MS-CIT च का ?


पनवेल : MS-CIT च का ? जगात आय.टी. क्षेत्रात भारताचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या ‘परम’ महासंगणकाचे निर्माते तसेच जागतिक दर्जाचे आय.टी. तज्ञ डॉ. विजय भटकर व  विवेक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बनविलेला अभ्यासक्रम असून MKCL ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत संस्था आहे. (महाराष्ट्र राज्य उच्च तंत्रशिक्षण शिक्षण मंडळ - MSBTE ). MKCL देशभरात - केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या इतर राज्यांमध्येही त्या त्या राज्यांच्या मातृभाषेत MS-CIT कोर्स चालविला जातो. जसे की. राजस्थान - RS-CIT, ओरीसा - OS-CIT, हरियाना - HS-CIT, बिहार - BS-CIT. MKCL आंतरराष्ट्रीय - केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर UAE (दुबई), सौदी अरेबिया, इजिप्त, घाना, युरोप, श्रीलंका या देशांमध्येही MI-CIT या नावाने अभ्यासक्रमांचे यशस्वी पणे सुरू आहे. अशाप्रकारे MKCL ही जगातील अव्वल दर्जाची संस्था असून ERA या जगभरात लोकप्रिय असणाऱ्या शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण देते.

शासनाच्या GR नुसार शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना MS-CIT अनिवार्य आहे तसेच डिप्लोमा इंजिनीअरिंग साठी प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थ्यांना CMF ह्या विषयाचा पेपर द्यावा लागत नाही. MS-CIT च्या अभ्यासक्रमातील अत्याधुनिक सोफ्टवेअर जसे मायक्रोसॉफ्ट विन्डोज 7 व मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2013 हे फक्त MS-CIT मध्येच समाविष्ट कोर्स साठी लागणारे सोफ्टवेअर हे अधिकृत (Licence Copy) असल्याने सन्मानाने शिक्षण घेतले जाते.

MS-CIT च्या प्रत्येक केंद्रात अत्याधुनिक कंप्युटरची व्यवस्था असून प्रत्येक केंद्रात MKCL OnCeT सर्टिफाईड प्रशिक्षक तसेच लाईट गेल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून UPS बॅटरी Backup ची सोय. MS-CIT ची परीक्षा महाराष्ट्र शासनाच्या MSBTE या बोर्डाकडून घेतली जाते. MS-CIT केंद्रात असतो प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र कंप्युटर व मिळतो पुरेसा वेळ. MS-CIT कोर्स सोबत इंग्रजी व मराठी कॉम्पुटराइज टायपिंग कोर्स (प्रमाणपत्रासह).

नवीन MS-CIT कोर्स मधे Study Skills, Life Skills, eCitizenship Skills आणि Job Skills शिकविले जातात. MS-CIT परीक्षा दिल्यानंतर त्वरित प्रोव्हिजनल सर्टिफिकेट तसेच अल्पावधीतच फायनल सटीफिकेट मिळते. माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्याना ICT साठी MS-CIT केल्यास फायद्याचेच परंतु ICT चा पुढचा टप्पा म्हणून विद्यार्थ्यांची MS-CIT लाच पसंती. ICT केल्यानंतर पुढे काय तर ते म्हणजे MS-CIT. तसेच इतर अनेक वैशिष्ट्यांमुळे MS-CIT आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कंप्युटर कोर्स असे असतानाही अनेक प्रयत्न करूनही MS-CIT केंद्र मिळण्यास अपात्र ठरणाऱ्या काही संगणक संस्था चालकांकडून विद्यार्थी तसेच पालकांची दिशाभूल करून MS-CIT बरोबर नामसाधर्म्य असणारे कोर्सेस थोपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरी जागरूक विद्यार्थी व पालकांनी आपली फसवणूक टाळावी व अधिकृत केंद्रातच आपला प्रवेश निश्चित करावा याच बरोबर MS-CIT या कोर्सची अधिकृत फी रु. ३५००/- (रु. तीन हजार पाचशे मात्र) एवढी आहे. काही अधिकृत केंद्रे सदर कोर्सची फी कमी आकारून MS-CIT च्या अभ्यासक्रमाचे अवमूल्यन करतात व असे आढळून आल्यास सदर केंद्राची मान्यता MKCL कडून रद्द होऊ शकते.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income