सारथी कार्यालय खारघर नवीमुंबईत सुरु


            नवी मुंबईदि.12: महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकरिता छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे असून संस्थेचे मुंबई विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्हयांचे कार्यक्षेत्र आहे. मुंबई विभागीय कार्यालय एमटीएनएल इमारत, रेनट्री मार्ग, सेक्टर-21,खारघर ता.पनवेल जि.रायगड येथे सुरु करण्यात आले आहे.

            तरी कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी मराठा या लक्षित गटातील समाजबांधवांनी मुंबई विभागीय कार्यालयात भेट द्यावी व सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व लाभ घ्यावा असे आवाहन सारथी संस्थेचे उपव्यवस्थापकीय संचालक तथा उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income