पशुपालकांसाठी शासनाच्या विविध योजना


www.ah.maharshtra.gov.in या संकेतस्थळावरून

--------------------------------------


ठाणे : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान ( NATIONAL LIVESTOCK MISSION  ) राबविण्यात येत आहे. या अभियानाचा पशुपालकशेतकरी समूह गटमहिला बचत गट व उद्योजक तसेच पशुसंवर्धन विषयक व्यवसाय करणारे शेतकरी यांना ५० % अनुदानावर विविध योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी www.ah.maharshtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार डॉ.रुपाली सातपुते यांनी केले आहे. तसेच पशुधन व कुकूट वंश सुधारणापशुखाद्य व वैरण विकास ,आणि नावीन्य पूर्ण संशोधन व विस्तार हे तीन उप अभियान देखील जिल्हात राबविले जात असून लाभार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरून या योजनांचाही लाभ घेता येणार आहे. 

 पशुधन व कुकूट वंश सुधारणा उप अभियान


या  उप अभियानातर्गत कुकूटपालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास करण्यासाठी पशुपालकांना ५० % अनुदानावर कमीत कमी १००० देशी पक्षी संगोपन व अंडी उबवणी केंद्राची स्थापना करण्यासाठी २५ लक्ष पर्यत अनुदानाची रक्कम पशुपालकांना मिळणार आहे. तसेच शेळी- मेंढी पालनातून प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास करण्यासाठी पशुपालकांना कमीत कमी  ५०० शेळी व २५ बोकड गट स्थापन करण्यासाठी ५० %  भांडवली अनुदान मिळणार आहे. त्याचबरोबर वराह पालनातून उद्योजकता विकास करणेसाठी १०० मादी अधिक २५ नर वराह गट स्थापन करण्यासाठी पशुपालकांच्या प्रकल्पानुसार ३० लक्ष पर्यत अनुदान मिळणार आहे. 

 पशुखाद्य व वैरण विकास  उप-अभियान  

            केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियानातील पशुखाद्य  आणि वैरण विकास या उप अभियानातर्गत गुणवत्ता पूर्वक बियाणे उत्पादन आणि पशुखाद्य उद्योजकता विकास करणे या बाबींसाठी प्रकल्प किमतीच्या ५० % पशुपालकांच्या प्रकल्पानुसार ५० लक्ष पर्यत अनुदान मिळणार आहे.  या योजनेमध्ये मुरघास बेल वैरणीच्या विटा आणि टी .एम .आर निर्मितीसाठी दोन टप्यामध्ये एसआयडीबीआय मार्फत अनुदान मिळणार आहे .

 नावीन्य पूर्ण संशोधन व विस्तार उप- अभियान 

 या उप अभियानातर्गत नाविन्यपूर्ण संशोधनविकासविस्तारउपक्रमआणि पशुधन विमा यासाठी केंद्र व राज्य शासन अर्थ साह्य करणार आहे. अनुसूचित जातीअनुसूचित जमाती आणि दारिद्र रेषेखालील पशुपालकांना ०५ कॅटल युनिट ( शेळी -मेंढी वराह व ससे वगळून ) साठी केंद्र व राज्य शासन अर्थ साह्य करणार आहे. या सर्व  योजनेविषयीची सखोल माहिती करून घेण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या  www.ah.maharshtra.gov.in   या अधिकृत संकेतस्थळा  भेट द्यावी किंवा  नजीकच्या पशुवैद्यकीय संस्था प्रमुख पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. किर्ती डोईजोडे यांनी केले आहे.

--

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income