महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गांव !



स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असलेल्या भिलारगांवामध्ये आता तब्बल १५ हजारांहून अधिक पुस्तके वाचकांची वाट पाहत असून भिलारगांव हे महाराष्ट्रातील पहिले पुस्तकांचे गांव ठरले आहे. ब्रिटन, नेदरलँड्स आणि नॉर्वेप्रमाणेच महाराष्ट्रात पुस्तकांचे गांव म्हणून भिलारगांव सजले  आहे. देशातील हा अशा प्रकारचा पहिला प्रकल्प असल्याने महाबळेश्वर तालुक्याचा देशात नावलौकिक उंचावणार असून त्याचप्रमाणे महाबळेश्वर तालुक्यासह सातारा जिल्ह्यासाठीसुद्धा ही गौरवास्पद बाब आहे. ब्रिटनमधील हरफोर्डशायर येथे ‘ऑन वे’ या नावाचे गांव असून हे गांव पुस्तकाचे गांव म्हणून ओळखले जाते.

पुस्तकांचे गांव या प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने गावातील २५ ठिकाणे निश्चित केली आहेत. त्यामध्ये गावातील मंदिरे, स्थानिक नागरिकांची घरे, हॉटेल, लॉज, शाळा अशा ठिकाणी प्रत्येकी ४५० ते ५०० पुस्तके ठेवण्यात आली आहेत. या ठिकाणांव्यतिरीक्त गावात इतरही काही ठिकाणी पुस्तके ठेवण्यात येतील. गावात आलेल्या पर्यटकांना सर्व ठिकाणी जाऊन ही पुस्तके वाचता येणार आहेत. त्यासाठी त्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. या उपक्रमाच्या माध्यमातून भिलारगांवाकडे उच्च दर्जाचे क्षेत्र म्हणून पाहिले जाणार आहे. तर रोजगार व आर्थिक स्थैर्यही लाभणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे नेमण्यात आलेल्या समितीने कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन, क्रीडा विषयक लेखन, विज्ञानविषयक साहित्य, वैचारिक साहित्य, पुरस्कार विजेत्या साहित्यिकांची पुस्तके, बालसाहित्य, संत साहित्य, चरित्र, आत्मचरित्र अशा २५ हून अधिक वाङ् मय प्रकारांची निवड केली आहे. राज्यातील शंभराहून अधिक छोट्या मोठ्या प्रकाशकांकडून ही पुस्तके खरेदी करण्यात आली असून या विशेष विक्रमाची दखल महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्सने घेतली असून त्याबाबतचे प्रमाणपत्र प्रशासनास सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. अशी माहिती महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स चे मुख्य संपादक व प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. 

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स या सेवाभावी संस्थेला विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या ध्येयवादी आणि असामान्य व्यक्तींबद्दल आकर्षण वाटते. समाजात वेगळ्या वाटेवर चालणा-या व्यक्ती आणि संस्थांचे आम्ही नेहमीच कौतुक करतो. त्यामुळे प्रशासनाच्या सामाजिक विचारांचा धागा भविष्यातही असाच जोडला जावा हा मूळ उद्देश ठेवून हा विशेष राज्य पुरस्कार २०१७ त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे.

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्‌स हे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला ऑनलाईन स्वरुपात व दरवर्षी एक मे रोजी वर्षभरातील रेकॉर्ड्स संकलित करून छापील व ऑनलाईन अशा दोन्ही स्वरुपात प्रकाशित होणारे संदर्भ पुस्तक आहे. महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये महाराष्ट्रातील अनेक कीर्तिमान व्यक्ती व संस्था यांच्याद्वारे निर्माण केलेल्या विविध विक्रमांच्या सविस्तर माहितीचे संकलन केलेले असते.

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्‌स या पुस्तकामधील विक्रमांची सविस्तर माहिती तशीही सर्वच प्रसारमाध्यमांतर्फे तसेच महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या संग्रहालयांतूनही अधिकृतरीत्या दिली जाते. महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये कोणतीही माहिती प्रसिद्ध होण्यापूर्वी संबंधित माहितीच्या सत्यतेची तावून सुलाखून खात्री करून घेतली जाते; त्यामुळे महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स’ हा जगभरामध्ये माहितीचा एक विश्वसनीय स्रोत समजला जातो.

मराठी वाचकांसाठी काहीतरी आगळे वेगळे करायचे या विचाराने झपाटलेला मी एक सिम्पल मराठी माणूस. लहानपणापासून लागलेली वाचनाची सवय नंतर व्यसन कधी बनली आणि माझा वाचनाचा छंद आंतरराष्ट्रीय व्यवसायात कसा परावर्तीत झाला हे न समजलेला मीसमोर येईल ते म्हणजे अगदी टूथपेस्टच्या कव्हरचे वा भेळीच्या कागदाचे वाचन जेव्हा सुरु झाले त्यादरम्यान माझ्या मावशीच्या किराणा मालाच्या दुकानात वाणसामान बांधण्यासाठी आणलेल्या रद्दीतील सर्व साहित्यिक पुरवण्या वेगळ्याकरून अगदी स्वस्तात उत्तमोत्तम मराठी साहित्य वाचण्याचे वेड लागले; तेव्हा याचे काहीतरी करायला पाहिजे असे वाटायला लागले.

पण काहीतरी म्हणजे काहीही न करता, वाचनात आलेल्या सत्य पण मनोरंजक गोष्टींवर लिखाण करावे. त्याचे रेकॉर्ड्स ठेवावे हा विचार पक्का केला आणि त्यातूनच महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स’ या सामाजिक संस्थेची निर्मिती झाली. तसे आपण भारतीय नेहमीच अनेक रेकॉर्ड्स करतच असतो. उदाहरणार्थ - आकड्यांचा खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्स बनतात आणि तुटतात. मात्र असे काही रेकॉर्ड्स आहेत, जे तुटणं कठीण नाही जवळपास अशक्यच आहे. असे मत महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्सचे मुख्य संपादक डॉ. सुनील दादा पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केले.

--
डॉ. सुनील दादा पाटील (Ph. D.) संचालक - कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर 

Dr. Sunil Dada Patil (Ph. D.) 02322 - 225500, 09975873569

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income