कल्याण पूर्व मध्ये कचऱ्याचे साम्राज्य सुनिल बोरनाक यांचे प्रशासनाला लेखी निवेदन

 कल्याण पूर्व मध्ये कचऱ्याचे साम्राज्य

सुनिल बोरनाक यांचे प्रशासनाला लेखी निवेदन

कल्याण:- राष्ट्रवादी युवक काँग्रेस कल्याण जिल्हा सरचिटणीस सुनील बोरनाक यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आय वॉर्ड प्रभाग अधिकारी यांना शुक्रवारी (दि.5 फेब्रुवारी) रोजी लेखी निवेदनाद्वारे कल्याण पूर्व परिसरातील नागरी वस्तीमध्ये उघड्यावर टाकलेला कचरा उचलून तेथे कलर कोटिंग डब्बे बसवणे बाबत निवेदन केले आहे.

     कल्याण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोबतच नव्याने समाविष्ट होत असलेल्या 18 गावांची स्वच्छता आणि आरोग्याची जबाबदारी कंडोमपाचीच आहे. त्यामुळे चिंचपाडा गाव, लक्ष्मी नगर, माणेरे गाव, अडवली, नांदिवली, पिसवली, आशेळे, द्वारली पाडा येथे प्रमुख रस्त्यांवर चर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न गहन बनत आहे. म्हणून स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत येथील कचरा उचलून तेथे वृक्षारोपण तसेच कलर कोडींग डब्बे अशी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कल्याण जिल्हा सरचिटणीस सुनील बोरनाक यांनी केली आहे. त्यांच्यासोबत भागोजी पाटील आणि नयना भंगे हे सुद्धा उपस्थित होते.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income