प्रताप नायडू ग्लोबल चेंजमेकर पुरस्काराने सन्मानित

मुंबई :- आंध्रप्रदेश मध्ये शेती क्षेत्राशी निगडीत योजनांचा लाभ शेकडो शेतकरी गटांना मिळवून दिल्याबद्दल प्रगतिशील शेतकरी प्रताप नायडू यांना प्रोजेक्ट हंड्रेड आणि मानिनी फाउंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात ग्लोबल चेंजमेकर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. नवी मुंबईतील हॉटेल योगी मिडटाऊन येथे शनिवारी दिनांक २० फेब्रुवारी २०२१ रोजी आयोजित कार्यक्रमात पद्मश्री गिरिष प्रभूने आणि पद्मश्री डॉक्टर विजयकुमार शहा तसेच आयएफएस ऑफिसर रंगनाथ नायकवडे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. देशभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या निवडक समाजसेवींचा यावेळी सदर पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भारतीय नागरिकांचा विकास विशेष करून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास हेच आयुष्याचे ध्येय असल्याचे प्रताप नायडू यांनी यावेळी सांगितले.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income