोकणात आधीच उच्च शिक्षणाच्या संधी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत.रोजगारा प्रमाणेच बहुतांश विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी 10 वी 12 वी नंतर अन्य जिल्हात स्थलांतर करतात.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती,तेथे उपलब्ध होऊ शकणाऱ्या रोजगार संधी याला सुसंगत अभ्यासक्रम आजही कोकणात उपलब्ध नाहीत. कोकणचे विद्यार्थी हे अभ्यासात हुशार आहेत.दर वर्षी 10 वी 12 वी चा रिझल्ट हा राज्यात क्रमांक एकवर असतो.आपण राज्य सरकार मार्फत कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात स्वतंत्र कोकण विद्यापीठची निर्मिती करावी.कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आणि कोकणातील विद्यार्थ्यांना त्याच भागात उच्च शिक्षण मिळावे,उच्च शिक्षित तरुणांनी स्थानिक भागात रोजगार निर्मिती करावी या हेतूने हा निर्णय महत्वाचा ठरेल असे खंडागळे यांनी या पत्रात म्हटले आहे.

कोकणात स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करून येथील विद्यार्थ्यांना पर्यटन, पर्यावरण पूरक उद्योग व्यवसाय, मत्स्यव्यवसाय संबंधित अभ्यासक्रम,टेक्नॉलॉजी, आधुनिक तंत्रज्ञान,संशोधन याबाबतचे अभ्यासक्रम सुरू केल्यास त्याचा फायदा कोकणी माणसाला होईल,येथील स्थलांतर थांबेल असेही खंडागळे यांनी म्हटले आहे.

आपण राज्याचे प्रमुख म्हणून कोकण विद्यापीठ स्थापन करण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार करावा अशी विनंती सुहास खंडागळे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income