मानव सेवाव्रती विनोबा भावे यांचे विध्यार्थी गुणविकास विचार


१)विनाकारण कसलेही भय बाळगू नये !भय वाटल्यास देवाचे नाव घ्या कारण देव नामापुढे भयाचा टिकाव लागत नाही. 
२)जमेल तेव्हा जमेल तितकी आणि जमेल त्या लोकांना मदत करावी. 
३)दररोज आपल्या हातून घडलेल्या चुकांचा धांडोळा घेऊन त्या सुधारण्याचा प्रयत्न करावा. जुन्या चुका पुन्हा नव्याने कधीच करू नये. 
४)प्रत्येक ठिकाणी पुढे पुढे करू नये. 
५)मारामाऱ्या,भांडणे करू नयेत.कुणाचे मनसुद्धा दुखवू नये. 
६)श्रम आणि उत्पादन केल्याविना भोजन करू नये. 
७)गुरूजनांची शक्य तितकी सेवा करावी. 
८)सरळ बसा,सरळ बोला आणि सरळ विचार करा. 
९)रोज नियमितपणे कांहीतरी अभ्यास करीत जावा. 
१०)रागावू नये. राग हा दुर्बलतेची लक्षण आहे. 
११)विनम्रपणे वागण्यातच खरा मोठेपणा आहे. 
१२)स्वच्छता,नीटनेटकेपणा या गुणांमुळे आपलं व्यक्तिंमत्व उत्तम घडतं. 
१३)उर्मटपणे वागू नये.सर्वांमध्ये मिळून मिसळून वागावे. मर्यादाशील असावं. 
१४)शक्तीच्या जोरावर कुणी आपल्यावर दबाव आणत असेल तर मुळीच दबून जाऊ नये. 
१५)सत्याला धरून राहावं. नेहमी खरे बोलावे. 
१६)दुसऱ्यांमध्ये दोष पाहू नयेत:पण दुसऱ्यांमधले गुण मात्र अवश्य घ्यावेत. 
१७)दुसऱयाच्या आनंदात आपण आनंद मानावा. इतरांचे अश्रू पुसण्यासाठी सदैव तत्पर असावं. 
१८)उतावणेपणा आणि धांदरटपणा करू नये. शांतपणे आणि विचारीपणे वागावे. 
१९)प्रत्येक बाबतीत आपलाच स्वार्थ कसा साधता येईल हे पाहू नये. आपण या जगात सुखोपभोग भोगण्याकरिता जन्माला आलेलो नसून सेवा करण्याकरिता आलो आहोत याचे भान ठेवा. 
२०)खादाडपणाने न वागता थोडक्यात गोडी मानावी. 
२१)गैरवर्तन करण्याची लाज वाटली पाहिजे. 
२२)विनाकारण शारीरिक चुळबुळ न करणे. कांही शारीरिक त्रास असेल तर धीर धरून राहावं. 
२३)कुणाचा हेवा,मत्सर करू नये. कुणाला तुच्छ लेखू नये. स्वतःचा मोठेपणा मिरवू नये. 
२४)परीक्षेत कॉपी करू नये. हीसुद्धा एकप्रकारची चोरीच असते. 
२५)नेमानं कांहीतरी शारीरिक कष्ट करावे. यामुळे मनात श्रमप्रतिष्ठा निर्माण होईल. समाजाला कांहीतरी देत राहण्याची चांगली सवय जडेल. 
२६)सुट्टीच्या काळात कोणतेतरी सामाजिक काम करावे. 
२७)सर्वधर्मीयांच्या आणि सर्वजातीयांच्या मुलांशी मैत्री करावी. मनात भेदभावाला थारा देऊ नये. 
२८)आपली राष्ट्रभाषा हिंदी अवश्य शिकून घ्यावी. 
२९)रोज नियमितपणे थोडातरी व्यायाम करावा. 
३०)लवकर झोपून लवकर उठावे. 

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income