सेंट जोसेफ शाळाच निकालात काढा :- पालकांचा पुन्हा आक्रोश

कथित थकबाकीमुळे निकाल देण्यास शाळा प्रशासनाचा मज्जाव 
जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी पनवेलला येऊन पोलीस संरक्षणात निकाल वाटला.
पनवेल :- दैनिक रामप्रहरवृत्त  
              अवैध फी वाढीविरोधात गेल्या २ वर्षांपासून पालक आणि सेंट जोसेफ शाळा व्यवस्थापन यातील वाद विकोपाला गेला आहे. शिक्षण शुल्क समितीचा निर्णय येईपर्यंत फिवसुलीचा तगादा लावू नये असे शासनाचे स्पष्ट आदेश असताना शाळा व्यवस्थापनाने  कथित थकबाकीमुळे पालकांना  निकाल देण्यास मज्जाव केल्यामुळे पालकांनी पुन्हा शुक्रवारी (दिनांक २८ एप्रिल) आंदोलनाचा पवित्रा घेतला. दरम्यान रायगड जिल्हा शिक्षण अधिकारी सुनील सावंत,गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे,श्री. कापडणे यांनी घटनास्थळी पोहोचून उपसंचालकांच्या परवानगीने निकाल वाटप केले. बऱ्याच संघर्षानंतर निकाल हातात पडला असला तरी शाळेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करा अशी पालकांची ठाम भूमिका आहे.
          नवीन पनवेल येथील सेंट जोसेफ शाळा नेहमीच वादातीत राहत आहे. गुरुवारी (दिनांक २७ एप्रिल) निकालवाटप होते. मात्र या शाळेच्या अवैध फि वसुली विरोधात आंदोलन करणाऱ्या पालकांच्या मुलांना शाळेने निकाल दिले नाहीत. अगोदर थकीत फी भरा मगच निकाल देऊ असा शाळेने पवित्र घेतल्याने पालकांनी पुन्हा शाळेत जाऊन ठिय्या मांडला. शाळेविरोधात पोलिसात गुन्हा नोंद करा अशी मागणी पुन्हा डोके वर काढू लागली. यावेळी उडालेला गोंधळ सावरण्यासाठी जिल्हा शिक्षण अधिकारी आणि तालुका शिक्षण अधिकारी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून त्यांनी पालकांचे म्हणने एकूण घेतले. सदर हकीकत फोनवरून राज्याच्या शिक्षण उपसंचालकांच्या  कानावर घालून परवानगी मिळावीत पोलीस संरक्षण घेऊन निकाल वाटप केले. 




Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income