योगिधाम महाफेडरेशन तर्फे विविध कार्यक्रम संपन्न



कल्याण :-  परिसरातील बहुचर्चित आणि बहुप्रतिष्ठित योगीधाम परिसरात प्रथमच ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या आनंद सोहळा सार्वजनिक रित्या स्थानिक नगरसेवक दयानंद गायकवाड यांच्या प्रयत्नांतून साजरा करण्यात आला. योगीधाम महा फेडरेशनचे अध्यक्ष  सुभाष  तानवडे यांच्या मार्गदर्शनात हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. सुनील जाधव आणि विमल झा यांनी सुद्धा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. 
         या कार्यक्रमाचे वैशिष्ट म्हणजे सर्व पक्षीय नेत्याची मांदियाळी तसेच योगीधाम परिसरातील सर्व को. ऑप. हौ. सोसायटीतील सर्व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती यावेळी लाभली. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक माजी आ. नरेंद्र पवार, माजी शिक्षण सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  संदीप देसाई साहेब, बी. जी. पी. शहर अध्यक्ष  प्रेमनाथ म्हात्रे , करुणा शंकर मिश्रा, भाजपा जिल्हा चिटणीस करुणा रत्नपारखी, कल्पना पिल्लई, अनिल शुक्ला,तर्केश शुक्ला, योगेश बाविस्कर, विनीत परमार, ललित रामचंदानी, ज्ञान प्रकाश, रूमा बनर्जी, आर एस गाडे, त्रीलोक सिंग, सोनकर, बलराम बुनकर यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    सायंकाळी रोजमेरी सोसायटीमध्ये विविध स्पर्धा आणि सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले. यामध्ये सोसायटीतील मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. दरवर्षी असे कार्यक्रम राबविले जातील असे यावेळी महाफेडरेशनचे अध्यक्ष सुभाष तानवडे यांनी यावेळी उपस्थितांना आश्वासित केले.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income