पाईकाचे अभंग वाचकांच्या भेटीला

गाथा परिवाराचे संस्थापक ह. भ. प. उल्हासदादा पाटील यांच्या   सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या एकूण 4500 अभंगांपैकी 11 अभंगांचे रसाळ विश्लेषण असलेले 'पाईकाचे अभंग' हा वैचारिक ग्रंथ आज घरी आला. कालच शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी झाली आणि आज हे विचारधन घरी आले आहे. तुकाराम महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यासाठी मावळ्यांची वैचारिक मशागत ज्या अभंगांचा रचनेतून केली ते हे  पाईकाचे अभंग ! याच विचाराचा धागा न्यायमूर्ती रानडे यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील 'मराठी सत्तेचा उदय' या ग्रंथात सापडतो. आज सर्वत्र भक्ती आणि शक्तीचे जे स्मारक आपण पाहतो त्यावेळी या अभंगांची आठवण हरी हर भक्तांना यावी हीच अपेक्षा ! राम कृष्ण हरी !

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income