पमपा नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने स्वच्छता दूतांसाठी आरोग्य शिबिर

*नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांच्या वतीने व सुमनकांता चाईल्ड क्लिनकच्या सहकार्याने स्वच्छता दूत यांच्यासाठी मोफत धनुर्वात (टी टी) इंजेक्शन सुविधा* !

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रं.४ च्या कार्यतत्पर नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रभागातील स्वच्छता राखण्यासाठी नेहमी कार्यतत्पर असलेल्या स्वच्छता दूत यांना डॉ रामकृष्ण क्षार यांच्या सुमनकांता चाईल्ड व ऍडल्ट किलीनिक यांच्या वतीने आज आज मोफत धनुर्वात (टी टी ) इंजेक्शन देण्यात आले. 
सदर वेळी बोलताना नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी कोरोना काळात अहोरात्र काम करणाऱ्या स्वच्छता दूत यांनी आपला परिसर तसेच शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले. ते आपल्या स्वतःची काळजी न करता शहरातील राहिवाश्यांच्या आरोग्याची काळजी घेत स्वच्छता करत असतात. अश्या वेळी कुठेतरी त्यांच्या देखील शरीर स्वास्थ्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले व तीच बाब लक्षात घेता एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून माझी देखील ती जबाबदारी असल्याचे सांगत आज प्रभागातील सर्व स्वच्छता दूत यांना धनुर्वातचे इंजेक्शन मोफत देण्यात आल्याचे सांगितले. सदर स्वच्छता दूत आपल्या विभागात स्वच्छता,साफ सफाई करत असताना त्यांना कळत नकळत कुठेतरी खिळे अथवा इतर काही टोकदार वस्तुमुळे इजा,जखम, दुखापत होत असते व त्याकडे दुर्लक्ष केल्यास एखादया मोठया आजराला सामोरे जावे लागते. त्यासाठीच स्वच्छता दूत यांनी वेळोवेळी लसीकरण करणे गरजेचे आहे असे सांगितले
सुमनकांता चाईल्ड व ऍडल्ट किलीनिक, खारघरचे डॉ रामकृष्ण क्षार यांनी नगरसेविका नेत्रा किरण पाटील व समाजसेवक किरण पाटील हे नेहमीच समाज उपयोगी कामे करत असतात त्याचाच एक भाग म्हणून मी देखील त्यांच्या सामाजिक कार्यात सहभाग होत सदर स्वच्छता दूत यांना माझ्या  यांच्या सुमनकांता चाईल्ड व ऍडल्ट किलीनिकच्या वतीने त्यांना होणाऱ्या आजरापासून बचावासाठी सदर इंजेक्शन आज देण्यात आल्याचे डॉ रामकृष्ण क्षार यांनी सांगितले. साई गणेश एंटरप्राइजेसचे सुपरवायझर गणेश भोईर यांनी नगरसेविका नेत्रा किरण पाटील व समाजसेवक किरण पाटील हे वेळोवेळी आमच्या कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असल्याचे सांगितले व उभयतांचे आभार मानत धन्यवाद दिले. सदर प्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक अतुल मोहोकर,पर्यवेक्षक जितेंद्र जाधव व साई गणेश एंटरप्राइजेसचे सुपरवायझर विश्वास पाटील व गणेश भोईर उपस्थित होते. सदर प्रसंगी जवळपास 80 स्वच्छता दूत यांना सदर लस/ इंजेक्शन देण्यात आले.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income