चला जाणूया शासकीय कार्यालयाचे कामकाज


राज्य शासनाचे विविध विभाग ठाणे जिल्ह्यात कार्यरत आहेत. या विभागांमध्ये कोणकोणती कामे चालतात, सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या कामांसाठी कोणाशी संपर्क साधावा, तक्रारींसाठी कुठे संपर्क साधावा आदी माहिती नागरिकांना हवी असते. ती माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने विविध विभागांची माहिती देण्यात येत आहे. आज आपण जाणूया अन्न व औषध प्रशासन विभागाअंतर्गत असलेल्या औषध प्रशासन विभागाची माहिती...

 

अन्न व औषध प्रशासन, (औषधे) ठाणे जिल्हा

 

            औषध प्रशासन काय काम करते ? :-

अन्न व औषध प्रशासन ही वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागमंत्रालयमुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणारी यंत्रणा आहे. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व त्याखालील नियमाअंतर्गत फुटकळ विक्रीघाऊक विक्री यासाठी अनुज्ञप्ती (परवाने) देणे तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने मेडिकल डिव्हाइसेस क्लास ए, क्लास बी करीता उत्पादन अनुज्ञप्ती देणे तसेच कायद्याअंतर्गत धारण केलेल्या परवानाधारकाची नियमितपणे तपासणी करणे.

            औषध है विशिष्ट दर्जाचे गुणवत्तेचे असावेकुठेही विनापरवाना औषधे तयार होऊ नये यासाठी प्रशासन कायम दक्ष असतेऔषध कारखान्याचे घाऊक व किरकोळ व्यापाऱ्याची अन्न व औषध प्रशासन नियमितपणे पाहणी करत असते. सदर पाहणीमध्ये उत्पादन बनवण्याची पध्दती, दर्जा तपासणीच्या पद्धतीऔषधाची साठवणकच्च्या मालाचा दर्जा व इतर कागदपत्रे यांची पडताळणी केली जाते. हॉस्पीटलऔषधाचे दुकानेउत्पादक औषध कारणाने वगैरे मधून औषधाचे नमुने वेळोवेळी गोळा केले जातात व तपासले जातात. या सर्व पडताळण्या व तपासण्यामध्ये जर काही आक्षेपार्ह आढळले, औषधाचा दर्जा आदर्श नसला तर कडक कायदेशीर कारवाई केली जाते.

प्रशासनाचे ध्येय :-

            औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९८५ अंतर्गत नागरीकांना उत्तम प्रतिचे औषधे व सौंदर्य प्रसाधने उपलब्ध करून देणे त्याच बरोबर माफक दरात औषधे उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे अत्यंत महत्वाचे ध्येय आहे.

मुदत संपलेली औषधे (एक्झपायरी मेडिसीन) मिळाल्यास कोठे तक्रार करावी ? :-

            प्रत्येक जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय असते. सहायक आयुक्त हे कार्यालय प्रमुख असतात. प्रत्येक जिल्ह्यासाठी औषध निरीक्षक हे अधिकारी कार्यरत असतात. ग्राहकांनी जिल्हा कार्यालयातून माहिती काढुन त्यांच्या विभागातील औषध निरीक्षकांशी संपर्क करावा.

            ग्राहक आपली तक्रार कागदपत्रे, संशयित भाव, इतर पुरावा यासह नोंदवू शकतातया खेरीज  अन्न व औषध प्रशासनाच्या संकेतस्थळावरील फिडबॅकद्वारे तक्रार नोंदवू शकतात. तसेच औषध प्रशासन आयुक्तालयात ग्राहक संरक्षण व तक्रार निवारणासाठी स्वतंत्र कक्ष असून टोल फ्री क्र. १८००२२२३६५ वर तक्रार नोंदविता येते. इंटेलिजन्स ब्रँचमध्ये या कामासाठी खास पथक असते. हे पथक औषध प्रशासनचे अधिकारीपोलिस खबरेवॉच डॉक्स यांच्याबरोबर सहकार्याने काम करतात.

काऊंटर सेल व प्रिस्क्रीप्शन मेडिसिन यातील फरक ? :- प्रिस्क्रिप्शन आणि नॉन प्रिस्क्रिप्शन (ढोबळपणेओव्हर द काऊंटरओटीसी म्हणजे प्रिस्क्रीप्शनशिवाय) अशी औषधांची वर्गवारी आहे. प्रिस्क्रीप्शन केलेल्या औषधावर Rx ही खूण Warning as Schedule || Drugs Warming. To be Sold by retail on the Prescription of a Register Medical Practitioner only व लेबलवर डाव्याबाजूला लाल रंगाची उभी रेख असते. या खुणावरून ग्राहक प्रिस्क्रीप्शनचे औषध ओळखू शकतो.

किमान किरकोळ विक्री किंमत (एमआरपी) पेक्षा जास्त दराने औषध विक्री होऊ शकते काय ? :- नाही. कुठल्याही औषधांची किंमती ही डीपीसीओ (The Drugs Prices Control (Order 1995) नुसार ठरविण्यात आलेली आहे. औषधांची जास्तीत जास्त किंमत ठरविलेली असते. म्हणून कोणतेही औषधे एमआरपीपेक्षा जास्त दराने विकत असल्यास त्याबाबत सबंधित जिल्हा कार्यालयात तक्रार करावी.

नशेच्या औषधांबाबत खबरदारी :- गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोपचारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 ( NDPS Act 1985) अंतर्गत एखाद्या व्यक्तीकडे कोणत्या प्रकारचे औषध आहे. ते औषध अंमली पदार्थ किंवा गुंगीचे आहे का आणि ते बाळगण्याचे उद्दिष्ट जाणून घेतले जाते. एनडीपीएस कायद्यानुसार गुंगीचे औषध विकणे हा गंभीर गुन्हा समजला जातो. गुंगीकारक औषधे हे फक्त चिकित्सकाच्या चिठ्ठीवर घेणे अभिप्रेत आहे व त्याचा दुरुपयोग होऊ नये याबाबत नागरिकांनी सतर्कता बाळगावी.

औषध विक्रेत्याने सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे काय ? :- देशभरात अंमली पदार्थाचा गैरवापर व अंमली पदार्थाच्या औषध तस्करीला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने होणाऱ्या अनुचित घटनांना प्रतिबंध लावण्यासाठी तसेच शेड्यूल एच व एच. औषधाचा गैरवापर होऊ नये व औषध विक्रेत्यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई प्रभावीपणे हाताळण्यासाठी मदत व्हावी या हेतूने सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेता सीसीटीव्ही लावणे योग्य आहे.

ड्रग व मॅजिक रेमेडिजला (Drugs & Magic Remedies) बळी पडू नका (पॉस्टर लावणे) :-

औषधे ही रसायने आहेत आणि ती अत्यंत काळजीपूर्वक वापरायला हवी. चुकीचे औषध घेणेगरज नसताना घेणे घातक ठरु शकते. म्हणून ही औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावीत अशी अपेक्षा असते. कोणत्याही जाहिरातीचा मुख्य उद्देश हा त्या उत्पादनाचा वापरविक्री वाढविणे हाच असतो अणि त्यामुळे सेल्फ मेडिकेशन (स्वमनाने उपचार) वाढू शकतात, हे लक्षात घेऊन औषधाची विविध शेड्युलमध्ये वर्गवारी केलेली आहे. जी औषधे प्रिस्क्रीप्शन औषधे आहेत, म्हणजे डॉक्टरांच्या चिठ्ठीने त्यांच्या देखरेखीखाली घ्यावयाची असतात. त्यांच्या जाहिरातीस कायद्याने परवानगी नाही. ज्या आजारासाठी रोगमुक्तीचा दावा केला जाऊ शकत नाही, असे आजार शेड्युल जे मध्ये नमुद केलेले आहे. या खेरीज औषधे आणि मॅजिक रेमेडिज आक्षेपार्ह जाहिराती कायदा १९५४ अधिनियम १९५५ च्या अंतर्गत शेड्यूलमध्ये नमुद केलेल्या आजारांना बरे करण्याचा दावा करणाऱ्या औषधांची जाहिरात करण्यास बंदी आहे. औषध प्रशासन माध्यमात येणाऱ्या जाहिरातीवर लक्ष ठेवून असते व काही आक्षेपार्ह आढळल्यास कायदेशीर कारवाई म्हणजे कारणे दाखवा नोटीस देऊन उत्पादनाची मान्यता रद्द करते.

अन्न व औषध प्रशासनासबंधी कुठलीही चौकशी अथवा शंकांचे निरसन कसे करावे :- अन्न व औषध विभागाच्या https://fdamfg.maharashtra.gov.in/login.aspx या संकेतस्थळावर गेल्यावर प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याचे नाव व संपर्क क्रमांक दिलेला असतो. तसेच महत्त्वाचे लिंक या सुविधेवर माहिती मिळविता येते. तसेच अन्न व औषध प्रशासनासंबंधी कुठलीही चौकशी अथवा शंकानिरसन करण्यासाठी संबंधित कार्यक्षेत्रातील औषध निरीक्षक अथवा सहायक आयुक्त अथवा सह आयुक्त यांच्याशी संपर्क करू शकता. अथवा प्रशासनाचे टोल फ्री क्र. १८००२२२३६५ वर संपर्क साधून माहिती घेऊ शकता.

Comments

आपण हे पाहिले आहे का ?

बलसागर भारत होवो

इंग्रज अरबी लेखक खलिल जिब्रान यांचे भावलेले विचार..

पनवेलमध्ये माधुरी आणि हेमा

योगगुरू अविनाश लोंढे लिखित -- अविस्मरणीय पहिली कमाई !First Income