'अस्वस्थ दशकाची डायरी'चे स्टोरीटेलवर प्रकाशन !

प्रसिद्ध माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या 'अस्वस्थ दशकाची डायरी'चे स्टोरीटेलच्या ऑडिओबुक्समध्ये प्रकाशन!

 

भारताच्या इतिहासाचे फाळणीपूर्व आणि फाळणीनंतर असे दोन भाग होतात. फाळणीनंतरच्या स्वतंत्र भारताची सुरुवात हिंसाचाराने झाली. याच हिंसाचाराने देशात आता पाळेमुळे रुजविली आहेत. उत्तरदक्षिणपूर्वपश्‍चिम भारतातील कोणत्या न कोणत्या भागात अशांतता असतेच. संकटेमग ती नैसर्गिक असो वा मानवनिर्मितसतत येत असतात. भारतातील अनेक राज्यांना भेट देऊनतेथील अनुभव प्रसिद्ध माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी अस्वस्थ दशकाची डायरीत लिहिले आहेत. मन अस्वस्थ करणारा हा अनुभव आता आपल्याला 'स्टोरीटेल'च्या 'ऑडिओबुक्सद्वारे श्राव्यरूपात खुद्द अविनाश धर्माधिकारी यांच्याच आवाजात ऐकता येणार आहे.

 

अस्वस्थ दशकाची डायरी’ हे पुस्तक लिहिणाऱ्या अविनाश धर्माधिकारी यांचा प्रवास माजी सनदी अधिकारी ते चाणक्य मंडल परिवाराचे संस्थापक असा आहे. प्रशासकीय सेवेत असताना लोकाभिमुख प्रशासनाचे अनेक प्रयोग त्यांनी यशस्वीपणे राबविले. स्वेच्छा निवृत्वृतीनंतर चाणक्य मंडल सारख्या संस्थेतून त्यांनी कित्येक सक्षम अधिकारी घडविले आहेत. युवकांचे प्रेरणास्थानउत्तम वक्ताविचारवंतअशी ही त्यांची आणखी काही रूपं आहेत. अस्वस्थ दशकाची डायरीहे त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे. राज्य शासनाचा उत्कृष्ट ग्रंथाचा पुरस्कार या पुस्तकाला लाभला आहे.

 

'देशाचा कार्यकर्ता’ होण्याचे स्वप्न वयाच्या सोळाव्या वर्षी पाहिल्यावर ज्ञानप्रबोधिनीचा कार्यकर्ता म्हणून काम चालू होते आणि मुक्त पत्रकारिताही सुरू होती. सामान्य लोकांपासून नेत्यांपर्यंत सर्वांशी बोलून त्यावर मुख्यत: माणूस’ साप्ताहिकात ते लेखन करायचे. पंजाबआसामकाश्मीर व दिल्लीतील राजकारणशहाबानो प्रकरणगुजरातमध्ये पेटलेले राखीव जागांविरोधी आंदोलन आणि महाराष्ट्रातली शेतकरी चळवळअयोध्या विवाद या सर्वांवर त्यांनी जे अभ्यासपूर्ण लेखन केलेत्यातूनच त्यांचे पहिले पुस्तक अस्वस्थ दशकाची डायरी’ आकाराला आले आहे. अस्वस्थ दशकाची डायरी’ या पुस्तकाबद्दल प्रख्यात जेष्ठ लेखिका दुर्गा भागवत म्हणाल्या आहेत, "केवळ साहित्यिक व्हायच्या हौसेने केलेले हे लेखन नाही. तरीदेखील याची गणना उत्तम ललित लेखनात करता येईल”, अशी कोैतुकाची थाप त्यांनी दिलेली आहे.

 

अनेक दिग्गजांनी प्रशंसा केलेल्या 'अविनाश धर्माधिकारी यांच्या 'अस्वस्थ दशकाची डायरी'मधील आर्त अनुभव ऐकण्यासाठी स्टोरीटेल सिलेक्टची दरमहा वर्गणी रू. १४९/- तर वार्षिक वर्गणी सवलतीत रू.९९९/- आहे. पण आता नव्याने वार्षिक वर्गणी भरणा-यांसाठी स्टोरीटेलने अधिक सवलत जाहिर केली आहे आणि फक्त रू.३९९/- वार्षिक वर्गणी  भरून कोणत्याही भारतीय भाषेतील हजारो ऑडिओबुक्स सभासद वर्षभर ऐकू शकतात. स्टोरीटेलवर ११ प्रादेशिक भाषांमधील अमर्यादित ऑडिओबुक्सच्या माध्यमातून 'साहित्यश्रवणानंदघेता येईल.

 

अविनाश धर्माधिकारी लिखित 'अस्वस्थ दशकाची डायरी'चे ऑडिओबुक स्टोरीटेलवर ऐकण्यासाठील लिंक

https://www.storytel.com/in/en/books/aswastha-dashkachi-diary-1524332

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income