संत रोहिदास महामंडळाच्या योजनांसाठी कागदपत्रे जमा करा

संत रोहिदास महामंडळाच्या योजनांसाठी कागदपत्रे जमा करा

ठाणेदि. १९  - राज्य शासनाने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू आहे. या उपक्रमाअंतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात येत असून महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या एनएसएफडीसी कर्ज योजनेसाठी अर्ज केलेल्या लाभार्थ्यांनी तातडीने आपली कागदपत्रे सादर करावीतअसे आवाहन महामंडळाने केले आहे.

       सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजाच्या (चांभारमोचीढोर व होलार इ.) नागरिकांचे जीवनमान उंचावणेसमाजप्रवाहात मानाचे स्थान मिळविसाठी तसेच त्यांचे शैक्षणिकआर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी विविध शासकीय योजना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये राबविण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या एन.एस.एफ.डी.सी. योजनेअंतर्गत कर्ज प्रस्तावाचाही यामध्ये समावेश आहे.  ज्या लाभार्थीनी यापूर्वी एन.एस.एफ.डी.सी. कर्ज योजनेअंतर्गत लघु उद्योगमहिला समृध्दी योजना व लघु ऋण वित्त योजनेतून कर्ज प्रस्ताव जिल्हा कार्यालयात दाखल केले असून ज्याची लाभार्थी निवड समितीने केली आहेव जे परिपूर्ण कर्जप्रस्ताव जिल्हा कार्यालयामार्फत प्रधान कार्यालयास मंजुरीसाठी शिफारस करण्यात आलेली आहेतअशा लाभार्थींची यादी महामंडळाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. या निवड झालेल्या अर्जदारांनी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात संपर्क करून आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन महामंडळाने केले आहे.

आवश्यक कागदपत्रे

            लाभार्थ्याचा सिबील क्रेडिट स्कोअरसाठी सिबील रिपोर्ट,  लाभार्थ्याचे उद्योग आधार प्रमाणपत्र,  लाभार्थ्याचा विनंती अर्ज कागदपत्रे खरी असल्याबाबत व ज्या जागी व्यवसाय चालू त्याच जागेचे प्रमाणित केलेले छायाचित्रचालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखलारहिवाशी दाखला,  दोन सक्षम जामीनदारांपैकी नोकरदार असेल तर त्याच्या कार्यालयाचे लाभार्थ्याने वसुलीचा भरणा केला नाही तर जामीनदाराच्या पगारातून कपात करुन भरणा करण्यात येईलअसे कार्यालयाचे हमीपत्रजर लाभार्थ्याचा जामीनदार सरकारी नोकरदार असेल व तो सेवानिवृत्त झालेला असेल त्याच्या ऐवजी ज्या कर्मचाऱ्याची सेवा ५ ते ६ वर्ष बाकी आहे असा जामीनदार घेणे आवश्यकजिल्हा व्यवस्थापक यांचा स्थळपाहणी अहवाल व शिफारसअर्जदाराचे वारसदाराच्या स्वाक्षरीसह नामांकन शपथपत्र व त्यांचे आधारकार्डची झेरॉक्स प्रत,  यापूर्वी कर्जाच्या अर्जाबरोबर सादर केलेल्या इतर कागदपत्रांची खातरजमा उदा. जातीचा दाखलारेशनकार्डरहिवाशी दाखलानिवडणूक आयोग ओळखपत्र इ.लाभार्थ्याचा आधारकार्ड क्रमांक तसेच आधार संलग्न (Link) बँक खाते क्रमांकजी.एस.टी. क्रमांकासह व्यवसायाचे दरपत्रक,  अर्जदाराचे विहित नमुन्यातील शपथपत्र इत्यादी कागदपत्रे तात्काळ दाखल करावीत.

            अर्जदारांनी कागदपत्रे तात्काळ पूर्ण करून दाखल करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा व आपली सामाजिकआर्थिक व शैक्षणिक प्रगती साध्य करुन आपला सामाजिक स्तर उंचावावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income