शब्द

संत तुकारामानी सहज लिहित लीहिता किती छान लिहून ठेवलेय बघा....

घासावा शब्द | तासावा शब्द|
तोलावा शब्द | बोलण्या पूर्वी||

शब्द हेचि कातर | शब्द सुईदोरा
बेतावेत शब्द | शास्त्राधारे ||

बोलावे मोजके | नेमके ,खमंग, खमके |
ठेवावे भान | देश ,काळ, पात्राचे

बोलावे बरे | बोलावे खरे |
कोणाच्याही मनावर | पाडू नये चरे ||

कोणाचेही वर्म | व्यंग आणि बिंग |
जातपात धर्म | काढूच नये ||

थोडक्यात समजणे | थोडक्यात समजावणे|
मुद्देसुद बोलणे | हि संवाद कला

शब्दांमध्ये झळकावी | ज्ञान ,कर्म ,भक्ती |
स्वानुभवातून जन्मावा | प्रत्येक शब्द ||

शब्दां मुळे दंगल | शब्दां मुळे मंगल |
शब्दांचे हे जंगल | जागृत राहावं ||

जीभेवरी ताबा | सर्वासुखदाता |
पाणी ,वाणी ,नाणी | नासू नये ||

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income