खारघर तळोजा भाजपतर्फे टाळा ठोको आंदोलन आणि हल्लाबोल

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकरी,विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक यांच्यावर सतत अन्याय होत आहे असा आक्रोश करत भाजपतर्फे राज्यभर सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन शुक्रवारी 5 फेब्रुवारी 2021 रोजी करण्यात आले. खारघर तळोजा मंडळतर्फे सुद्धा असेच आंदोलन करण्यात आले. कोरोंना काळात सर्वसामान्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यावर याच कालावधीत भरमसाठ वीज दरवाढ करण्यात आली. दुपटी तीनपटीपेक्षा जास्त बिल यायला सुरुवात झाली आहे. वातावरण थंड होण्यासाठी वीज बिल दरवाढ कमी करण्याची घोषणा करण्यात आली; परंतु प्रत्यक्षात बिल कमी न करता सेक्शन ६६ अंतर्गत अनेक्शन तोडण्याचा धडाका लावला आहे.
महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील 4 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे दुष्कृत्य केलेले आहे .याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी खारघर-तळोजा मंडलाकडून
 महावितरणाविरोधात _टाळा ठोको व हल्लाबोल_ आंदोलन व निषेध करण्यात आला.
  याप्रसंगी मंडलातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने या निषेध मोर्च्यांत सामील झाले. यामध्ये
खारघर-तळोजा मंडलाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल,प्रभाग समिती अ सभापती अनिता पाटील, मा.सभापती अभिमन्यूशेठ पाटील,मा.सभापती शत्रुघ्न काकडे,नगरसेवक हरीश केणी,रामजीभाई बेरा,आरती नवघरे,हर्षदा उपाध्याय, सरचिटणीस दीपक शिंदे,किर्ती नवघरे,युवा अध्यक्ष विनोद घरत चिटणीस गीता चौधरी, संध्या शारबीद्रे,सोशल मीडिया प्रदेश सदस्या चांदणी अवघडे,समीर कदम,उपाध्यक्ष संजय घरत,निर्दोष केणी,बिना गोगरी,गुरू ठाकूर, प्रभाकर बांगर, लखविरसिंग सैनी,अमर उपाध्याय,प्रशांत दुदाम, श्यामला सुरेश,वासुदेव पाटील,सचिन वासकर, जयदास तेलवणे,
अरविंद जाधव, ऍड.राजेंद्र अग्रवाल, मुनाफ पटेल,स्नेहल बुधाई,क्रीस्तिना, विपुल चौतालिया,एस के डोळस, शिवाजी पिंपरे,भीमा मेस्त्री,नंदू दळवी,,संदीप एकबोटे,शफी पटेल,रामचंद्र जाधव,नवनीत मारू,रुपेश चव्हाण,वैशाली प्रजापती,विलास निकम,कृष्णा खडगी,मुकेश अग्रवाल, आर.के.दिवाकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income