शिवसह्याद्री प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती साजरी


कल्याण :- शिवजयंती मनामनात शिवजयंती घराघरात या संकल्पनेतून कोणाच्या सावटात सुद्धा बाईक रॅली काढत शिवसह्याद्री प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 
         छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण नगरीमध्ये शुक्रवारी 19 फेब्रुवारी २०२१ रोजी शिवसह्याद्री प्रतिष्ठानच्या शिव मावळ्यांनी संपूर्ण शहरांमध्ये बाईक रॅली काढत सोशल डिस्टंसिंग चां संदेश देत शिवजयंती साजरी केली. सकाळी आठ वाजता चिंचपाडा गाव येथून काटेमानिवली मार्गे चक्की नाका तसेच  पत्री पूल मार्गे कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी चौकामध्ये महाराजांना अभिवादन केले. त्यानंतर सर्वानंद चौकमार्गे दुर्गाडी किल्ल्यावर जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
    रॅलीमध्ये प्रतिष्ठानचे  अध्यक्ष सतीश पेडणेकर, मार्गदर्शक भागोजी पाटील, महेश भोसले, प्रदेश अध्यक्ष सुनील बोरणाक, प्रवक्ते बाबुराव खेडेकर, संतोष इंगळे, नारायण गोते, भूषण ठाकरे, रमेश पाटील, कौस्तुभ यादगिर, आनंदा कांबळे, सागर दोरुगडे, धनंजय दोरुगडे, प्रशांत साळुंखे, पांडुरंग चौगले  यांच्यासह अनेक शिवभक्तांनी सहभाग घेतला. 
दुर्गाडी किल्ल्यावर देवीचे दर्शन घेऊन सदर रॅलीची चक्की नाका मार्गे अडवली ढोकली येथील सकल मराठा महासंघाच्या कार्यालयाजवळ सांगता करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन करून सकल मराठा महासंघातर्फे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सकल मराठा महासंघाचे पदाधिकारी अमर वाघ, मोहन फराकटे, शरद बिरामणे, रवींद्र लांडे, अंकुश मुळीक, रूपाली निंबाळकर, हिरा आवारे, नयना अधिकारी, शिल्पा टाकळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income