कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाला गती !

कल्याणच्या लोकग्राम पादचारी पुलाचीही निविदा जाहीर

 

·         कल्याण लोकसभा मतदार संघाचे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत घेतला कामाचा आढावा

 

मुंबई: मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेवरील कल्याण या महत्त्वाच्या स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांची भेट घेत या कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. या कामासाठी आवश्यक जागेची उपलब्धता असल्याने रेल्वे प्रशासन प्रत्यक्ष काम सुरू करणार असल्याची माहिती डॉ. शिंदे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे कल्याणच्या महत्त्वाकांक्षी अशा लोकग्राम पादचारी पुलाची ही निविदा जाहीर करण्यात आली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

 

मध्य रेल्वेवरील कल्याण हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. येथे उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांची वाहतूक पाहता येथील मार्गिका आणि फलाट कमी पडू लागले आहेत. त्यामुळे मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात कल्याण रेल्वे स्थानकाच्या रीमॉडेलिंग प्रकल्पाला चार वर्षांपूर्वी मंजुरी देण्यात आली होती. सुमारे 800 कोटींचा खर्च असलेल्या या प्रकल्पाच्या कामाचे दोन टप्प्यात विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात मालवाहतूक यार्ड रीमॉडेलिंगच्या कामाचा समावेश असून दुसऱ्या टप्प्यात प्रवासी वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. प्रवासी सुविधेसाठी महत्वाच्या असलेल्या कामांचा समावेशही दुसऱ्या टप्प्यात आहे. या कामासाठी निधीची उपलब्धता व्हावी यासाठी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या कामाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नुकतीच मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांची भेट घेतली. कल्याण यार्ड रिमोल्डिंग प्रकल्पाच्या कामाचा आढावा या वेळी घेतला गेला. या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडे जागेची उपलब्धता असून लवकरच या कामाला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.  तसेच लवकरच फलाटांची लांबी वाढवण्याचे कामही सुरू केले जाणार आहे. रिमॉडेलिंग प्रकल्पामुळे कल्याण स्थानकात विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पामुळे सहा नव्या फलाटांची भर पडणार असून 13 फलाट उपलब्ध होणार आहेत. स्वतंत्र मार्गिकांमुळे मालवाहतूकलोकल आणि एक्स्प्रेस अशी विभागणी करता येणे शक्य होणार आहे. परिणामी गाड्यांचा थांबा वेळ कमी होणार असून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. मालवाहतूक मार्गीकांच्या शेडचे अद्ययावतीकरण यात केले जाणार आहे. सोबतच पत्री पुलाला समांतर अशा एका नव्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम यात समाविष्ट आहे. पत्री पुलाचाही विस्तार केला जाणार आहे. तीन नवे पादचारी पूल या प्रकल्पात उभारले जाणार असून जुन्या आणि नव्या पूलांना जोडण्यासाठी या पुलांचा वापर होईल. त्यासह सुविधा इमारतही बांधली जाणार आहे. या कामाला रेल्वे प्रशासनाकडून गती देण्यात आल्याची माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. येत्या दोन ते अडीच वर्षात या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होणार असल्याचेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.

 ·         पूर्वेतील प्रवाशांना थेट स्थानकाजवळ पोहोचता येणार

 कल्याण पूर्वेतील प्रवाशांना सध्याच्या घडीला स्थानकात पोहोचण्यासाठी बोगदारस्ता अशी पायपीट करावी लागते. मात्र स्थानक रिमॉडेलिंग प्रकल्पामुळे पूर्वेतील प्रवाशांचे वाहन थेट फलाटापर्यंत पोहोचणार आहे. यापूर्वी वाहनाने स्थानकात पूर्वेतून येण्यासाठी अशी कोणतीही व्यवस्था नाही. मात्र पत्री पुलाला समांतर बनणाऱ्या नव्या पुलामुळे थेट पूर्वेतील स्थानकात पोहोचता येणार आहे. हा उड्डाणपूल पूर्वेत उतरणार आहे. तसेच पूर्वेतील कोळशेवाडी भागातून स्थानकात जाण्यासाठी स्वतंत्र मार्गिका देण्याची सूचना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मांडली. त्यावर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रवाशांना स्थानकात येण्यासाठी स्वयंचलित जिन्यासोबतच विमानतळाच्या धर्तीवर स्वयंचलित मार्गिका उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.

 ·         लोकग्राम पुलाची निविदा

 कल्याण स्थानक आणि पूर्व भागाला जोडणाऱ्या लोकग्राम पादचारी पुलाचे कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे. सद्यस्थितीत येथील जुना पूल काढण्यात आला आहे. तांत्रिक कारणामुळे या पादचारी पुलाच्या दोन निविदा यापूर्वी रद्द करण्यात आल्या होत्या. मात्र यातील अटी शर्थी बदलून नुकतीच या कामासाठी तिसरी निविदा जाहीर करण्यात आला असून 25 फेब्रुवारी पर्यंत या निवेदीची मुदत आहे. त्यामुळे लवकरच या पुलाच्या कामाचे कार्यादेश देऊन या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income